Songs of Lata and Ravi

संगीतकार रवी आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी- भाग १ (Songs of Lata and Ravi – Part 1)

संगीतकार रवी आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी- भाग १ (Songs of Lata and Ravi – Part 1)

हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्ण काळात काही गायिका आणि संगीतकार यांच्या जोड्या प्रसिद्धीस आल्या. उदाहरणार्थ लता आणि सी. रामचंद्र, लता आणि मदनमोहन, आशा आणि ओपी नय्यर इत्यादी. ह्या उल्लेखलेल्या द्वयींची अनेक सुमधुर, अवीट आणि अविस्मरणीय गाणी आजही नव्या-जुन्या पिढीकडून ऐकली जातात.

गेल्या भागात आपण आणखी एक जोडी गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार चित्रगुप्त ह्यांच्या विषयी जाणून घेतले.

आजचा हा लेख गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार रवी ह्यांच्या गाण्यावर आधारित आहे.

एखाद्या संगीतकाराची गाणी म्हटल्याबरोबर त्या संगीतकाराबरोबर एखाद्या गायक अथवा गायिकेचे नाव प्रामुख्याने पुढे येते. तसेच संगीतकार रवी म्हटले किया डोळ्यासमोर आशा आणि रफी किंवा आशा आणि महेंद्रकपूर यांनी गायलेली अनेक लोकप्रिय आणि प्रसिद्ध गाणी आपणास लगेचच आठवतात.

पण गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार रवी या दोघांनी केलेली गाणी लगेचच आठवत नाहीत, किंवा कुणी सांगितल्याशिवाय ते लक्षात येत नाही. किंवा बहुतेकांना ह्या जोडीची ‘खानदान’, ‘आंखे’, ‘दो बदन’ ह्या चित्रपटांमधील गाणी आठवतील, पण आज आपण आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण गाणी ऐकणार आहोत.

आजचा हा लेख गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार रवी ह्यांच्या गाण्यावर आधारित आहे. ह्या दोघांच्या सहयोगाने अतिशय सुंदर गाणी रसिकांना ऐकायला मिळाली आहेत, त्याविषयी आज आपण जाणून घेऊयात.

तसे पहाता ह्या जोडीने साधारण १०० हिंदी चित्रपट गाणी केलेली आहेत, त्यापैकी लतादीदी यांनी गायलेली निवडक ३७ एकल गाणी (सोलो – Solo Songs) आपण येथे ऐकूयात आणि त्यांविषयी अधिक माहिती जाणून घेवूया. गाण्यांची संख्या खूपच मोठी असल्याकारणाने ह्या लेखाचे दोन भाग करावे लागत आहेत. त्यामुळे पहिल्या भागात रवी यांनी संगीतबद्ध केलेली १९५५ ते १९६२ पर्यंतच्या काळातील गाणी ऐकावयास मिळतील. तर दुसऱ्या भागात १९६३ ते १९८६ या कालखंडातील गाणी दिलेली आहेत.

या पहिल्या आणि दुसऱ्या ह्या प्रत्येक कालखंडातील रवी यांची गाणी खूपच वेगळी असल्याचे जाणवते. कदाचित १९६३च्या ‘गुमराह’ ह्या चित्रपटापासून रवी यांच्या संगीताच्या शैलीत बदल झालेला दिसत आहे. ह्या दोन्ही लेखातील गाण्यांचा क्रम हा सदर चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या वर्षाप्रमाणे लावला आहे. त्यामुळे रवी यांच्या गाण्यात कसकसा बदल झाला हे कळून येईल. तसेच ह्या दुसऱ्या कालखंडात आशा भोसले रवी यांची मुख्य गायिका झालेली होती, तरीसुद्धा काही खास गाण्यांकरीता रवी यांनी लतादीदींचा आवाज वापरून ते गाणे फार उंचावर नेवून ठेवले आहे असे प्रामुख्याने जाणवते. तसेच १९७० नंतर रवी यांच्या गाण्यात अजूनही बदल झालेला दिसतो. लतादीदींना रवी यांनी उत्तमोत्तम उत्तम गाणे दिली. त्यात भजने, अंगाईगीत, बालगीते, आरती, प्रणयगीते, विरहगीते, आनंदी गाणे, दुःखी गाणे, उडत्याचालीची गाणी अशा विविध छटा असलेली अनेक गाणे रवी यांनी लतादीदींना गायला दिली.

