Bhajan and Devotional Songs by O P Nayyar
| |

ओ. पी. नय्यर यांची भजने आणि भक्तीगीते: Bhajan and Devotional Songs by O P Nayyar

ओ. पी. नय्यर यांची भजने आणि भक्तीगीते: Bhajan and Devotional Songs by O P Nayyar

ओ. पी. नय्यर यांची भजने आणि भक्तीगीते: Bhajan and Devotional Songs by O P Nayyar

ओ. पी. नय्यर यांची भजने आणि भक्तीगीते?

लेखाचे शिर्षक वाचून आपण आता तिसऱ्यांदा दचकला असालच! यापूर्वीच्या दोन लेखात ओपींची अंगाई व बालगीते आणि शास्त्रीय गाणी आपण ऐकली आणि त्यांविषयी जाणून घेतले.

पण आता ओ. पी. नय्यर यांची भजने आणि भक्तीगीते? हे कसे शक्य आहे?

ओपींनी काय काय करून ठेवले आहे, ते सर्व आपण अजून उलगडून कुठे पाहिले आहे? चला तर आज ऐकूयात ओ. पी. नय्यर यांनी स्वरबद्ध केलेली भजने आणि भक्तीगीते!

तसे पहाता ओपींची चित्रपटातील दोन-तीन भजने बहुतेकांच्या परिचयाची आहेतच. आणि ह्या विषयाचा आधार धरून शोध घेतल्यावर ओपींनी स्वरबद्ध केलेली भजने आणि भक्तीगीते मोठ्या संख्येने एवढी सापडली, कि ह्या विषयावर दोन भाग लिहावे लागतील कि काय असे वाटले. परंतु विषय मर्यादित असल्यामुळे एकाच भागात आपण सगळी गाणी ऐकणार आहोत.

अगोदरच्या दोन्ही लेखात म्हटल्याप्रमाणे ऱ्हीदम किंग ओपी नय्यर, घोड्यांच्या टापाच्या तालावर गाणी देणारा ओपी नय्यर, पंजाबी ठेक्यावर गाणी देणारा ओपी नय्यर, क्लब मधील नृत्याची गाणी देणारा ओपी नय्यर, झालेच तर उडत्या चालीची आणि विनोदी गाणी देणारा ओपी नय्यर अशा विविध विशेषणांनी ज्यांना नावाजले जाते, त्या ओपींनी अंगाई, बालगीतेही ह्या प्रकाराबरोबरच शास्त्रीय संगीतात बांधलेली गाणी ह्या प्रकारातही खूपच अविश्वसनीय काम केले आहे. त्याचप्रमाणे भजने आणि भक्तीगीते ह्या प्रकाराही ओपींनी लीलया हाताळला आहे.

चला तर आता पाहूया आणि अर्थात ऐकूया ओपींच्या गाण्यांचा हा नवीन पैलू!

ही गाणी ऐकल्यावर ओपींचा खरा पिंड वेगळाच असावा असे जाणवते. आपणांस ठाऊक असलेले ओपी हे प्रेमगीते, उडती गाणी, क्लबसॉंग्स, विनोदी गाणी देण्याविषयी प्रसिद्ध होते आणि त्यातही ते स्वतः रमले देखील, परंतु आजची गाणी ऐकल्यावर ओपींमध्ये दडलेल्या भक्तीरसाचा आपण आनंद घेवू शकाल. ओपींनी या रचना अतिशय मनपूर्वक आणि वैशिष्ट्यपूर्ण तर केल्या आहेतच, पण प्रत्येक रचना ही वेगळी केल्याचे लक्षात येते. गाण्याचा मूड पकडून समर्पक पण कमीतकमी वाद्ये वापरून केलेली ही गाणी बनवताना गायकांकडून चांगलीच मेहनत करून घेतल्याचेही जाणवते.

आणि त्यांचे हे रूप त्यांच्या उमेदवारीच्या काळातच दिसले होते.

