Marathi Kavita - आता तुझ्याकडे काहीच मागणे नाही - मराठी कविता

आता तुझ्याकडे काहीच मागणे नाही – मराठी कविता (Marathi Kavita)

आता तुझ्याकडे काहीच मागणे नाही – मराठी कविता (Marathi Kavita)

कवीयत्री – स्मिता कढे (Marathi Kavita)

नवमास सोसूनी भार, दाविलीस सृष्टी तु माते,
साहुनी बहुत सायास, वाढविलेस बहू कवतुके,
थोर तुझे उपकार आई,
आता तुझ्याकडे काहीच मागणे नाही ।।

होताच फुल कळीचे, नव तारुण्य फुलले,
रंगीत सहजीवनाचे, लोचनी स्वप्न आले,
चालता तुज सवे नाथा, किती सौख्य भोगले,
दु,खचे क्षणही हसत झेलले, तृप्तता क्षणाची त्या,
जीवनी भरून राही,
आता तुझ्याकडे काहीच मागणे नाही ।।

बहरताच् वेलीवर, फुल उमलले,
मातृत्वाच्या चहुलीने, पूर्णत्वा आले,
सुखावले मन माझे,
ऐकून शब्द, “आई”,
आता तुझ्याकडे काहीच मागणे नाही ।।

तरीही आस तुझी मनी वसे,
ध्यास तुझा नित्य असे,
तुजवीण अन्य न सुचे काही,
अन,
आगा घडलेची नवल!
द्वैतामधून सहजची, मन हे अद्वैत ते पाही,
आता तुझ्याकडे काहीच मागणे नाही ।।

कवीयत्री: स्मिता श्रीहरी कढे

चित्रकार: नितु सावंत


Smita Shrihgari Kadhe

कवीयत्री परिचय:

नाव: स्मिता श्रीहरी कढे
पूर्वाश्रमीच्या शालिनी रघुनाथ रूपदे
वय: ७७
पत्ता: , सुचेता, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे – ४००६०२
मूळच्या पुण्याच्या. १९६१ मध्ये ठाणे येथे नर्सिंग कोर्स करून येथेच लग्नानंतर स्थायिक झाल्या.
प्रवासाची आणि लेखनाची अत्यंत आवड!
वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४ व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली.
त्यांचा नर्सिंग मधील अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्या क्षेत्रातील विविध अनुभव ही लेख रूपाने वाचकांसमोर ठेवायला आवडेल.
भ्रमणध्वनी क्रमांक: 9930863006
.

फेसबुक पेज: https://www.facebook.com/smita.kadhe


अजून कविता वाचा:

हिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – कवियत्री: यशश्री शैलेश पाटील

सूर्य कवीयत्री – सौ. अंजली माधव देशपांडे

कवीयत्रींचे इतर लेख वाचा:

माझी नर्मदा परिक्रमा-भाग १ ला – लेखिका – स्मिता कढे

माझी नर्मदा परिक्रमा-भाग २ रा – लेखिका – स्मिता कढे

माझी नर्मदा परिक्रमा-भाग ३ रा – लेखिका – स्मिता कढे

आमचे इतर लेख:

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ ते ७


Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2022 Charudatta Sawant
Acknowledgements: Poet Written By: Mrs. Smita Kadhe, Th more...

Similar Posts

2 Comments

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply