आईचे मन – मराठी कविता (Marathi Kavita)
आईचे मन – मराठी कविता (Marathi Kavita)
कवीयत्री – स्मिता कढे (Marathi Kavita)
मन तुझे उमललेले। जास्वंदीच्या फुलासारखे ||
मन तुझे ओथंबलेले। आषाढीच्या मेघासारखे ||
मन तुझे अति चंचल। श्री विष्णुच्या लक्ष्मी सारखे ||
मन तुझे अतिनिर्मल। शुद्ध वाहत्या गंगे सारखे ||
मन तुझे निष्कलंक । शुभ्रधवलं हिमासारखे ||
मन तुझे हळुवार । नाजूक प्राजक्ताच्या फुलासारखे ||
मन तुझे अतीतृप्त। पौर्णिमेच्या चंद्रासारखे ||
मन तुझे गुंतलेले | सर्वानभूती ईशासारखे ||
आणि माझ्यासाठी, मन तुझे परम पवित्र मंदिरासारखे ||
कवीयत्री: स्मिता श्रीहरी कढे
रेखाचित्र: नितु सावंत
(कवीयत्री असणारी माझी आई अगदी अशीच होती, ही कविता मी साधारण १९९२ च्या आसपास केली. माझ्या आईच्या कवितेंचे पुस्तक आम्ही त्याही आधी छापले आहे – कवीयत्री: स्मिता श्रीहरी कढे)

कवीयत्री परिचय:
नाव: स्मिता श्रीहरी कढे
पूर्वाश्रमीच्या शालिनी रघुनाथ रूपदे
वय: ७७
पत्ता: २, सुचेता, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे – ४००६०२
मूळच्या पुण्याच्या. १९६१ मध्ये ठाणे येथे नर्सिंग कोर्स करून येथेच लग्नानंतर स्थायिक झाल्या.
प्रवासाची आणि लेखनाची अत्यंत आवड!
वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४ व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली.
त्यांचा नर्सिंग मधील अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्या क्षेत्रातील विविध अनुभव ही लेख रूपाने वाचकांसमोर ठेवायला आवडेल.
भ्रमणध्वनी क्रमांक: 9930863006.
फेसबुक पेज: https://www.facebook.com/smita.kadhe
अजून कविता वाचा:
आता तुझ्याकडे काहीच मागणे नाही – कवीयत्री: स्मिता श्रीहरी कढे
देवाचा पत्ता – कवी: कै. सुधाकर रूपदे
हिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – कवियत्री: यशश्री शैलेश पाटील
सूर्य – कवीयत्री – सौ. अंजली माधव देशपांडे
कवीयत्रींचे इतर लेख वाचा:
माझी नर्मदा परिक्रमा-भाग १ ला – लेखिका – स्मिता कढे
माझी नर्मदा परिक्रमा-भाग २ रा – लेखिका – स्मिता कढे
माझी नर्मदा परिक्रमा-भाग ३ रा – लेखिका – स्मिता कढे
आमचे इतर लेख:
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ ते ७