ओपी त्यांच्या तरुणपणी लाहोर रेडिओवर गाणे आणि चाल लावण्याचे काम करीत असत. तेव्हा वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी (साधारण १९४३ साली) ओपींनी एचएमव्हीसाठी कबीर दोहे संगीतबद्ध केले आणि स्वतः गायले देखील. म्हणजे चक्क लोकांना ओ. पी. नय्यर हे नाव माहीत होण्याअगोदर !

आता ओपींच्या आवाजातील कबीर दोहे ऐकूयात. यात त्यांच्या गायकीवर महान गायक सैगल यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.

गाणे क्र. १: ‘चलती चक्की देख कर, दिया कबीरा रोये’, रचना: संत कबीर, गैरफिल्मी – वर्ष साधारण १९४३, गायक आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. १: ‘चलती चक्की देख कर, दिया कबीरा रोये’, रचना: संत कबीर, गैरफिल्मी – वर्ष साधारण १९४३, गायक आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. २: ‘कबीरा रस्सी पांव में’, रचना: संत कबीर, गैरफिल्मी – वर्ष साधारण १९४३, गायक आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. २: ‘कबीरा रस्सी पांव में’, रचना: संत कबीर, गैरफिल्मी – वर्ष साधारण १९४३, गायक आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर

साधारण १९४३ ते १९४५ दरम्यान Columbia Gramophone Company Ltd. ने संत कबीर यांच्या दोह्याची एक रेकॉर्ड (रेकॉर्ड क्र. E. 23050) ओपींकडून बनवून घेतली. त्यात त्याकाळचे सुप्रसिद्ध गायक सी. एच. आत्मा (Atma Hashmatrai Chainani) यांनी ‘अपना आप पहचान (भाग आणि भाग २); ह्या रेकॉर्डवर संत कबीर यांचे काही दोहे ध्वनिमुद्रित केले आहेत.

मूळ दोह्याची सुरुवात अशी आहे,

आया था किस काम को, तू सोया चादर तान ।
सूरत संभाल ए काफिला, अपना आप पहचान ।। …..

चला तर आता ऐकूयात ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटातील निवडक भजने आणि भक्तीगीते! आणि जाणून घेवूया ओपींच्या सांगीतिक कारकीर्दीतील आणखी एक दुर्लक्षित पैलू!

वर म्हटल्याप्रमाणे ओपींची चित्रपटातील दोन-तीन भजने बहुतेकांच्या परिचयाची आहेत, ऐकूयात ओपींची तीन प्रसिद्ध भजने.

पहिले प्रसिद्ध भजन आहे, ‘आना है तो आ, राह में कुछ फेर नहीं है‘! ओपींनी ‘पूरिया धनश्री’ ह्या रागात केलेली एकमेव रचना! ( संदर्भ: Dr. G. Rama Narayana, https://www.hindigeetmala.net/song/aanaa_hai_to_aa_raah.htm)

गाणे क्र. ३: ‘आना है तो आ, राह में कुछ फेर नहीं है’, चित्रपट: नया दौर (वर्ष १९५७), गायक: मोहम्मद रफी , गीतकार: साहिर लुधियानवी, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. ३: ‘आना है तो आ, राह में कुछ फेर नहीं है’, चित्रपट: नया दौर (वर्ष १९५७), गायक: मोहम्मद रफी , गीतकार: साहिर लुधियानवी, संगीतकार: ओ. पी. नय्यर

अधिक माहिती: ह्या गाण्याचे चित्रीकरण ‘जेजुरी गडावर’ झाले आहे. जिज्ञासूंनी त्याकाळी मंदिर आणि आजूबाजूचा परिसर कसा दिसतो त्याकरीता व्हिडीओ पहावा.

पुढचे भजन आहे, ‘पुढचे भजन आहे, ‘जान सके तो जान, तेरे मन में छुपकर बैठे देख तेरे भगवान’!

