अभिनेता किशोरकुमार यांचे पार्श्वगायक: Playback Singers of Actor Kishor Kumar
| |

अभिनेता किशोरकुमार यांचे पार्श्वगायक?

लेखाचे शिर्षक वाचून आपण दचकला असालच! शिर्षक चुकले कि आपण वाचायला चुकलात?

नाही शिर्षक बरोबरच आहे.

मग हे कसे शक्य आहे?

किशोरकुमार तर हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय समजले जातात. त्यांनी असंख्य नायकांना पार्श्वगायनासाठी आपला आवाज उसना देवून त्यांची कारकीर्द उंचावली आहे.

वर्ष १९४८ च्या ‘जिद्दी’ ह्या चित्रपटातील ‘मरने की दुआएँ क्यों माँगू’ पासून १९८८च्या ‘वक्त कि आवाज’ ह्या चित्रपटातील ‘गुरु गुरु’ ह्या गाण्यापर्यंत म्हणजेच देव आनंद पासून मिथुन चक्रवर्ती पर्यंतच्या अभिनेत्यांकरीता २६०० हून अधिक हिंदी चित्रपट गीतांचे पार्श्वगायन किशोरकुमार यांनी केलेले आहे.

मग असे असताना किशोरकुमार यांच्यासाठी इतर गायकांनी पार्श्वगायन केलेले आहे, हे कसे शक्य आहे?

किशोरकुमार त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांच्या गायनाविषयी गंभीर नव्हते. त्यांच्या आवाजातील वैशिष्ट्य अथवा वेगळेपणा जाणून अनेक संगीतकारांनी त्यांच्या आवाजाचा पार्श्वगायनासाठी वापर केला तरी त्यांना अभिनयात जास्त रस होता. त्यामुळे १९४६च्या ‘शिकारी’ चित्रपटापासून १९६८च्या ‘श्रीमानजी’ ह्या चित्रपटापर्यंत किशोरकुमार यांनी चक्क ७५ चित्रपटात अभिनय केलेला आहे. तर १९६९ ते १९८९ पर्यंत केवळ १५ चित्रपटांत त्यांनी अभिनय केला आहे. त्यातील एक चित्रपट ‘ममता की छांव मैं’ हा १९८९ मध्ये त्यांच्या मृत्युपश्चात प्रदर्शित झाला होता.

१९६९च्या ‘आराधना’ पासून मात्र त्यांची गायनाची कारकीर्द बहरली असे म्हणावयास हरकत नाही किंवा त्यापुढे प्रत्येक संगीतकारांची पुरुष गायकात पहिली निवड किशोरकुमार राहिली होती. १९६९ नंतर त्यांनी पार्श्वगायनावावर लक्ष केंद्रित केले आणि १९६९ ते १९८७ पर्यंत त्यांनी सुमारे ९५० हून अधिक चित्रपटासाठी २००० हून अधिक गाण्यांकरीता पार्श्वगायन केले. किशोरकुमार एक परिपूर्ण कलाकार होते, त्यामुळे विनोदी तसेच गंभीर भूमिकाही त्यांनी सादर केल्या आहेत. तसेच स्वतः निर्माता, लेखक, कवी, पार्श्वगायक, संगीतकार आणि अभिनेता अशा सबकुछ ‘किशोरकुमार’ टाईपचे चित्रपटही त्यांनी दिले आहेत.

त्यामुळे त्यांच्या १९४६च्या ‘शिकारी’ चित्रपटापासून १९६८च्या ‘श्रीमानजी’ ह्या चित्रपटापर्यंतच्या ७५ चित्रपटांना विविध संगीतकारांनी संगीत दिले आहे. त्या प्रत्येक संगीतकारांनी काही ना कारणाने किशोरकुमार यांच्यावर चित्रीत झालेल्या गाण्यांकरीता गायक किशोरकुमार ऐवजी अभिनेता किशोरकुमार डोळ्यासमोर ठेवून किशोरकुमार यांच्यासाठी अन्य प्रसिद्ध गायकांचा वापर केलेला दिसतो. आणि तीच गाणी आज आपण पाहणार आहोत.

चला तर आपण आता तेच पाहणार आहोत शिवाय ती गाणीही ऐकणार आहोत. किशोरकुमार यांना अन्य गायकांचा आवाज कसा शोभून दिसतो हे पाहण्यासाठी १० निवडक गाण्यांचे व्हिडीओ येथे उपलब्ध करून दिले आहेत. गंमतीची गोष्ट म्हणजे आशा भोसले यांनी चक्क किशोरकुमार यांच्यासाठी गाणे गायले आहे. मोहम्मद रफी यांनी किशोरकुमार यांच्यासाठी गायलेली २-३ गाणी बऱ्याच जणांच्या परिचयाची असतीलच, पण किशोरकुमार यांच्यासाठी मन्ना डे, महेंद्र कपूर, एस. डी. बातीश (पं. शिव दयाळ बातीश) तसेच चक्क उस्ताद बडे फतेह अली खां यांनी सुद्धा किशोरकुमार यांच्याकरीता पार्श्वगायन केले आहे. किशोरकुमार यांना सर्व गायकांचा आवाज छान शोभून दिसतोच परंतु किशोरकुमार यांनीही छान अभिनय केलेला जाणवते. शिवाय स्वतः गायक असल्यामुळे किशोरकुमार यांना ओठांच्या हालचाली (Lip Sync) चांगल्याच जमल्या आहेत.

आज ह्या गाण्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत.

सुरुवातीला पाहूया गाणे ‘छेड दिये मेरे दिलके तार क्यूँ’ हे रागदारीवर आधारलेले गाणे.

गाणे क्र. १: ‘छेड दिये मेरे दिलके तार क्यूँ’, चित्रपट: रागिणी (वर्ष १९५८), गायक: उस्ताद अमानत अली खां आणि उस्ताद बडे फतेह अली खां, गीतकार: जाँ निसार अख़्तर, संगीतकार: ओ. पी. नय्यर

हे गाणे गायले आहे चक्क उस्ताद अमानत अली खां आणि उस्ताद बडे फतेह अली खां ह्या सख्या भावांनी! पंजाबमधील होशियारपूर येथे जन्मलेले उस्ताद अमानत अली खां आणि उस्ताद बडे फतेह अली खां हे पतियाळा घराण्याच्या संगीत परंपरेतील शास्त्रीय गायक होते, फाळणीनंतर ते पाकिस्तानात स्थायिक झाले. आपल्या गाण्यांत कुठल्याही प्रकारची तडतोड न करणारे संगीतकार ओ. पी. नय्यर यांनी त्याकाळी ह्या गाण्याकरीता पाकिस्तानी गायकांचा वापर केला हे विशेष! या दोन्ही गायकांची जुगलबंदी ह्या गाण्यात आहे. आणि ह्या गाण्यात पडद्यावर रागदारी गाताना चक्क किशोरकुमार दिसतोय. उस्ताद बडे फतेह अली खां यांनी किशोरकुमार करीता पार्श्वगायन केले आहे. राग ‘कमोद’ मध्ये ह्या गाण्याची रचना केली आहे.

गाणे क्र. १: ‘छेड दिये मेरे दिलके तार क्यूँ’, चित्रपट: रागिणी (वर्ष १९५८), गायक: उस्ताद अमानत अली खां आणि उस्ताद बडे फतेह अली खां, गीतकार: जाँ निसार अख़्तर, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. २: ‘अजब है दास्ताँ तेरी ऐ जिन्दगी’, चित्रपट: शरारत (वर्ष १९५९), गायक: मोहम्मद रफी, गीतकार: शैलेंद्र, संगीतकार: शंकर जयकिशन

हे गाणे चित्रपटात २ वेळा आहे, खालच्या चित्रफितीत ह्या गाण्याची ही दोन्ही रूपे पाहावयास मिळतील. वर म्हटल्याप्रमाणे किशोरकुमार यांना रफी यांचा आवाज शोभतो.

गाणे क्र. २: ‘अजब है दास्ताँ तेरी ऐ जिन्दगी’, चित्रपट: शरारत (वर्ष १९५९), गायक: मोहम्मद रफी, गीतकार: शैलेंद्र, संगीतकार: शंकर जयकिशन

गाणे क्र. ३: ‘मन मोरा बावरा’, चित्रपट: रागिणी (वर्ष १९५८), गायक: मोहम्मद रफी, गीतकार: जाँ निसार अख़्तर, संगीतकार: ओ. पी. नय्यर

रागिणी चित्रपटातील किशोरकुमार यांच्यावर चित्रीत झालेले हे आणखी एक शास्त्रीय गाणे. रफी यांच्या आवाजातील हे गाणे ऐकल्यावर इथे रफी हेच का हवे हे लक्षात येते. (Kishore Kumar and Mohammad Rafi)

गाणे क्र. ३: ‘मन मोरा बावरा’, चित्रपट: रागिणी (वर्ष १९५८), गायक: मोहम्मद रफी, गीतकार: जाँ निसार अख़्तर, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. ४: ‘आप हुए मेरे बलम’, चित्रपट: करोडपती (वर्ष १९६१), गायक: मन्ना डे आणि लता मंगेशकर, गीतकार: शैलेंद्र, संगीतकार: शंकर जयकिशन

ह्याचा चित्रपटात ‘पहले मुर्गी हुई थी की अंडा’ हे मन्ना डे यांनी गायलेले आणि किशोरकुमार ह्यांच्यावर चित्रित झालेले अजून एक गाणे.

गाणे क्र. ४: ‘आप हुए मेरे बलम’, चित्रपट: करोडपती (वर्ष १९६१), गायक: मन्ना डे आणि लता मंगेशकर, गीतकार: शैलेंद्र, संगीतकार: शंकर जयकिशन

गाणे क्र. ५: ‘अपनी आदत है’, चित्रपट: प्यार दिवाना (वर्ष १९७२), गायक: मोहम्मद रफी, गीतकार: असद भोपाली, संगीतकार: लाला सत्तार

मोहम्मद रफी यांचा आवाज किशोरकुमार यांना किती शोभतो ते ह्या गाण्यात दिसते.

गाणे क्र. ५: ‘अपनी आदत है’, चित्रपट: प्यार दिवाना (वर्ष १९७२), गायक: मोहम्मद रफी, गीतकार: असद भोपाली, संगीतकार: लाला सत्तार

गाणे क्र.६: ‘चले हो कहाँ करके जी बेकरार’, चित्रपट: भागम भाग (वर्ष १९५६), गायक: मोहम्मद रफी आणि आशा भोसले, गीतकार: मजरूह सुलतानपुरी, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र.६: ‘चले हो कहाँ करके जी बेकरार’, चित्रपट: भागम भाग (वर्ष १९५६), गायक: मोहम्मद रफी आणि आशा भोसले, गीतकार: मजरूह सुलतानपुरी, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र.७: ‘हमने तो दिल बिछा दिया’, चित्रपट: अलबेला मस्ताना (वर्ष १९६७), गायक: महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर, गीतकार: प्रेम धवन, संगीतकार: एन. दत्ता

गाणे क्र.७: ‘हमने तो दिल बिछा दिया’, चित्रपट: अलबेला मस्ताना (वर्ष १९६७), गायक: महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर, गीतकार: प्रेम धवन, संगीतकार: एन. दत्ता

गाणे क्र.८: ‘दिल दिया दौलत को ऐ इंसान तूने क्या किया’, चित्रपट: भागम भाग (वर्ष १९५६), गायक: मोहम्मद रफी आणि एस. डी. बातीश, गीतकार: मजरूह सुलतानपुरी, संगीतकार: ओ. पी. नय्यर

हे गाणे मा. भगवान आणि किशोरकुमार यांच्यावर चित्रित झाले आहे आणि किशोरकुमार यांच्यासाठी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि संगीतकार पंडित शिव दयाळ बातीश (एस. डी. बातीश) यांनी आवाज दिला आहे.

गाणे क्र.८: ‘दिल दिया दौलत को ऐ इंसान तूने क्या किया’, चित्रपट: भागम भाग (वर्ष १९५६), गायक: मोहम्मद रफी आणि एस. डी. बातीश, गीतकार: मजरूह सुलतानपुरी, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. ९: ‘हो गई शाम, दिल बदनाम’, चित्रपट: नॉटी बॉय (वर्ष १९६२), गायक: मन्ना डे आणि आशा भोसले, गीतकार: शैलेंद्र, संगीतकार: सचिन देव बर्मन

ह्या चित्रपटात अजून सहा गाणी किशोरकुमार यांनी गायली असताना किशोरकुमार यांच्यावर चित्रीत झालेल्या ह्या एकाच गाण्याला मन्ना डे यांचा आवाज का दिला असावा हे कोडेच आहे.

असो, पण मन्ना डे यांचाही आवाज किशोरकुमार यांना शोभतो हे दिसून येते.

गाणे क्र. ९: ‘हो गई शाम, दिल बदनाम’, चित्रपट: नॉटी बॉय (वर्ष १९६२), गायक: मन्ना डे आणि आशा भोसले, गीतकार: शैलेंद्र, संगीतकार: सचिन देव बर्मन

आणि आजच्या लेखातील शेवटचे आणि आश्चर्यकारक गाणे!

किशोरकुमार हे बहुगुणी गायक असल्यामुळे त्यांनी काही गाणी स्त्रीच्या आवाजात गायलेली आहेत. पण संगीतकार ओ. पी. नय्यर यांना ते मान्य नसावे, म्हणूनच ‘बाप रे बाप’ ह्या चित्रपटातील एका गाण्यासाठी किशोरकुमार ह्यांच्याकरीता ओपींनी चक्क आशा भोसलें यांचा आवाज वापरला. किशोरकुमार यांनी न कुरकुरता ह्या गाण्यावर छानसे नृत्यही केलेले दिसते.

गाणे क्र. १०: ‘जाने भी दे छोड़ ये बहाना’, चित्रपट: बाप रे बाप (वर्ष १९५५), गायक: आशा भोसले, गीतकार: जाँ निसार अख़्तर, संगीतकार: ओ. पी. नय्यर

गाणे क्र. १०: ‘जाने भी दे छोड़ ये बहाना’, चित्रपट: बाप रे बाप (वर्ष १९५५), गायक: आशा भोसले, गीतकार: जाँ निसार अख़्तर, संगीतकार: ओ. पी. नय्यर

किशोरकुमार यांना अशा जवळपास २० गाण्यांकरीता अन्य गायकांनी पार्श्वगायन केले आहे, त्यात रफी यांनी ७ आणि मन्ना डे यांनी ६ गाणी गायलेली आढळतात. अन्य दोन गाण्यात किशोरकुमार यांच्यावर चित्रीत झालेली दोन गाणी हेमंत कुमार यांनी गायलेली आहेत, परंतु ती गाणी पार्श्वभूमीवर गायली गेली असल्याने इथे ती गाणी दाखवलेली नाहीत.

१९६७चा बंगाली चित्रपट ‘दुस्तु प्रजापती’ ह्या चित्रपटात हेमंत कुमार यांनी किशोरकुमार साठी एका गाणे म्हटले आहे.

किशोरकुमार यांच्याविषयीचे माझे इतर लेख वाचा:

अभिनेता किशोरकुमार यांचे पार्श्वगायक: Playback Singers of Actor Kishorkumar– लेखाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलक – चारुदत्त सावंत, २०२१. मोबाईल क्र. ८९९९७७५४३९

कृपया आपला अभिप्राय आणि सूचना कळवाव्यात.

आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना हा लेख सामायिक करा.

References:

DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have used audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links. No downloading has been provided. Any lawful copyright owner does not wish to keep their content on our website, may inform us about it, so that we will remove it from our website.

अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत. आमच्या वेबसाइटवर आम्ही कुठल्याही सामुग्रीचे डाउनलोड उपलब्ध करून दिलेले नाही. कोणीही कायदेशीर कॉपीराइट मालक जर आपली सामग्री आमच्या वेबसाइटवर ठेवू इच्छित नसतील, तर त्याबद्दल आम्हाला कळविल्यास आम्ही ती सामुग्री आमच्या वेबसाइटवरून काढून टाकू.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2023 Charudatta Sawant
Acknowledgements: The concept of the article and articl more...

Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply