Bhajans by Ex. PM of India Lal Bahadur Shastri's wife Lalitadevi Shastri

लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललितादेवी शास्त्री यांनी रचलेली भजने (Bhajans by Lalitadevi Shastri)

लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललितादेवी शास्त्री यांनी रचलेली भजने (Bhajans by Lalitadevi Shastri)

लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे

ललितादेवी शास्त्री यांचा जन्म ११ जानेवारी १९१० रोजी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे गणेश प्रसाद श्रीवास्तव यांच्या घरी झाला आणि १६ मे १९२८ रोजी त्यांचा विवाह भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याशी झाला. तेव्हा लाल बहादूर शास्त्री हे काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते होते.

भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या विषयी सर्वच भारतीयांना आदर व प्रेम आहे. त्यांची साधी राहणी, उच्च विचार आणि कणखर व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आजही बहुसंख्य भारतीयांवर आहे. त्यांच्या पत्नी ललितादेवी ह्यांनी पतिव्रता गृहिणी आणि लढवय्या भारतीय नारीचे रूप आपल्या व्यक्तिमत्त्वातून दाखविले आहे. ब्रिटिश काळात लाल बहादूर शास्त्री हे नऊ वर्ष तुरुंगात होते. तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि मुलांचे संगोपन ललितादेवी यांनी एकटीने मोठ्या हिमतीने केले. पुढे पती लाल बहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वेमंत्री आणि पंतप्रधान झाले तरी ललितादेवी यांची धार्मिकवृत्ती आणि राहणीमान आणि विचारसरणी यात फरक पडला नाही.

लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान त्यांनी ‘१०, जनपथ’ ह्या पंतप्रधानाच्या निवासस्थानाच्या आवारात तात्कालीन धान्यटंचाईच्या लढ्याचे प्रतीक म्हणून काही धान्य पेरले होते, लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी एप्रिल १९६६ मध्ये ते पीक मोठे झाल्यावर ललितादेवी यांनी त्या पिकाची स्व:ताच्या हाताने कापणी केल्याचे छायाचित्र उपलब्ध आहे, ह्या प्रसंगावरून ललितादेवींचे व्यक्तीमत्व समजून येते.

(Bhajans by Lalitadevi Shastri)
Mrs Shastri Was Cutting This Crop After 3 Months of PM Shastri Ji’s Demise.

आज आपण ललितादेवी यांच्या व्यक्तीमत्वाचा आणखी एक पैलू जाणून घेणार आहोत. ललितादेवी यांचे शिक्षण किती झाले किती झाले होते ह्याची माहिती सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही. परंतु ललितादेवी यांनी काही भजने लिहिली आहेत, त्यांच्या ४ भजनी रचना चक्क एच.एम.व्ही.ने १९६६ मध्ये ध्वनिमुद्रित केल्या आहेत. लता मंगेशकर यांनी हिंदी भाषेत फारच कमी गैरफिल्मी गाणी गायली आहेत. त्यापैकी भजन मालिकेत लतादीदींनी ललितादेवींची दोन भजने गायलेली आहेत. उर्वरीत दोन भजने रफी यांनी गायली आहेत. त्याकाळी भक्तिगीते आणि सामाजिक गीते यांना सुमधुर चाली बांधणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले संगीतकार चित्रगुप्त (चित्रगुप्त श्रीवास्तव) यांनी ह्या चारही गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. ललितादेवींच्या हि भजने ऐकताना त्यांची प्रतिभा आणि विचारसरणी कळून येते.

गाणे क्र. १: भोला भोला रटते रटते हो गयी नी बंवरीया

ह्या भजनात ललितादेवींनी भोळ्या शंकराच्या रूपाचे आणि गुणाचे छान वर्णन भक्तिरसात केले आहे.

Bhola Bhola Ratate Ratate - Bhajans by Ex. PM of India Lal Bahadur Shastri's wife Lalitadevi Shastri
Bhola Bhola Ratate Ratate – Bhajans by Ex. PM of India Lal Bahadur Shastri’s wife Lalitadevi Shastri | Source: https://www.discogs.com/release/14163528-लत-मगशकर-बत-द-कई-मर-शम-क-डगरय-भल-भल-रटत-र/image/SW1hZ2U6NDI0NDU1MjQ=
गाणे क्र. १: भोला भोला रटते रटते हो गयी नी बंवरीया | गायिका: लता मंगेशकर, कवीयत्री: ललितादेवी शास्त्री, संगीतकार: चित्रगुप्त

गाणे क्र. २: बता दे कोई मुझे श्याम की डगरीया

Bata De Muze Koi Shyam Ki Dagariya - Bhajans by Ex. PM of India Lal Bahadur Shastri's wife Lalitadevi Shastri
Bata De Muze Koi Shyam Ki Dagariya – Bhajans by Ex. PM of India Lal Bahadur Shastri’s wife Lalitadevi Shastri | Source: https://www.discogs.com/release/14163528-लत-मगशकर-बत-द-कई-मर-शम-क-डगरय-भल-भल-रटत-र/image/SW1hZ2U6NDI0NDU1MzQ=
गाणे क्र. २: बता दे कोई मुझे श्याम की डगरीया | गायिका: लता मंगेशकर, कवीयत्री: ललितादेवी शास्त्री, संगीतकार: चित्रगुप्त

गाणे क्र. ३: बाबा, संभल संभल पग धरना

Baba Sambhal Sambhal Pag Dharana - Cassette Cover: Bhajans by Ex. PM of India Lal Bahadur Shastri's wife Lalitadevi Shastri
Cassette Cover: Baba Sambhal Sambhal Pag Dharana – Bhajans by Ex. PM of India Lal Bahadur Shastri’s wife Lalitadevi Shastri
गाणे क्र. ३: बाबा, संभल संभल पग धरना | गायक: मोहमद रफी, कवीयत्री: ललितादेवी शास्त्री, संगीतकार: चित्रगुप्त

गाणे क्र. ४: सब के जीवन प्राण आधार

गाणे क्र. ४: सब के जीवन प्राण आधार | गायक: मोहमद रफी, कवीयत्री: ललितादेवी शास्त्री, संगीतकार: चित्रगुप्त

ललितादेवी शास्त्री नंतर ‘शास्त्री सेवा निकेतन’ नावाची संस्था सुरु करून त्याद्वारे समाजकार्य केले. वयाच्या ८३व्या वर्षी दि. १३ एप्रिल १९९३ रोजी त्यांचे नवी दिल्ली येथे देहावसान झाले.

लोकांपुढे हि माहिती येणे गरजेचे वाटले म्हणून हा प्रपंच! अशा थोर या विभूतीला माझी या लेखाद्वारे आदरांजली!


ललितादेवींची काही छायाचित्रे


लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललितादेवी शास्त्री यांनी रचलेली भजने (Bhajans by Lalitadevi Shastri) – या लेखाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलक: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे – ८९९९७७५४३९, ९२२५६०५९६८


संदर्भ आणि ऋणनिर्देशन (Old Marathi Songs):

  1. Photos taken From: Google.com
  2. Photo By: https://twitter.com/indiahistorypic/status/1250055102842294272
  3. Photo by: LBSMF, CC BY-SA 4.0 https://creativecommons.org/licenses/by-sa/4.0, via Wikimedia Commons
  4. Photo by: https://www.timescontent.com/tss/showcase/preview-buy/7514/Feature/Lalita-Devi-Shastri.html

DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have used audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links. No downloading has been provided. Any lawful copyright owner does not wish to keep their content on our website, may inform us about it, so that we will remove it from our website.

अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत. आमच्या वेबसाइटवर आम्ही कुठल्याही सामुग्रीचे डाउनलोड उपलब्ध करून दिलेले नाही. कोणीही कायदेशीर कॉपीराइट मालक जर आपली सामग्री आमच्या वेबसाइटवर ठेवू इच्छित नसतील, तर त्याबद्दल आम्हाला कळविल्यास आम्ही ती सामुग्री आमच्या वेबसाइटवरून काढून टाकली जाईल.


आमचे गाण्यांचे इतर लेख वाचा:

अविस्मरणीय गाणी – भाग 1: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि वसंत प्रभू

अविस्मरणीय गाणी – भाग 2: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि हृदयनाथ मंगेशकर

अविस्मरणीय गाणी – भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू


बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ते ७ ही लेखमाला माझ्या ब्लॉगवर मी केलेली आहे. आमच्या रेडिओ जयमालावर ह्या लेखांचे श्राव्य रूपांतर केले आहे ते खालील लिंकवर ऐकू शकता:
https://charudattasawant.com/radio-jaymala-playlists/


ह्या लेखात काही सुधारणा अपेक्षित असतील तर त्या आम्हास नक्की कळवाव्यात.


आजचा हा भाग आपणास आवडला असणार यात शंका नाही, पुढील भाग वाचण्यास चूकवू नका. आजच सदस्य नोंदणी करा. फक्त खालील जागेत आपला ई-मेल आयडी टाका. निशुल्क नोंदणी करा.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2022 Charudatta Sawant
Acknowledgements: Article Written by: Mr. Charudatta Sa more...

Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply