Shadow

Tag: Marathi Stories

न्याय – Marathi Story Short

न्याय – Marathi Story Short

लेखमाला
न्याय - लेखक: दीपक तांबोळी. ('कथा माणुसकीच्या' या पुस्तकातील एक कथा) - Marathi Story Short शिपायाने "आत जा" म्हटल्यावर अशोक केबिनमध्ये जायला निघाला. एक क्षण तो दरवाजातच थबकला. आजचा हा त्याचा दोन वर्षातला तेरावा इंटरव्ह्यू होता. "आज तरी सिलेक्शन होऊ दे रे देवा" त्याने मनोमन देवाची प्रार्थना केली. मग धडधडत्या ह्रदयाने तो दार लोटून आत शिरला. समोरच बसलेल्या करारी चेहऱ्याच्या अग्रवालशेठला त्याने नमस्कार केला आणि आपली फाईल त्यांच्यासमोर ठेवली. अग्रवालशेठने त्याला साधं "बसा" म्हणण्याचंही सौजन्य दाखवलं नाही. "अरे बापरे! तुम्ही तर मेकॅनिकल इंजीनियर आहात. अशोक, मग तुम्ही ऑफिस असिस्टंटसाठी का अप्लाय केलात?" अग्रवालशेठने अशोकच्या प्रमाणपत्रांकडे बघत विचारलं. अशोक ओशाळवाणं हसला. मग म्हणाला. "काय करणार सर, दोन वर्ष झालीत बी. ई. होऊन, पण अजून नोकरी नाही. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली...
धुळवड – Marathi Story

धुळवड – Marathi Story

लेखमाला, Slider
धुळवड - लेखक: दीपक तांबोळी. ('कथा माणुसकीच्या' या पुस्तकातील एक कथा) - Marathi Story आरवने घड्याळात पाहीलं. सकाळचे आठ वाजले होते. त्याच्या मित्रांचा अजून पत्ता नव्हता. खरं म्हणजे ते येणार असं काही ठरलं नव्हतं पण दरवर्षीप्रमाणे ते येतील मग रंगांची आतषबाजी सुरु होईल अशी त्याला अपेक्षा होती. "आरव, अंघोळ करुन घे रे". किचनमधून आई ओरडली. तिने असं ओरडायची ही तिसरी वेळ होती. आरवने तिला काहीही उत्तर दिलं नाही. आपण मित्रांची वाट बघतोय हे तो तिला कोणत्या तोंडाने सांगणार होता? कारण गेल्या कित्येक महिन्यात कुणीही मित्र त्याला भेटायला आला नव्हता किंवा तो स्वतःही कुणाला भेटायला गेला नव्हता. पण आजतरी कुणीतरी येईल ही आशा सोडवत नव्हती म्हणून तो दरवाजाकडे डोळे लावून बसला होता. नऊ वाजले तसं त्याला निराशेने घेरलं. अजूनही त्याचे मित्र आले नव्हते आणि त्यांनी का यावं? आरवने बारावी नापास झाल्यानंतर सग...
मोबदला – Marathi Story

मोबदला – Marathi Story

अनुभव, लेखमाला, Slider
मोबदला - लेखक: दीपक तांबोळी. ('रंग हळव्या मनाचे' या पुस्तकातील एक कथा) - Marathi Story शिरीष जसा घरात शिरला तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली, "अहो जरा अण्णांना बघता का? खूप अस्वस्थ वाटताहेत. जेवलेही नाहीत". "हो. फ्रेश झालो की लगेच बघतो". बाथरुममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रुममध्ये गेला. नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते. जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं. खरंच अस्वस्थ वाटत होते. त्यांचे खोल गेलेले डोळे, निस्तेज नजर, चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं. लक्षण काही ठिक दिसत नव्हतं. "काय झालं अण्णा? काय होतंय?" स्वतःलाच धीर देत त्यानं विचारलं. अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला. त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले पण ते शिरीषला समजले नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला, "काय म्हणालात कळलं नाही, परत एकदा सांगा". ...
चूक – Marathi Story