गाण्यांची संख्या जास्त असल्याने ज्यांना वाचायला कंटाळा येत असेल त्यांनी लेखाच्या शेवटी दिलेल्या प्ले लीस्टवर जाऊन गाणी ऐकण्याचा आनंद घ्यावा.

संगीतकार रवी आणि लतादीदी यांचे पहिले गाणे (Songs of Lata and Ravi)

लेखाच्या सुरुवातीलाच आपण ऐकूयात अतिशय दुर्मिळ गाणे. १९५५ मधील ‘अलबेली’ ह्या चित्रपटातील ‘जा जा रे चंदा, तेरी चांदनी जलाये’.

ह्या गाण्याची दोन वैशिष्ट्ये आहेत.

पहिले म्हणजे, रवी यांनी स्वतंत्रपणे संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट आहे १९५५ मधील ‘वचन’. परंतु त्या चित्रपटात लतादीदींची एकही गाणे नव्हते. त्याच वर्षी रवी यांनी ‘अलबेली’ हा चित्रपट संगीतबद्ध केला. ह्या चित्रपटात लतादीदी पहिल्यांदा रवी यांच्याकडे गायल्या, त्यामुळे ‘जा जा रे चंदा, तेरी चांदनी जलाये’ हे गाणे संगीतकार रवी त्यांच्याकडे लतादीदींनी गायलेलं हे पहिले सोलो गाणे ठरते.

ह्या गाण्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाण्याचे गीतकार आहेत, खुद्द संगीतकार रवी. रवी हे चांगले गीतकार देखील होते. सुमारे १७-१८ चित्रपटांमध्ये त्यांनी ३५ गाणी लिहिली आहेत. त्यामुळे ‘अलबेली’ ह्या चित्रपटातील ‘जा जा रे चंदा, तेरी चांदनी जलाये’ हे रवी यांनी लिहून संगीतबद्ध केलेलं आणि लतादीदींनी गायलेलं हे ‘ह्या जोडीचे पहिले सोलो’ हा सुवर्णयोग भाळी घेऊन हे गाणे जन्माला आले.

चला, आता ऐकूया ह्या यादीतील पहिले गाणे.

गाणे: १९५५ मधील ‘अलबेली’ ह्या चित्रपटातील ‘.

गाणे क्र. १: ‘जा जा रे चंदा, तेरी चांदनी जलाये’, चित्रपट: अलबेली (वर्ष १९५५), गायिका: लता मंगेशकर, गीतकार आणि संगीतकार: रवी.

गाणे क्र. १: ‘जा जा रे चंदा, तेरी चांदनी जलाये’, चित्रपट: अलबेली (वर्ष १९५५), गायिका: लता मंगेशकर, गीतकार आणि संगीतकार: रवी.

ह्याच अलबेली चित्रपटातील सर्व गाणी संगीतकार रवी यांनी लिहिली आहेत.

आता थोडेसे संगीतकार रवी यांच्याविषयी जाणून घेऊया. त्यांचे पूर्ण नाव होते, रविशंकर शर्मा. १९२६ मध्ये दिल्लीत जन्मलेल्या रवी यांना लहानापणापासून संगीताची प्रेरणा आणि गोडी निर्माण झाली ती त्यांच्या वडिलांपासून. त्यांच्या वडिलांची भजने ऐकत रवी संगीताचे ज्ञान मिळवले, त्यांनी संगीताचे कोणतेही शास्त्रीय अथवा पारंपरिक शिक्षण घेतले नाही. परंतु संगीताच्या आवडीमुळे स्वतःच हार्मिनियम आणि इतर वाद्ये वाजविण्यास शिकले. तसेच त्यांना गायनाचीही खूप आवड होती. घरच्यांच्या समाधानासाठी इलेक्ट्रिशियन (वायरमन)चा कोर्स शिकून घेतला होता. शेवटी वयाच्या २४व्या वर्षी रवी यांनी आपली आवड पूर्ण करण्याकरीता दिल्ली सोडून मुंबईची वाट धरली.