गाणे क्र. ४: ‘जान सके तो जान’, चित्रपट: उस्ताद (वर्ष १९५७), गायक: मोहम्मद रफी , गीतकार: जाँ निसार अख़्तर, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. ४: ‘जान सके तो जान’, चित्रपट: उस्ताद (वर्ष १९५७), गायक: मोहम्मद रफी , गीतकार: जाँ निसार अख़्तर, संगीतकार: ओ. पी. नय्यर

पुढचे भजन आहे, ‘बना दे, बना दे, बना दे प्रभूजी‘!

गाणे क्र. ५: ‘बना दे, बना दे, बना दे प्रभूजी‘, चित्रपट: फागुन (वर्ष १९५८), गायक: आशा भोसले आणि मोहम्मद रफी , गीतकार: कमर जलालाबादी, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. ५ ‘बना दे, बना दे, बना दे प्रभूजी‘, चित्रपट: फागुन (वर्ष १९५८), गायक: आशा भोसले आणि मोहम्मद रफी , गीतकार: कमर जलालाबादी, संगीतकार: ओ. पी. नय्यर

वरील तिन्ही भजने बहुतेकांच्या परिचयाची आहेत, आता ऐकूयात ओपींनी संगीतबद्ध केलेली काही अपरिचीत आणि दुर्मीळ भजने आणि भक्तीगीते!

पुढचे भजन आहे, ‘हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा, कृष्णा, हरे, हरे’! वर्ष १९८३ मधील अर्धवट राहिलेल्या ‘मुकद्दर की बात’ ह्या चित्रपटातील सर्व गाणी मात्र ध्वनीमुद्रीत झालेली आहेत. त्यातीलच हे एक गाणे.

गाणे क्र. ६: ‘हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा, कृष्णा, हरे, हरे’, चित्रपट: मुकद्दर की बात (वर्ष १९८३), गायक: पुष्पा पागधरे, महेंद्र कपूर आणि साथी, गीतकार: पारंपारीक रचना, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. ६ ‘हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा, कृष्णा, हरे, हरे’, चित्रपट: मुकद्दर की बात (वर्ष १९८३), गायक: पुष्पा पागधरे, महेंद्र कपूर आणि साथी, गीतकार: पारंपारीक रचना, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. ७: ‘जिसका रखवाला भगवान’, चित्रपट: ऐसा भी होता है (वर्ष १९७१), गायक: मोहम्मद रफी, गीतकार: एस. एच. बिहारी, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. ७: ‘जिसका रखवाला भगवान’, चित्रपट: ऐसा भी होता है (वर्ष १९७१), गायक: मोहम्मद रफी, गीतकार: एस. एच. बिहारी, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. ८: ‘जय कृष्ण हरे’, चित्रपट: हिरा मोती (वर्ष १९७९), गायक: मोहम्मद रफी आणि मन्ना डे , गीतकार: अहमद वासी, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. ८: ‘जय कृष्ण हरे’, चित्रपट: हिरा मोती (वर्ष १९७९), गायक: मोहम्मद रफी आणि मन्ना डे , गीतकार: अहमद वासी, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. ९: ‘जब इस धरती पर दुःख पाकर’, चित्रपट: मिट्टी में सोना (वर्ष १९६०), गायक: मोहम्मद रफी आणि आशा भोसले, गीतकार: राजा मेहदी अली खान, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. ९: ‘जब इस धरती पर दुःख पाकर’, चित्रपट: मिट्टी में सोना (वर्ष १९६०), गायक: मोहम्मद रफी आणि आशा भोसले, गीतकार: राजा मेहदी अली खान, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. १०: ‘ये दुनिया तेरे दिल कि तसवीर बाबा’, चित्रपट: श्रीमती ४२० (वर्ष १९५६), गायक: मोहम्मद रफी, गीतकार: जा निसार अख्तर, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. १०: ‘ये दुनिया तेरे दिल कि तसवीर बाबा’, चित्रपट: श्रीमती ४२० (वर्ष १९५६), गायक: मोहम्मद रफी, गीतकार: जा निसार अख्तर, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. ११: ‘दर्शन कब दोगे बोलो ना’, चित्रपट: भागम भाग (वर्ष १९५६), गायक: मोहम्मद रफी आणि गीता दत्त, गीतकार: मजरूह सुलतानपुरी, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. ११: ‘दर्शन कब दोगे बोलो ना’, चित्रपट: भागम भाग (वर्ष १९५६), गायक: मोहम्मद रफी आणि गीता दत्त, गीतकार: मजरूह सुलतानपुरी, संगीतकार: ओ. पी. नय्यर

