मराठी कविता – सूर्य (Marathi Kavita)
सूर्य
कवीयत्री – सौ. अंजली माधव देशपांडे (Marathi Kavita)
सूर्यकिरण ते क्षितीजा वरती,
चमकत ते येई,
चराचराला सोनकळ्यांनी व्यापून ते घेई..॥धृ॥
रंग उषेचे मोहक सुंदर,
उधळित ते जाई,
उजळूनी सृष्टी,
कोमलतेचे स्पर्श ही देई..॥१॥
पूर्व दिशेला उगवूनी,
परतूनी पश्र्चिमेस जाई,
नभात येऊनी सर्व जगाला, संजीवनी देई..॥२॥
देवत्वाने पूजन करता,
परम सुख पाई,
किरणा किरणा मधूनी रविकरा, पूर्णत्वा नेई..॥३॥
सौ. अंजली माधव देशपांडे

कवीयत्री परिचय:
सौ. अंजली माधव देशपांडे
नाशिक, भ्रमणध्वनी: ७०२२८३८४०४६
मराठी, हिंदी व गुजराती भाषांमध्ये कविता करण्याचा छंद.
सर्व कलांची आवड.
Cover Photo Courtesy: : Photo By ExorcisioTe – Own work, CC BY-SA 4.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=71101650
आमचे इतर लेख वाचा:
माझी नर्मदा परिक्रमा-भाग १ ला – लेखिका – स्मिता कढे
माझी नर्मदा परिक्रमा-भाग २ रा – लेखिका – स्मिता कढे
माझी नर्मदा परिक्रमा-भाग ३ रा – लेखिका – स्मिता कढे