आता लतादीदींची तीन वैशिष्ट्यपूर्ण गाणी ऐकूयात, ह्या गाण्यांना रवी यांनी संगीतबद्ध केली आहेत यावर विश्वास ठेवणे जरा जड जाईल असे मला वाटते. अतिशय वेगळ्या धाटणीची ही गाणे आहेत. (तिन्ही गाणी एकत्र आणल्यामुळे गाण्यांच्या वर्षांचा क्रम बदलला आहे). त्यातील पहिले गाणे आहे. सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया.

गाणे क्र. २: ‘सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया’, चित्रपट: एक साल (वर्ष १९५७), गीतकार: प्रेम धवन, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी. हे गाणे चित्रपटात तीन प्रसंगी वेगवेगळ्या मूडमध्ये गायले आहे.

गाणे क्र. २: ‘सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया’, चित्रपट: एक साल (वर्ष १९५७), गीतकार: प्रेम धवन, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

पुढची दोन वर्षे रवी यांना खूपच वाईट गेली. मुंबईत अनेक चित्रपट स्टुडिओंचे हेलपाटे घालूनही चित्रपटसृष्टीत प्रवेश काही मिळेना. बेघर असल्याने मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील मालाड स्थानकावर ते झोपत असत. आणि दिवसभर रस्त्यावर कोठेही आसरा घेत असत. हाती काहीच काम नसल्याकारणाने अंगातल्या इलेक्ट्रिशियनच्या कौशल्याचा वापर करून काही दिवस मुंबईतील मूळजी जेठा मार्केटमध्ये पंखे साफ करण्याचे, दुरुस्त करण्याचे कामही केले.

गाणे क्र. : ‘ऐ मेरे दिल-ए-नादां, तू ग़म से न घबराना’ चित्रपट: टॉवर हाऊस (वर्ष १९६२), गीतकार: असद भोपाली, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

गाणे क्र. : ‘ऐ मेरे दिल-ए-नादां, तू ग़म से न घबराना’ चित्रपट: टॉवर हाऊस (वर्ष १९६२), गीतकार: असद भोपाली, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

शेवटी १९५१ मधील ‘नौजवान’ ह्या सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटात एका गाण्याला ‘कोरस’ मध्ये गायनाची संधी मिळाली. लगोलग १९५२ मध्ये फिल्मीस्तानच्या ‘आनंदमठ’ चित्रपटातील ‘वंदे मातरम’ या अजरामर गाण्यात कोरस म्हणून गाण्याची संधी हेमंतकुमार यांनी दिली. रवी यांचे कौशल्य आणि हुशारी पाहून हेमंत कुमार यांनी रवी यांना संगीत सहाय्यकाची जबाबदारी दिली. पुढे १९५४ मध्ये फिल्मीस्तानचे ‘जागृती’, ‘नागीन’ आणि ‘शर्त’ अशा तीन चित्रपटांमध्ये संगीतकार हेमंतकुमार यांना रवी यांनी संगीत सहाय्यक म्हणून काम केले.

गाणे क्र. ४: ‘मैं खुशनसीब हूं, मुझको किसीका प्यार मिला’, चित्रपट: टॉवर हाऊस (वर्ष १९६२), गीतकार: असद भोपाली, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी. ह्याच चित्रपटात हेच गाणे लतादीदी आणि मुकेश यांच्या आवाजात देखील ऐकायला मिळते.

गाणे क्र.: ‘मैं खुशनसीब हूं, मुझको किसीका प्यार मिला’, चित्रपट: टॉवर हाऊस (वर्ष १९६२), गीतकार: असद भोपाली, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

१९५५ मध्ये रवी यांच्या एका मित्राच्या ओळखीने चित्रपट दिग्दर्शक देवेंद्र गोयल यांनी प्रथम निर्माता म्हणून बनवलेल्या ‘वचन’ चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत देण्याची संधी मिळाली. ह्या चित्रपटातील ‘चंदामामा दूर के, पुए पकाएं बूर के’ हे आशा भोसलेंचे गाणे आणि ‘मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेले ‘एक पैसा दे दे बाबू’ ही दोन गाणी अतिशय गाजली. त्यामुळे ’वचन’ चित्रपटाने एकाच चित्रपटगृहात सतत २५ आठवडे चालण्याचा विक्रम केला. ही दोन्ही गाणी रवी यांनीच लिहिली होती. तिथून पुढे ‘चंदामामा दूर के, पुए पकाएं बूर के’ हे गाणे आईने गायचे ‘अंगाईगीत’ आणि ‘एक पैसा दे दे बाबू’ हे गाणे ‘भिकाऱ्यांनी भिक मागताना गायचे गाणे’ म्हणून पुढील कित्येक वर्षे गाजत होते.

