रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी यांची पुस्तके

रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी यांची पुस्तके

20/01/2021 1 By Charudatta Sawant

रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी

रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी यांनी शेतकरी आणि नागरिक यांना अतिशय उपयुक्त अशी पुस्तके आणि टिपणे लिहिली आहेत.

फार अभ्यास, मेहनत आणि खर्च करून त्यांनी प्रकाशित केलेली हि पुस्तके त्यांनी समाजाला मोफत उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यांच्या https://rayatmitra.blogspot.com/ या ब्लॉगवर हि पुस्तके आणि टिपणे कोणालाही वाचता येतात, डाऊनलोड करता येतात, आणि ज्या व्यक्ती , संस्था आणि संघटना ह्यांना ही पुस्तके आणि टिपणे छापून विकावयाची आहेत त्यांना देखील ही पुस्तके आणि टिपणे छापून विकण्यास त्यांनी परवानगी दिलेली आहे.

अशा तऱ्हेने समाजासाठी कार्य करणारी व्यक्ती खूप कमी दिसतात.

त्यांच्या परवानगीने त्यांची पुस्तके माझ्या ब्लॉगवर वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. पुस्तकांच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.


रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी यांचा अल्प परिचय.

शिक्षण:
डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरिंग
डिप्लोमा इन हाऊसिंग लॉं
डिप्लोमा इन रियल इस्टेट मॅनेजमेन्ट

अनुभव:
सन १९९० पासून जमीन व मालमत्ताविषयक प्रश्नांची सोडवणूक करणारा आघाडीचे सल्लागार.
अनेक व्यक्ती, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, कार्यकर्ते, संस्था, संघटना, वकील, बांधकाम उद्योजक यांना प्रशिक्षण दिले आहे.

ईमेल: satishsampada@gmail.com
ब्लॉग: https://rayatmitra.blogspot.com/
www.propertylawlearning.com हे संकेतस्थळ प्रदर्शित केलेले आहे.

उद्दिष्ट: महाराष्ट्रात ३६ जिल्हे, १८२ उपविभाग आणि ३५८ तालुके आहेत. अनेक छोटी-मोठी शहरे आहेत. ह्या विस्तीर्ण महाराष्ट्रात त्यांनी अवगत केलेले जमीन व मालमत्ताविषयक ज्ञान व माहिती जास्तीत जास्त मराठी बांधवाना देण्यासाठी https://rayatmitra.blogspot.com/ हा ब्लॉग तयार करून प्रदर्शित, प्रकाशित केला आहे. मराठी बांधव जमीन,मालमत्ता विषयक आणि दैनंदिन आयुष्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी स्वत: सक्षम व्हावेत हे त्यांचे स्वप्न आणि महत्वाकांक्षा आहे.


ऑनलाईन पुस्तके आणि टिपणे लिंक्स:

सूचना: सदर पुस्तके केवळ कायद्याविषयीचे व माहितीचे सर्वसामान्य ज्ञान वाचकास व्हावे या हेतूने प्रसिद्ध केली असून, या पुस्तकात कायद्याविषयीची व अन्य विषयांची जेव्हढी माहिती व्हावयास पाहिजे व जी आम्हाला समजली आहे, ती सर्व अंतर्भूत केली आहे. अनावधानाने यात राहिलेल्या कोणत्याही त्रुटीसाठी प्रकाशक किंवा लेखक,संकलक जबाबदार असणार नाहीत ; मात्र या माहितीचा स्वतःच्या कामासाठी प्रत्यक्ष उपयोग करण्यासाठी निष्णात तज्ञाचे, वकिलाचे मार्गदर्शन घ्यावे. – रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी.

अनु. क्रमांकपुस्तकाचे नांवलिंक
शेतजमिनीसाठी वारसनोंद आणि शेतजमिनीची विभागणी + मुलींचा वारसाहक्क (टिपण)वाचा
शेतजमिनीची मोजणी : बिनशेती (NA) वापर + आपली जमीन निर्वेध आहे का तपासा (टिपण)वाचा
प्रशासनातील विविध कामांसाठी मार्गदर्शनवाचा
शेतजमीनविषयक प्रश्न आणि उत्तरेवाचा
जमीन मालमत्तेची सुरक्षित खरेदी एक सूत्रबद्ध पद्धतवाचा
ग्रामीण महाराष्ट्रातील निवारा हक्क मार्गदर्शन + ग्रामपंचायत करआकारणी (टिपण)वाचा
संदर्भ: https://rayatmitra.blogspot.com/

संकलक – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९