चूक – Marathi Story

लेखमाला, Slider
चूक - लेखक: दीपक तांबोळी. ('रंग हळव्या मनाचे' या पुस्तकातील एक कथा) - Marathi Story निर्मलाबाई नाही नाही म्हणत असतांनाही वसंतरावांनी त्यांना दवाखान्यात अँडमीट केलं. नर्स निर्मलाबाईंना सलाईन लावत असतांना ते शांतपणे निर्मलाबाईंच्या आजाराने उतरलेल्या चेहऱ्याकडे पहात राहिले. निर्मलाबाईंची या वर्षातली दवाखान्यात ऍडमिट होण्याची ही तिसरी वेळ होती. आणि मागच्या दोन वर्षातली सातवी. खरं म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षी असं सारखं सारखं आजारी पडायचं तसं निर्मलाबाईंना काही कारण नव्हतं. घरात अनेक वर्षापासून समृद्धी नांदत होती. प्रत्येक गोष्टीत साथ देणारा नवरा होता. मुलामुलींची लग्न होऊन दोघंही त्यांच्या घरी सुखासमाधानात होते. पण आयुष्यात आलेला रिक्तपणा निर्मलाबाईंना त्रासदायक ठरला होता. त्यांचं खाण्यापिण्यावरचं लक्ष उडालं होतं. त्यातच देवाधर्माच्या नावाखाली केलेल्या उपासातापासांनी त्यांचं शरीर कमकुवत झा...
कुंडली योग – Horoscope

कुंडली योग – Horoscope

लेखमाला, Slider
कुंडलीयोग - Horoscope : लेखक - दीपक तांबोळी 'कथा माणुसकीच्या' या पुस्तकातील एक कथा'- (कुंडली योग - Horoscope) ‘श्रीगणेश ज्योतिष कार्यालय’ ही पाटी वाचून मी आत शिरलो.  आतमध्ये १०-१२ जण बसले होते.  त्यातल्या एकाला मी "गुरुजी आहेत का?", असं विचारलं.  त्याने होकारार्थी मान हलवली.  आतल्या खोलीतून कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता.  बहुतेक गुरुजी कुणाला तरी भविष्य सांगत होते.  बाहेरच्या गर्दीवरुन गुरुजी चांगलेच प्रसिद्ध ज्योतिषी असावेत असा अंदाज येत होता. एकदिड वर्षांपूर्वी मी जर एखाद्या ज्योतिषीकडे एवढी गर्दी पाहिली असती तर मी नक्कीच या लोकांच्या अंधश्रद्धेवर हसलो असतो. तसा मी नास्तिकच. ज्योतिष हे थोतांड आहे असं मानणारा. आकाशातील करोडो मैलांवरचे ग्रह माणसांच्या जीवनावर कसले परीणाम करणार असं म्हणून ज्योतिषशास्त्राची येथेच्छ टिंगलटवाळी करणारा. पण गेल्या...
कर्तव्य (Marathi Story Kartavya)

कर्तव्य (Marathi Story Kartavya)

लेखमाला
कर्तव्य (Marathi Story -Kartavya) लेखक: दीपक तांबोळी. ('कथा माणुसकीच्या' या पुस्तकातील एक कथा) - (Marathi Story Kartavya) बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला-बूट शिवण्याचं काम करत होता. कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने आपली मान वर केली. समोर एक वयस्कर ग्रुहस्थ उभे होते. "अरे ही चप्पल शिवायची आहे." समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटत होती. विचार करताकरता त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली. "तुम्ही जोशी सर ना?" त्याने विचारलं. "हो. तू? मला कसा ओळखतोस?" "सर, मी गजानन. गजानन लोखंडे, झेड. पी. च्या शाळेत दहावी-ब च्या वर्गात होतो बघा. तुम्ही आम्हांला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे." "बरोबर. पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये." जोशी सर त्याला निरखत म्हणाले. "असू द्या सर. मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन. शिवाय आम्ही नेहमी मागच्या बाकावर बसणारे. कध...
error: Content is protected !!