१९५५ मध्ये ‘वचन’ चित्रपटाला स्वतंत्ररीत्या संगीत देवून लोकप्रिय गाणी देणाऱ्या रवी यांनी पुढे इन्स्पेक्टर (१९५६), एक ही रास्ता (१९५६), दुर्गेश नंदिनी (१९५६), चंपाकली (१९५७) अशा काही चित्रपटांत हेमंतकुमार यांच्याकडे सहाय्यक संगीतकार म्हणून काम चालूच ठेवले होते. रवी यांची गुणवत्ता आणि यशस्वी गाणी पाहता संगीतकार हेमंतकुमार यांनी रवी यांना पूर्णवेळ स्वतंत्ररीत्या संगीत देण्याकरीता आपल्या सेवेतून मुक्त केले.

वर्ष १८९९ मध्ये त्याकाळचे प्रसिद्ध उर्दू लेखक ‘मिर्झा हादी रुसवा’ यांनी लिहिलेल्या ‘उमराव जान अदा’ ह्या पहिल्या उर्दू कांदबरीवर आधारित ‘मेहंदी’ हा मुस्लीम सामाजिक चित्रपट १९५८ साली निर्माण झाला होता. त्या चित्रपटास रवी यांचे संगीत होते. त्या चित्रपटात एकूण १४ चौदा गाणी होती. त्यापैकी ५ गाणी लता यांनी गायलेली होती. ‘मुजरा’ प्रकारातील ह्या चित्रपटातील गाण्यांनी निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता गुरुदत्त प्रभावित झाले, आणि १९६० च्या ‘चौदहवी का चांद’ ह्या मुस्लिम पार्श्वभूमीवर आधारीत चित्रपटाकरीता संगीतकार म्हणून रवी यांची निवड केली आणि रवी यांनी ती निवड सार्थ करून स्वतःच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला. ह्या ‘मेहंदी’ चित्रपटातील दोन गाणे आता आपण ऐकूयात.

गाणे क्र. : ‘प्यार की दुनिया लुटेगी हमें’, चित्रपट: मेहंदी (वर्ष १९६२), गीतकार: खुमार बाराबंकी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.


गाणे क्र. : ‘प्यार की दुनिया लुटेगी हमें’, चित्रपट: मेहंदी (वर्ष १९६२), गीतकार: खुमार बाराबंकी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

गाणे क्र. : ‘अपने किए पे कोई पशेमान हो गया’, चित्रपट: मेहंदी (वर्ष १९६२), गीतकार: खुमार बाराबंकी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

गाणे क्र. : ‘अपने किए पे कोई पशेमान हो गया’, चित्रपट: मेहंदी (वर्ष १९६२), गीतकार: खुमार बाराबंकी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

१९५५ पासून पुढील ५ वर्षात एकूण ११ चित्रपटांमधून उत्तम गाणी देऊन सुद्धा रवी यांचे नाव काही निर्माते, दिग्दर्शक यांच्या मनात ठसले नव्हते. त्याकाळात सचिनदेव बर्मन, शंकर जयकिशन, सी. रामचंद्र, ओपी नय्यर, हेमंत कुमार ह्यांसारख्या दिग्गज संगीतकारांपुढे रवी यांना फारसा वाव मिळत नव्हता. वरील काळात फक्त निर्माता दिग्दर्शक देवेंद्र गोयल हेच रवी यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून होते. १९५५ ते १९५९ दरम्यान गोयल यांचे ५ चित्रपट रवी यांनी संगीतबध्द केले होते. पुढे १९७७ पर्यंत देवेंद्र गोयल यांच्या (फक्त १९६१चा रजिया सुलताना ह्या चित्रपटाचा अपवाद वगळता) सर्वच्या सर्व १२ चित्रपटांना रवी यांचेच संगीत होते, आणि ह्या सर्व चित्रपटांची सर्वच गाणी गाजली होती.

१९५९च्या ‘चिराग कहा रोशनी कहा’ सामाजिक चित्रपटात लतादीदींना खूप छान गाणी मिळाली, त्यातील काही गाणी आता ऐकूयात.

गाणे क्र. : ‘बड़ा बेदर्द जहाँ है, यहाँ इन्साफ़ कहाँ है’, चित्रपट: चिराग कहा रोशनी कहा (वर्ष १९५९), गीतकार: प्रेम धवन, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

गाणे क्र. : ‘बड़ा बेदर्द जहाँ है, यहाँ इन्साफ़ कहाँ है’, चित्रपट: चिराग कहा रोशनी कहा (वर्ष १९५९), गीतकार: प्रेम धवन, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

रवी यांनी अनेक अंगाईगीत अथवा बालगीत यांच्या रचना केल्या आहेत, ‘चिराग कहा रोशनी कहा; ह्या चित्रपटात अशी एकूण ४ गाणी आहेत, त्यातील प्रत्येकी एक गाणे आनंदी तर दुसरे दुःखी गाणे आहे. खाली त्यातील आनंदी छटा असलेली दोन्ही गाणे दिली आहेत. दुःखी भाव असलेली दोन्ही गाणी लेखाच्या खाली असलेल्या प्लेलिस्ट मध्ये दिलेली आहेत.

गाणे क्र. : ‘चल मेरे घोड़े टिक टिक टिक’, चित्रपट: चिराग कहा रोशनी कहा (वर्ष १९५९), गीतकार: प्रेम धवन, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

गाणे क्र. : ‘चल मेरे घोड़े टिक टिक टिक’, चित्रपट: चिराग कहा रोशनी कहा (वर्ष १९५९), गीतकार: प्रेम धवन, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

पुढच्या गाण्याचे गीतकार स्वतः रवी आहेत.

गाणे क्र. ९: ‘टिम टिम करते तारे ये कहते हैं सारे’, चित्रपट: चिराग कहा रोशनी कहा (वर्ष १९५९), गायिका: लता मंगेशकर, गीतकार आणि संगीतकार: रवी.

गाणे क्र. ९: ‘टिम टिम करते तारे ये कहते हैं सारे’, चित्रपट: चिराग कहा रोशनी कहा (वर्ष १९५९), गायिका: लता मंगेशकर, गीतकार आणि संगीतकार: रवी.

गाणे क्र. १०: ‘किसकी मंझिल कहाका ठिकाणा’, चित्रपट: नई राहें (वर्ष १९५९), गीतकार: गोपाल सिंग नेपाली, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

रवी यांच्या प्रतिभेची चित्रपटसृष्टीला आणि रसिकांना नव्याने ओळख करून देण्याचे काम केले ते, १९६० च्या ‘चौदहवी का चांद’ ह्या चित्रपटाने.

‘चौदहवी का चांद’ ह्या चित्रपटातील गाण्यांना मुंबईत झालेल्या १९६१च्या ‘८व्या फिल्मफेअर पुरस्कार’ समारंभात उत्कृष्ठ गायक आणि उत्कृष्ठ गीतकार हे दोन पुरस्कार प्राप्त झाले, परंतु उत्कृष्ठ संगीतकाराचा पुरस्कार मात्र रवी यांचा हुकला. पण ह्या चित्रपटातील गाण्यांच्या यशामुळे रवी यांचे नाव झाले आणि रवी हे पुढे अनेक निर्माता दिग्दर्शक यांच्या आवडीचे संगीतकार झाले. आणि इथून पुढे रवी यांची सांगीतिक कारकीर्द चांगलीच बहरली. त्यांना चांगले बॅनर आणि चांगल्या कथा असलेले चित्रपट खूप मिळू लागले. त्यांची गाणी खूप गाजू लागली.

