SHANKAR JAIKISHAN – KISHOR AND ASHA शंकर जयकिशन – किशोर आणि आशा
सूचना: लेखातील गाण्याचे सर्वाधिकार आणि स्वामित्व हे त्या गाण्याचे अधिकार असलेल्या कंपनीकडे आहेत.
या लेखात वापरलेली गाणी हि केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी आणि माहितीकरिता वापरली आहेत. लेखकाला त्यापासून कुठलाही व्यावसायिक लाभ मिळण्यासाठी सदर गाणी वापरली नाहीत. जर कोणास आक्षेप असेल तर आणि जर त्यांनी तसे कळविल्यास सदर गाणे या लेखातून काढून टाकण्यात येईल.
हिंदी चित्रपट सृष्टीच्या संगीतमय सुवर्णकाळाचे एक घटक म्हणून ‘शंकर-जयकिशन‘ म्हणजे शंकरसिंह रघुवंशी व जयकिशन दयाभाई पांचाल ह्या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीचे नाव आघाडीवर घ्यावेच लागेल. १९४९ च्या ‘बरसात’ चित्रपटापासून सुरु झालेली त्यांची संगीत कारकीर्द १९७१ च्या ‘अंदाज’ चित्रपटापर्यंत त्यांची साथ कायम राहिली होती. शंकर-जयकिशन यांनी सुरुवातीला मुकेश, मन्नाडे, लता यांचा जास्तीजास्त वापर केला. रफीचा वापर तसा मर्यादितच होता. परंतु साधारण १९६० पासून, म्हणजेच शम्मीकपूरच्या उदयानंतर शंकर-जयकिशन यांच्या कॅम्पमध्ये रफीचा वापर मुख्य गायक म्हणून झालेला जाणवतो.
शंकर-जयकिशन यांच्या सांगीतिक कारकीर्दीतील एका वेगळ्या वैशिष्ट्याविषयी आज मी आपले लक्ष वेधू इच्छीतो.
किशोरकुमार आणि आशा यांची द्वंद्वगीते म्हटले कि जुन्या काळातील सचिनदेव बर्मन आणि नव्या पिढीतील त्यांचा मुलगा राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली कित्येक गाणी लगेच आठवतात, किंबहुना त्यातील कित्येक गाणी आपल्याला तोंडपाठ देखील असतील.
परंतु शंकर-जयकिशन सोबत किशोरकुमार आणि आशा हे समीकरण मात्र अनेकांना ठाऊक नाही. या चौघांनी केलेली गाणी फार कमी लोकांच्या ऐकण्यात आहेत. काहींना जरी ती गाणी माहिती असली तरी ही गाणी शंकर जयकिशन यांची असतील हे ठाऊक नसेल.
शंकर-जयकिशन यांनी किशोरकुमार याचा आवाज यापूर्वी कमीच वापरला होता. नई दिल्ली, रंगोली, शरारत, करोडपती, बेगुनाह ह्या किशोरकुमार अभिनित पाच चित्रपटात गायक-नट म्हणून किशोरकुमारचा वापर शंकर-जयकिशन यांनी केलेला आढळतो. तोच प्रकार आशा भोसलेच्या बाबतीत झालेला दिसतोय. शंकर-जयकिशन यांनी आशाचा वापर कमी केलेला आहे. तशी आशाला दिलेली गाणी तर खासच आहेत. तसेच तलत, हेमंतकुमार, सुबीर मुखर्जी, सुमन कल्याणपूर अशा अनेक गायकांचा वापर शंकर-जयकिशन यांनी केलेला आहे, पण आजचा विषय वेगळा आहे, त्याविषयी नंतर कधी बोलू.
परंतु साधारण १९६८ साली ‘दुनिया’ या देव आनंद आणि वैजयंतीमाला अभिनित चित्रपटात ‘किशोर कुमार’चा आवाज नायकाच्या तोंडी ऐकायला मिळाला. ह्या चित्रपटातील नायक-नायिकेवर चित्रीत झालेले, ‘दूरीयां नजदिकीयां बन गयी… ‘ हे किशोरकुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं द्वंद्वगीत शंकर-जयकिशन यांच्या संगीतमय कारकीर्दीला एक वेगळे वळण लावणारे ठरले असे माझे मत आहे. हे द्वंद्वगीत ऐकल्यावर कानसेनांना एक सुखद धक्का बसला असणार यात शंका नाही. याच सुमारास १९६८ पासून किशोरचा मुख्य गायक म्हणून बोलबाला झाला होता. असा वेळेस शंकर-जयकिशन यांनी किशोरकुमार आणि आशा भोसले यांचा चांगला वापर करून अनेक चित्रपटात किशोरकुमार आणि आशा भोसले यांना द्वंद्वगीत गायला दिली आहेत.
१९६८ नंतर एकदम १९७१ मध्ये ‘उमंग’ ह्या चित्रपटापासून पुढे अनेक चित्रपटांत शंकर-जयकिशन यांनी किशोरकुमार आणि आशा भोसले यांना द्वंद्वगीत गायला दिली आहेत. त्यापैकी काही गाणी आता आपण पाहणार किंवा ऐकणार आहोत.
