गावी गेल्यावर माझे मित्रांच्या साहाय्याने असेच काहीना काही निष्फळ प्रयोग चालत असत.
आम्ही रोज काही शेतात जात नसू. अशा वेळी घरात किंवा गावातच आमचा काही ना काही उद्योग चाले किंवा खेळत असू.
वडिलांना सख्खी बहीण नव्हती, परंतु मायेच्या आणि प्रेमाच्या खूप बहिणी होत्या, त्या आमच्या आत्या. गावी गेल्यावर ह्या सर्व आत्यांना न भेटून कसे चालेल
चला तर आत्यांना भेटायला.
आतापर्यंत आपण गावातील बऱ्याच जणांना भेटलो आहोत, बऱ्याच ओळखी झाल्यात.
पण अजून तुम्ही आमचे घर आणि आमच्या घरातील माणसांना अजून भेटला नाहीत, चला तर मग आमच्या घराकडे ….
माझ्या वयाची सर्व मुले पोहण्यात तरबेज असायची. मला त्याचे वाईट वाटायचे. मला पोहणे शिकविण्याचा निर्णय माझ्या मित्रांनी घेतला. आणि माझी शिकवणी सुरु झाली …
आता मी ताजातवाना झालेलो असायचो. मग घरात थोडी कामे करायचो. तसे पाहाता मुंबईत लहानाचा मोठा झालेलो मी गावाकडची कामे करणे शक्यच नसायचे. मग मी काय करायचो? …
मला दरवर्षी एक सवंगडी भेटत असे. मग अख्खी सुट्टी त्याच्याच बरोबर. मग मी अख्खी सुट्टी मजा करायचो. ती कशी? ते आता वाचूया.
पण त्या अगोदर मावशीच्या घरी जायचे आहे ना …