गाणे क्र. ११: ‘बदले बदले मेरे सरकार नजर आते है’, चित्रपट: चौदवीका चांद (वर्ष १९६०), गीतकार: शकील बदायुनी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

ह्या गाण्याची दोन वैशिष्ट्ये आहेत, पहिले म्हणजे गुरुदत्त यांनी निर्माता म्हणून बनविलेल्या एकूण ७ चित्रपटातील लतादीदींनी गायलेले हे एकमेव गाणे.

दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे हे गाणे अभिनेत्री वहिदा रेहमान यांच्यावर चित्रीत होणार असल्यामुळे गीता दत्त यांने ते गाणे गाण्याला नकार दिला. तेव्हा हे गाणे लतादीदींना देण्यात आले.

गाणे क्र. ११: ‘बदले बदले मेरे सरकार नजर आते है’, चित्रपट: चौदवीका चांद (वर्ष १९६०), गीतकार: शकील बदायुनी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

जेमिनी स्टुडिओचे संस्थापक एस. एस. वासन ह्यांनी वर्ष १९६० ते १९६३ दरम्यान रवी यांना तीन चित्रपट संगीतबध्द करण्यास दिले, योगायोगाने ह्या तिन्ही चित्रपटांचे नाव इंग्रजी ‘G’ अक्षराने सुरु होते. त्या चित्रपटांची नावे अशी: घुंघट (१९६०), घराणा (१९६१) आणि गृहस्थी (१९६३). त्यापैकी घुंघट (१९६०)ह्या चित्रपटातील दोन गाणे आता ऐकूयात.

गाणे क्र. १२: ‘मोरी छम छम बाजे पायलीयां’, चित्रपट: घुंघट (वर्ष १९६०), गीतकार: शकील बदायुनी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

गाणे क्र. १२: ‘मोरी छम छम बाजे पायलीयां’, चित्रपट: घुंघट (वर्ष १९६०), गीतकार: शकील बदायुनी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

गाणे क्र. १३: ‘लागे ना मोरा जीया’, चित्रपट: घुंघट (वर्ष १९६०), गीतकार: शकील बदायुनी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

गाणे क्र. १३: ‘लागे ना मोरा जीया’, चित्रपट: घुंघट (वर्ष १९६०), गीतकार: शकील बदायुनी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

गाणे क्र. १४: ‘मेले है चिरागोंके, रंगीन दिवाली है’, चित्रपट: नजराना (वर्ष १९६१), गीतकार: शकील बदायुनी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

गाणे क्र. १४: ‘मेले है चिरागोंके, रंगीन दिवाली है’, चित्रपट: नजराना (वर्ष १९६१), गीतकार: शकील बदायुनी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

गाणे क्र. १५: ‘बाबुल छूट चला तेरा अंगना’, चित्रपट: राखी (वर्ष १९६२), गीतकार: राजेंद्रकृष्ण, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

गाणे क्र. १५: ‘बाबुल छूट चला तेरा अंगना’, चित्रपट: राखी (वर्ष १९६२), गीतकार: राजेंद्रकृष्ण, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: रवी.

१९६३ पासून निर्माता, दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांच्या कॅम्पमध्ये संगीतकार रवी यांना प्रवेश मिळाला आणि तिथून पुढे बी. आर. चोप्रा यांचे चित्रपट, साहिर लुधियानवी यांची गाणी, रवी ह्यांचे संगीत आणि सुमधुर गाजलेली गाणी यांचे समीकरणच झाले. बी. आर. चोप्रा आणि रवी यांनी एकूण ९ चित्रपट एकत्र केले, पण ह्यातील एकाही चित्रपटात लता मंगेशकर यांना गाणे मिळाले नाही. बी. आर. चोप्रा यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त अनेक चित्रपटांमध्ये गीतकार साहिर आणि संगीतकार ही जोडी यशस्वी गणली जावू लागली.

क्रमशः

उर्वरित गाणी आणि माहिती पुढील भागात.

संगीतकार रवी आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी- भाग १ (Songs of Lata and Ravi – Part 1) समाप्त.

