Shadow

Tag: Marathi Story – Chuk

धुळवड – Marathi Story

धुळवड – Marathi Story

लेखमाला, Slider
धुळवड - लेखक: दीपक तांबोळी. ('कथा माणुसकीच्या' या पुस्तकातील एक कथा) - Marathi Story आरवने घड्याळात पाहीलं. सकाळचे आठ वाजले होते. त्याच्या मित्रांचा अजून पत्ता नव्हता. खरं म्हणजे ते येणार असं काही ठरलं नव्हतं पण दरवर्षीप्रमाणे ते येतील मग रंगांची आतषबाजी सुरु होईल अशी त्याला अपेक्षा होती. "आरव, अंघोळ करुन घे रे". किचनमधून आई ओरडली. तिने असं ओरडायची ही तिसरी वेळ होती. आरवने तिला काहीही उत्तर दिलं नाही. आपण मित्रांची वाट बघतोय हे तो तिला कोणत्या तोंडाने सांगणार होता? कारण गेल्या कित्येक महिन्यात कुणीही मित्र त्याला भेटायला आला नव्हता किंवा तो स्वतःही कुणाला भेटायला गेला नव्हता. पण आजतरी कुणीतरी येईल ही आशा सोडवत नव्हती म्हणून तो दरवाजाकडे डोळे लावून बसला होता. नऊ वाजले तसं त्याला निराशेने घेरलं. अजूनही त्याचे मित्र आले नव्हते आणि त्यांनी का यावं? आरवने बारावी नापास झाल्यानंतर सग...
मोबदला – Marathi Story

मोबदला – Marathi Story

अनुभव, लेखमाला, Slider
मोबदला - लेखक: दीपक तांबोळी. ('रंग हळव्या मनाचे' या पुस्तकातील एक कथा) - Marathi Story शिरीष जसा घरात शिरला तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली, "अहो जरा अण्णांना बघता का? खूप अस्वस्थ वाटताहेत. जेवलेही नाहीत". "हो. फ्रेश झालो की लगेच बघतो". बाथरुममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रुममध्ये गेला. नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते. जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं. खरंच अस्वस्थ वाटत होते. त्यांचे खोल गेलेले डोळे, निस्तेज नजर, चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं. लक्षण काही ठिक दिसत नव्हतं. "काय झालं अण्णा? काय होतंय?" स्वतःलाच धीर देत त्यानं विचारलं. अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला. त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले पण ते शिरीषला समजले नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला, "काय म्हणालात कळलं नाही, परत एकदा सांगा". ...
चूक – Marathi Story

चूक – Marathi Story

लेखमाला, Slider
चूक - लेखक: दीपक तांबोळी. ('रंग हळव्या मनाचे' या पुस्तकातील एक कथा) - Marathi Story निर्मलाबाई नाही नाही म्हणत असतांनाही वसंतरावांनी त्यांना दवाखान्यात अँडमीट केलं. नर्स निर्मलाबाईंना सलाईन लावत असतांना ते शांतपणे निर्मलाबाईंच्या आजाराने उतरलेल्या चेहऱ्याकडे पहात राहिले. निर्मलाबाईंची या वर्षातली दवाखान्यात ऍडमिट होण्याची ही तिसरी वेळ होती. आणि मागच्या दोन वर्षातली सातवी. खरं म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षी असं सारखं सारखं आजारी पडायचं तसं निर्मलाबाईंना काही कारण नव्हतं. घरात अनेक वर्षापासून समृद्धी नांदत होती. प्रत्येक गोष्टीत साथ देणारा नवरा होता. मुलामुलींची लग्न होऊन दोघंही त्यांच्या घरी सुखासमाधानात होते. पण आयुष्यात आलेला रिक्तपणा निर्मलाबाईंना त्रासदायक ठरला होता. त्यांचं खाण्यापिण्यावरचं लक्ष उडालं होतं. त्यातच देवाधर्माच्या नावाखाली केलेल्या उपासातापासांनी त्यांचं शरीर कमकुवत झा...
error: Content is protected !!