हि गाणी ऐकताना शंकर जयकिशन यांनी रफी आणि आशा यांना दिलेल्या द्वंद्वगीतांसारखाच एक वेगळाच अनुभव आणि आनंद मिळतो. शंकर जयकिशन यांच्या गाण्याच्या रचनेप्रमाणे गाण्याच्या सुरुवातीला पियानोची धून, गिटार इत्यादी वाद्यांना असलेली व्ह्ययोलिन आणि ऑर्केस्ट्राची सोबत या सर्वांचा वापर करुन बनवलेली एखाद्या गाण्यापेक्षाही मधुर चालीच्या लांबलचक प्रील्यूडने सुरु होणारे गाणे हे सर्व रफी-लता किंवा रफी-आशा यांच्या आवाजात ऐकण्याची सवय झालेली होती, त्या कानाला त्याच साच्यातील किशोर-आशाची द्वंद्वगीते मनाला एक वेगळ्याच विश्वात नेतात, हे मी अनुभवले आहे. आणि मुख्य म्हणजे किशोर आणि आशा दोघांचीही त्या सर्व गाण्यांना चांगलाच न्याय दिलेला आहे. संगीतकारास अभिप्रेत असलेला मूड दोन्ही गायकांनी व्यवस्थित पकडलेला आहे. तसेच काही गाणी यापूर्वीच्या रफी-आशा यांच्या द्वंद्वगीतांची आठवण देखील करून देतात
ह्या गाण्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या चौकडीची गाणी येणे सुरु झाली आणि लगेचच वर्ष १९७१ मध्ये संगीतकार जयकिशन हे जग सोडून गेले. तेथून पुढची बरीच गाणी संगीतकार शंकर यांनी रचली आहेत. त्यामुळे जयकिशन आणि शंकर यांच्यातील गाण्याची चाल आणि वाद्यवृंद यातील फरक जाणकाराला जाणवतो.
गाणे क्रमांक १: ‘दूरीयां नजदिकीयां बन गयी’. चित्रपट: दुनिया
वर्ष: १९६८. गीतकार: हसरत जयपुरी. पडद्यावरील कलाकार: देव आनंद, वैजयंतीमाला
गाणे क्रमांक २: ‘तेरे मेरे प्यार का अंदाज है निराला’. चित्रपट: नगिना. वर्ष: १९७० (अप्रदर्शित).
गीतकार: हसरत जयपुरी. राग: पहाडी. पडद्यावरील कलाकार: संजय खान आणि लीना चंदावरकर.
गाणे क्रमांक ३: ‘सच्चा प्यार तो झुक नही सकता’. चित्रपट: उमंग.
वर्ष: १९७१. गीतकार: हसरत जयपुरी. पडद्यावरील कलाकार: सतीशकुमार, अर्चना.
ह्याच गाण्याची दुसरी आवृत्ती: पडद्यावर: सतीशकुमार, अर्चना, सुभाष घई, पेंटल आणि इतर
गाणे क्रमांक ४: ‘मुझको थंड लग रही है’. चित्रपट: ‘मै सुंदर हूं‘.
वर्ष: १९७१. गीतकार: आनंद बक्षी. पडद्यावरील कलाकार: विश्वजित, लीना चंदावरकर
गाणे क्रमांक ५: ‘दो मस्ताने, दो दिवाने’. चित्रपट: ‘मै सुंदर हूं’.
वर्ष: १९७१. गीतकार: आनंद बक्षी. पडद्यावरील कलाकार: विश्वजित, लीना चंदावरकर
गाणे गाणे क्रमांक ६: ‘नाच मेरी जान, फाटाफाट’. चित्रपट: ‘मै सुंदर हूं’.
वर्ष: १९७१. गीतकार: आनंद बक्षी. पडद्यावरील कलाकार: मेहमूद, जयश्री टी.
ह्या गाण्याचे वैशिष्टय म्हणजे गाण्याच्या सुरुवातीला स्वतः क्रमाक्रमाने संगीतकार शंकर, गीतकार आनंद बक्षी, संगीतकार जयकिशन आणि गायक किशोरकुमार पडद्यावर दिसत आहेत.
गाणे क्रमांक ७: ‘आप यहा आये किस लिए ‘. चित्रपट: कल आज और कल
वर्ष: १९७१. गीतकार: नीरज. पडद्यावरील कलाकार: रणधीर कपूर, बबीता
गाणे क्रमांक ८: ‘हम जब होंगे साठ साल के’. चित्रपट: कल आज और कल
वर्ष: १९७१. गीतकार: शैलेंद्र. पडद्यावरील कलाकार: रणधीर कपूर, बबीता
गाणे क्रमांक ९: ‘टिक टिक टिक टिक, चलती जाये घडी’. चित्रपट: कल आज और कल. वर्ष: १९७१.
गीतकार: नीरज. पडद्यावरील कलाकार: रणधीर कपूर, बबीता, राज कपूर, पृथ्वीराज कपूर
सहगायक: मुकेश
गाणे क्रमांक १०: ‘वक्त थोडासा अभी कुछ और गुजर जाने दो’. चित्रपट: सीमा
वर्ष: १९७१. गीतकार: इंदीवर (शामलाल बाबू राय). पडद्यावरील कलाकार: कबीर बेदी, सिमी गरेवाल
गाणे क्रमांक ११: ‘दिल मेरा खो गया, खो जाने दो’. चित्रपट: सीमा
वर्ष: १९७१. गीतकार: वर्मा मलिक. पडद्यावरील कलाकार: राकेश रोशन, भारती
गाणे क्रमांक १२: ‘आंखो आंखो मे बात होने दो ‘. चित्रपट: आंखो आंखो में
वर्ष: १९७१. गीतकार: हसरत जयपुरी. पडद्यावरील कलाकार: राकेश रोशन, राखी
गाणे क्रमांक १३: ‘दो बाते प्यार भरी कर लू ‘. चित्रपट: आंखो आंखो में
वर्ष: १९७१. गीतकार: वर्मा मलिक. पडद्यावरील कलाकार: राकेश रोशन, राखी
गाणे क्रमांक १४: ‘तेरा मेरा मेल है मिलाया राम ने’. चित्रपट: आंखो आंखो में
वर्ष: १९७१. गीतकार: वर्मा मलिक. पडद्यावरील कलाकार: राकेश रोशन, राखी
एकदा तरी वरील गाणे ऐकावे किंवा पहावे, शंकर-जयकिशन यांनी रफी यांना दिलेल्या पूर्वीच्या एका गाण्याचे हे दुसरे रूप आहे.
गाणे क्रमांक १५: ‘आजा रे आजा ‘. चित्रपट: आंख मिचौली
वर्ष: १९७२. गीतकार: राजेंद्रकृष्ण. पडद्यावरील कलाकार: राकेश रोशन, भारती
गागाणे क्रमांक १६: ‘मस्ती और जवानी हो’. चित्रपट: दिल दौलत दुनिया
वर्ष: १९७२. गीतकार: वर्मा मलिक. पडद्यावरील कलाकार: राजेश खन्ना, हेलन, साधना
सहगायिका: शारदा
गाणे क्रमांक १७: ‘फुलो कि ताजगी हो तुम’. चित्रपट: बंदगी
वर्ष: १९७२. गीतकार: राजेंद्रकृष्ण. पडद्यावरील कलाकार: विनोद मेहरा, संध्या रॉय
हि गाणी शोधताना अचानक दोन छान गाण्यांचा शोध लागला. हि गाणी आजच्या विषयाच्या बाहेरची असली तरी, गायिका वगळता बाकीचे सर्व सारखेच आहे. आणि त्या गायिकांनी गाण्यातील आशाचा मूड अजिबाला कमी पडू दिलेला नाही. ती गाणी आपल्याला ऐकविण्याचा मला आवरत नाहीय. म्हणू ती दोन गाणी आपल्यापुढे ठेवत आहे.
गाणे क्रमांक १८: ‘छत्री ना खोल’. चित्रपट: दो झूठ
वर्ष: १९७५. गीतकार: एम. जी. हशमत. पडद्यावरील कलाकार: विनोद मेहरा, मौशमी चॅटर्जी
गायक: किशोरकुमार, उषा मंगेशकर
गाणे क्रमांक १९: ‘चलो भूल जाये यहा से’. चित्रपट: दो झूठ
वर्ष: १९७५. गीतकार: विठ्ठलभाई पटेल. पडद्यावरील कलाकार: विनोद मेहरा, मौशमी चॅटर्जी
गायक: किशोरकुमार, लता मंगेशकर
ह्याच चौकडीची अजूनही काही आहेत, काही सापडली नाहीत. आणि काही गाणी तितकीशी मला आवडली नाहीत, आणि विस्तारभयास्तव येथे दिलेली नाहीत. जसजशी नवीन गाणी सापडतिलताशी ह्या लेखात भर घातली जाईल.
लेखाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलक – चारुदत्त सावंत, २०२१. मोबाईल क्र. ८९९९७७५४३९
कृपया आपला अभिप्राय आणि सूचना कळवाव्यात.
सूचना: लेखातील गाण्याचे सर्वाधिकार आणि स्वामित्व हे त्या गाण्याचे अधिकार असलेल्या कंपनीकडे आहेत.
या लेखात वापरलेली गाणी हि केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी आणि माहितीकरिता वापरली आहेत. लेखकाला त्यापासून कुठलाही व्यावसायिक लाभ मिळण्यासाठी सदर गाणी वापरली नाहीत. जर कोणास आक्षेप असेल तर आणि जर त्यांनी तसे कळविल्यास सदर गाणे या लेखातून काढून टाकण्यात येईल.
Disclaimer: Copyrights of this article is limited to the writeup and content used in this article. Copyrights of audio and video are reserved with respective owners. We have used/provided links to audio and video through youtube.com