संगीतकार रवी यांच्याविषयी काही रंजक तथ्ये! (Songs of Lata and Ravi)

रवी यांनी उमेदवारीच्या काळात संगीतकार हेमंतकुमार यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले. त्यावेळेस १९५४ साली हेमंतकुमार यांनी सुबोध मुखर्जी यांच्या फिल्मीस्तानचे ‘जागृती’, ‘नागीन’ आणि ‘शर्त’ असे तीन चित्रपट संगीतबद्ध केले त्या चित्रपटांच्या नामावलीत संगीत सहाय्यक म्हणून रवी यांचे नाव ‘रवी शंकर’ असे दाखविले जाई. त्यावेळेस सुप्रसिद्ध सतारवादक आणि संगीतकार भारतरत्न’ पंडित रवीशंकर’ यांनी ‘रवी’ यांना त्यांच्या मित्राद्वारे विनंती केली की, “आपल्या दोघांच्या नामसाधर्म्यामुळे मी हेमंतकुमार यांचा सहाय्यक म्हणून काम केले का, अशी विचारणा मला लोक करतात”. तेव्हा संगीतकार रवी यांनी स्वतःचे नाव ‘रवी शंकर’ असे न वापरता केवळ ‘रवी’ असे वापरायला सुरुवात केली.

पुढे १९८६ मध्ये सुद्धा रवी यांना अजून एक नवीन नाव धारण करावे लागले. ८०च्या दशकाच्या उत्तरर्धात रवी यांनी तामीळ चित्रपटसृष्टीत १४ चित्रपटांना संगीत दिले, त्या सर्व चित्रपटांतील गाणी अतिशय गाजली, तिकडे त्यांना ‘बॉम्बे रवी’ अथवा ‘रवी बॉम्बे’ ह्या नावाने ओळख मिळाली.

रवी यांना १९७१ मध्ये ‘पद्मश्री’ने गौरवले गेले होते.

१९६१चा ‘घराना’, १९६५चा ‘खानदान’ ह्या दोन हिंदी चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा ‘सर्वोत्कृष्ठ संगीतकार’ पुरस्कार मिळाला.

तसेच १९९४च्या ‘परिणयम’ ह्या मल्याळम चित्रपटाकरीता ‘सर्वोत्कृष्ठ संगीतकार’ म्हणून फिल्मफेअरचा पुरस्कार प्राप्त.

संगीतकार रवी आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी -भाग १ (Songs of Lata and Ravi – Playlist) प्ले लिस्ट


संगीतकार रवी आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी -भाग १ (Songs of Lata and Ravi – Part 1): लेखक आणि संकलक – चारुदत्त सावंत, मोबाईल क्र. ८९९९७७५४३९. लेखाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलक – चारुदत्त सावंत.

सूचना: लेखातील गाण्याचे सर्वाधिकार आणि स्वामित्व हे त्या गाण्याचे अधिकार असलेल्या कंपनीकडे आहेत.
या लेखात वापरलेली गाणी हि केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी आणि माहितीकरिता वापरली आहेत. लेखकाला त्यापासून कुठलाही व्यावसायिक लाभ मिळण्यासाठी सदर गाणी वापरली नाहीत. जर कोणास आक्षेप असेल तर आणि जर त्यांनी तसे कळविल्यास सदर गाणे या लेखातून काढून टाकण्यात येईल.


संदर्भ आणि ऋणनिर्देशन – संगीतकार रवी आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी -भाग १ (Songs of Lata and Ravi – Part 1):

Disclaimer: Copyrights of this article is limited to the writeup and content used in this article. Copyrights of audio and video are reserved with respective owners. We have used/provided links to audio and video through youtube.com

हिंदी आणि मराठी गाण्यांचे आमचे इतर लेख वाचा

संगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी

संगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी

अविस्मरणीय गाणी – भाग ३: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग १

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २

ह्या लेखात काही सुधारणा अपेक्षित असतील तर त्या आम्हास नक्की कळवाव्यात.


आजचा हा भाग आपणास आवडला असणार यात शंका नाही, पुढील भाग वाचण्यास चूकवू नका. पुढील भागात आपण जाणून घेवूयात संगीतकार रवी आणि लता मंगेशकर यांची गाणी भाग २रा! आजच सदस्य नोंदणी करा. फक्त खालील जागेत आपला ई-मेल आयडी टाका. निशुल्क नोंदणी करा.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2022 Charudatta Sawant
Acknowledgements: Article Written by: Charudatta Sawant more...

Similar Posts

2 Comments

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply