हरवले ते गवसेंच ना – मराठी कविता (Marathi Kavita)
हरवले ते गवसेंच ना – मराठी कविता (Marathi Kavita)
कवीयत्री – स्मिता कढे (Marathi Kavita)
दर्या खोऱ्यातून, कडेकपारीतून
शोधिते मी पुन्हा पुन्हा,
कालचक्रे लोपलेल्या आज त्या खाणाखुणा,
परंतु हाय,
काळ्याकभिन्न पत्थराला पाझर कांहो,
फुटेच ना,
हरवले ते गवसेंच ना ।।
पाठीवर ढाल हाती तलवार,
वेश असे याचा बरवा,
स्वराज्यस्तव कालिकाळाची,
केली नाही कधी पर्वा,
परंतु हाय,
आजकालच्या पुढाऱ्यांना कृती याची,
दिसेच ना,
हरवले ते गवसेंच ना ।।
सामर्थ्य आहे चळवळीचे,
सामर्थ्य आहे एकतेचे,
सामर्थ्य आहे समानतेचे,
दासबोध हा करी मना,
परंतु हाय,
अर्धमिटल्या डोळ्यात यांच्या अंजन काहो,
पडेच ना,
हरवले ते गवसेंच ना।।
प्रथम प्रसिद्धी: शिवजयंती, १९ फेब्रुवारी २०२२
।। शिवराज्य परत यावे – हीच आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने सदिच्छा ।।
कवीयत्री: स्मिता श्रीहरी कढे
मुखपृष्ठ छायाचित्र: शिवजन्मस्थान, शिवनेरी
Cover Image – Birthplace of Chhaatrapati Shivaji Maharaj, Shivneri Fort, Dist.: Pune, Maharashtra
Image Courtesy: https://www.maharashtratourism.gov.in/-/shivneri-fort

कवीयत्री परिचय:
नाव: स्मिता श्रीहरी कढे
पूर्वाश्रमीच्या शालिनी रघुनाथ रूपदे
वय: ७७
पत्ता: २, सुचेता, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे – ४००६०२
मूळच्या पुण्याच्या. १९६१ मध्ये ठाणे येथे नर्सिंग कोर्स करून येथेच लग्नानंतर स्थायिक झाल्या.
प्रवासाची आणि लेखनाची अत्यंत आवड!
वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४ व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली.
त्यांचा नर्सिंग मधील अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्या क्षेत्रातील विविध अनुभव ही लेख रूपाने वाचकांसमोर ठेवायला आवडेल.
भ्रमणध्वनी क्रमांक: 9930863006.
फेसबुक पेज: https://www.facebook.com/smita.kadhe
अजून कविता वाचा:
सुखधारा – कवीयत्री: सौ. अंजली माधव देशपांडे
आता तुझ्याकडे काहीच मागणे नाही – कवीयत्री: स्मिता श्रीहरी कढे
देवाचा पत्ता – कवी: कै. सुधाकर रूपदे
हिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – कवियत्री: यशश्री शैलेश पाटील
सूर्य – कवीयत्री – सौ. अंजली माधव देशपांडे
कवीयत्रींचे इतर लेख वाचा:
माझी नर्मदा परिक्रमा-भाग १ ला – लेखिका – स्मिता कढे
माझी नर्मदा परिक्रमा-भाग २ रा – लेखिका – स्मिता कढे
माझी नर्मदा परिक्रमा-भाग ३ रा – लेखिका – स्मिता कढे
आमचे इतर लेख:
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ ते ७