ह्या गाण्यात गीता दत्त यांचा आवाज असला तरी त्यांच्या आवाजातील कडवे मात्र पडद्यावर दिसत नाही. (मात्र गीता दत्त यांनी थोड्या वेगळ्या आवाजात गाणे गायले आहे, त्यावरून हे गाणे पडद्यावर किशोर कुमारवर चित्रित झाले असावे असे मला वाटते, कारण रफी यांच्या आवाजातील गाणे भगवान यांच्यावर चित्रित झाले आहे. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा, हि विनंती).

वरील सर्व गाणी ऐकून आपणाला लक्षात आलेच असेल कि, ओ. पी. नय्यर ह्यांनी भजने आणि भक्तीगीते हा प्रकार सुद्धा लीलया वापरला आहे, परंतु टांगा ऱ्हीदम आणि उडत्या चालीची गाणी ह्या पलीकडे बहुसंख्य श्रोत्यांना किंवा रसिकांना ओ. पी. नय्यर ह्यांचे हे वैशिष्ट्य माहीत नाही, ते सर्वांपुढे ठेवण्याचा हा माझा एका आणखी एक छोटासा प्रयत्न!

वर ऐकलेल्या बऱ्याच गाण्यांचे चित्रीकरण उपलब्ध नाहीय, ही अजून एक शोकांतिका!

पुढच्या वेळेस ओपींच्या आणखी एका नवीन पैलू विषयी जाणून घेवूयात.


संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याविषयीचे माझे इतर लेख वाचा:


ओ. पी. नय्यर यांची भजने आणि भक्तीगीते: Bhajan and Devotional Songs by O P Nayyar- लेखाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलक – चारुदत्त सावंत, २०२१. मोबाईल क्र. ८९९९७७५४३९

कृपया आपला अभिप्राय आणि सूचना कळवाव्यात.

मनोगत: मी काही शास्त्रीय संगीताचा अभ्यासू अथवा जाणकार नाहीय, विविध माध्यमे, लेख आणि जाणकारांचा सल्ला घेवून ह्या लेखातील रागदारी विषयक संज्ञा वापरल्या आहेत. त्यात काही कमतरता अथवा बदल असतील तर मला नक्की कळवाव्यात. शिवाय येथे वापरलेल्या गाण्यातील वाद्याविषयी काहीच भाष्य केलेलं नाहीय, कारण माझे अज्ञान! माझे अज्ञान दूर करण्यासाठी मला मदत करावी. धन्यवाद.

आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना हा लेख सामायिक करा.

Refences:


DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have used audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links. No downloading has been provided. Any lawful copyright owner does not wish to keep their content on our website, may inform us about it, so that we will remove it from our website.

अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत. आमच्या वेबसाइटवर आम्ही कुठल्याही सामुग्रीचे डाउनलोड उपलब्ध करून दिलेले नाही. कोणीही कायदेशीर कॉपीराइट मालक जर आपली सामग्री आमच्या वेबसाइटवर ठेवू इच्छित नसतील, तर त्याबद्दल आम्हाला कळविल्यास आम्ही ती सामुग्री आमच्या वेबसाइटवरून काढून टाकू.


Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2023 Charudatta Sawant
Acknowledgements: The concept of the article and articl more...

Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply