Shadow

गडकिल्ले

गडकिल्ले – forts-of-Maharashtra

गोनीदांच्या ‘रानभुली’ची एक भेट! (Gonida’s Raanbhuli)

गोनीदांच्या ‘रानभुली’ची एक भेट! (Gonida’s Raanbhuli)

गडकिल्ले, अनुभव
गोनीदांच्या 'रानभुली'ची एक भेट! (Gonida's Raanbhuli) गोनीदांच्या 'रानभुली'ची एक भेट! (Gonida's Raanbhuli) - गोनीदांच्या 'रानभुली'च्या नायिकेची एक भेट, आणि जुन्या आठवणींना उजाळा! 'पार्वती धोंडू होगाडे' उर्फ 'मनी' उर्फ 'रानभुली' !लेखन, शब्दांकन: भगवानसूत संजय तळेकर (संजय उवाच). [प्रस्तावना: संपादक चारुदत्त सावंत महाराष्ट्रातील थोर साहित्यकार, दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी अशी अनेक विशेषणे किंवा पदव्या नावापुढे लावता येतील असे आमच्या तळेगाव दाभाडे शहराचे भूषण स्व. गोपाळ नीलकंठ दांडेकर उपाख्य 'गोनीदा' यांना त्यांच्या गडकिल्ल्याच्या सफरीत अनेक व्यक्तिमत्वे भेटली. उदा. 'वाघरू' कथेतील राजगडवासी बाबुदा, 'पवनाकाठचा धोंडी' म्हणजेच तुंगी किल्यावरील धोंडी हवालदार (ढमाले), 'माचीवरला बुधा' मधील राजमाची किल्ल्याच्या परिसरातील टेमलाईच्या पठारावरील बुधा आणि 'जैत रे जैत' मधील लिंगोबाच्या ...
उंबरखिंड, न भूतो न भविष्यती अशी जबरदस्त कोंडी! (Umberkhind Battle)

उंबरखिंड, न भूतो न भविष्यती अशी जबरदस्त कोंडी! (Umberkhind Battle)

गडकिल्ले
उंबरखिंड, न भूतो न भविष्यती अशी जबरदस्त कोंडी! (Umberkhind Battle) - लेखन, संकलन: भगवानसूत संजय तळेकर (संजय उवाच) [शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित, दिग्दर्शित जाणता राजा या महानाट्यात काम करीत असताना खूप दिवसाची तळमळ होती, नाटकात काम करणार्‍या कलाकारांना घेवून पदभ्रमणाच्या मोहीमा आखाव्यात. ही गोष्ट मी एका प्रयोगाच्यावेळी श्रीमंत बाबासाहेब व ठाणे कलाकार व्यवस्थापक श्री. अरुणराव ठाकूर यांच्यापाशी बोलून दाखवली. कल्पना आवडताच लगेचच त्यांनी संमती ही दिली. मग बाबासाहेबांच्या आशीर्वादाने, अरुणरावांच्या मार्गदर्शनाने व सहकलाकार मनीषराव नाखवा याच्या सहकार्याने पदभ्रमणाची सुरुवात म्हणून नाटकात न दाखविलेल्या प्रसंगापैकी ’उंबरखिंड (Umberkhind Battle)’ या समरभूमीला भेट देण्याचे ठरले. त्या दिवशी तारीख होती ६ फेब्रुवारी २०११ आणि सभासद संख्या होती १५, त्याचा हा वृतांत .....
रॉक कट गॅलरी – हरीहर उर्फ हर्षगड – Harihar Fort

रॉक कट गॅलरी – हरीहर उर्फ हर्षगड – Harihar Fort

गडकिल्ले
रॉक कट गॅलरी - हरीहर उर्फ हर्षगड - Harihar Fort मराठे ज्याच्या मदतीने लढाई खेळलेत त्या निसर्गाने निर्माण केलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर दिमाखाने उभ्या असलेल्या आणि आपल्या पूर्वजांच्या वैभवांचा वारसा सांगणाऱ्या काही गड किल्ल्यांनी आपल्यातील काही ना काही खासियत आजपावेतो जपून ठेवलेली आहे. आणि तेच त्या त्या गड किल्ल्यांचे वैशिष्ट बनून राहिले आहे. काही किल्ले असे आहेत की ज्यांचे नुसते फोटो पाहिलेत की तेथे भेट द्यावेसे असे वाटते. त्यापैकीच एक असलेला नाशिक जिल्ह्यातील ब्रम्हगिरीच्या पश्चिमेस साधारण २० कि.मी. अंतरावरील सोपानाचा गड म्हणून ओळखला जाणारा हरिहरगड किंवा हर्षगड (Harihar Fort). समुद्रसपाटी पासून ११२० मी. उंची लाभलेला, त्रिकोणी माथ्याचा हा गड दुर्गयात्रीच्या परिचयाचा आहे तो म्हणजे त्याच्या काताळ कोरीव पायऱ्यांनी व अंतिम टप्प्यापर्यंत खोदलेल्या बोगद्यातून तर कधी नाळेतून कर...
त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर – Trimbakeshwar Alias Brahmagiri

त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर – Trimbakeshwar Alias Brahmagiri

गडकिल्ले, Slider
त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर - Trimbakeshwar Alias Brahmagiri - लेखक: संजय तळेकर, मुंबई ‘‘दृष्टी पडता ब्रम्हगिरी तया नाही यमपूरी’’ असे ज्याचे माहात्म्य श्री संत नामदेव महाराजांनी सांगितले आहे., तो त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर नाशिक पासून अवघ्या २९ किलोमीटर अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर समुद्रसपाटीपासून ४२४८ फूट तर पायथ्यापासून अंदाजे १९०० फूट उंचीवर असून त्याचा घेरा १० मैल इतका प्रशस्त आहे. त्याच्या सर्वच बाजूंनी ३००-४०० फुट उंचीचे नैसर्गिक काताळकडे असल्यामुळे जिंकण्यास तर तो निव्वळ अजिंक्यच. पर्वतरूपाने साक्षात शिवाचे वास्तव्य याच डोंगरावर होते. अनेक ऋषी, महर्षि, संतांनी याच पर्वतावर तपश्चर्या केली. दक्षिण भारतातील पवित्र व महत्त्वाची मानली गेलेली ‘गोदावरी’ नदी याच डोंगरावरून उगम पावते. या पौराणिक महात्म्यामुळे बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या ...
Irshalgad Cave – इर्शाळगडावरील गुहा

Irshalgad Cave – इर्शाळगडावरील गुहा

गडकिल्ले
Irshalgad Cave - इर्शाळगडावरील गुहा इर्शाळगडाचे छायाचित्र सौजन्य: Photo downloaded from : https://en.wikipedia.org/wiki/Irshalgad, Irshalgad_plateau_and_pinnacle: Photo By Bhanu1313 - Own work, CC BY-SA 4.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=42361219, Irshalgad Cave - इर्शाळगडावरील गुहा धनंजय मदन व त्याच्या निसर्गमित्रच्या शिलेदारांना इर्शाळगडावर श्रमदान करताना ISHRAHALGAD CAVE - इर्शाळगडावर एक अज्ञात गुहा सापडली. त्यावर स्वस्थ न बसता धनंजयने मुंबईच्या काही मित्रांना घेऊन पुन्हा एकदा त्या गुहेचा मागोवा घेतला. आपल्या बलाढ्य शत्रूला नामोहरम करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी मूठभर मावळ्यांच्या बळावर व सह्याद्रीच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्माण केले. या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी जसे चाणाक्ष हेरखाते नेमले तसेच गडकिल्ल्यांची निर्मिती केली. ...
किल्ले माणिकगडावरील रात्र !

किल्ले माणिकगडावरील रात्र !

गडकिल्ले
किल्ले माणिकगडावरील रात्र ! मूळ लेखक: स्व. तु. वि. जाधव रायगड जिल्ह्यातील पनवेल जवळच्या किल्ले माणिकगड विषयक जुना लेख साभार पोच: 'पर्यटन ' - अंक : जुलै १९७७ , संपादक, मालक, मुद्रक - जयंत जोशी, सहसंपादक - सौ. मीना जोशी, आनंद हर्डीकर. पुणे . संकलक: संजय तळेकर, मुंबई .  माणिकगडाचे छायाचित्र सौजन्य: https://en.wikipedia.org/wiki/Manikgad_(Raigad) आम्ही सगळे मिळून नऊ जण, त्यातले सातजण पार्ल्याच्या हॉलिडे हायकर्स क्लबचे सभासद. श्रीकांत फ़ूणसळकर, गुबगुबीत बाळसेदार! सुरेश कुळकर्णी दणकट प्रकृतीचा! सुत्रधारही तोच! बाकीचे उमद्या दिलाचे. तरूण रक्ताचे. अनेक डोंगर ओलांडून गेलेले. बेलाग कडे चढून आलेले. कित्येक अडचणी पार केलेले. मी आठवा. तसा किरकोळ पण काटक. नि नववे गिरगावातले श्रोत्री, बहुत बहुत हिंडलेले, दोनवेळा भारत ग्रमण केलेले. हिमालय भटकून आलेले. गंगोत्री पर्यंत चढून गेले...
(MAHIPATGAD-SUMARGAD-RASALGAD) दुर्गत्रिकूट: महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड

(MAHIPATGAD-SUMARGAD-RASALGAD) दुर्गत्रिकूट: महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड

गडकिल्ले
(MAHIPATGAD-SUMARGAD-RASALGAD) दुर्गत्रिकूट: महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड मूळ लेखक: स्व. तु. वि. जाधव महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड ह्या दुर्गत्रिकुटाच्या भ्रमंती विषयक जुना लेख - (MAHIPATGAD-SUMARGAD-RASALGAD) साभार पोच: 'पर्यटन ' - दिवाळी अंक १९७६, संपादक, मालक, मुद्रक - जयंत जोशी, सहसंपादक - सौ. मीना जोशी, आनंद हर्डीकर. पुणे . संकलक: संजय तळेकर, मुंबई .  महिपतगडाचे छायाचित्र सौजन्य: https://marathivishwakosh.org/ दुर्गत्रिकूट: महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड महाराष्ट्रात सह्याद्रिनं अनेक किल्ले आपल्या शिरी मिरवविले आहेत नि त्यांनी घालून दिले धडे त्यानं आपल्या उरो मिरविले आहेत. अश्या ह्या सह्यगिरीच्या मुख्य रांगेची लांबी आठशे मैल असली तरी तीस जागोजागी अनेक फाटे फुटलेले आहेत. त्यास शाखा आहेत. उपशाखा आहेत. अशा ह्या आपुल्या शाखा उपशाखांचे बाहू अस्ताव्यस्त पसरून, प...
raigad fort – रायगडी चढावे… पाच वाटांनी…

raigad fort – रायगडी चढावे… पाच वाटांनी…

गडकिल्ले
(Raigad Fort) रायगडी चढावे… पाच वाटांनी… मूळ लेखक: तु. वि. जाधव स्व. तु. वि. जाधव यांनी लिहीलेला रायगड विषयीचा जुना लेख साभार पोच: 'पर्यटन' - शिवतीर्थ रायगड विशेषांक  - मार्च १९८०, संपादक, मालक, मुद्रक - जयंत जोशी, पुणे . संकलक: संजय तळेकर, मुंबई .  हुकुमतपन्हा रामचंद्रपंत आमात्य यांनी आपल्या आज्ञापत्रात श्रीशिवछत्रपतींचं अनुशासन लिहून ठेवलं आहे. दुर्गद्वारांविषयी लिहिताना ते त्यात म्हणतात- 'किल्ल्यास एक दरवाजा अयब (दोष) आहे, याकरता गड पाहोन एक दोन-तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करोन ठेवाव्या, त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवोन वरकड दरवाजे व दिंड्या चिणोन टाकाव्या !'. आजहि हे, कुठलाही गड चहूअंगी डोळसपणे पाहाता क्षणीच ध्यानी येतं. गडावर युध्दोपयोगी आवश्यक असणाऱ्या अनेक वास्तु आणि वस्तूंपैकी गडास एक-दोन चोरवाटा असणं ही युध्दशास्त्राच्या दृष्टीनं एक...
Jivdhan Fort – जीवधन किल्ला आणि  वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग

Jivdhan Fort – जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग

गडकिल्ले
Jivdhan Fort जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग कार्यक्रम - JIVDHAN FORT भारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा ह्या उद्देशाने पुण्याच्या 'राही ट्रेकर्स' तर्फे जीवधनच्या वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग पद्धतीने चढाई करण्याचा साहसी कार्यक्रम जाहीर झाला, हे कळाल्यावर मी लगेचच नाव नोंदणी करून माझी जागा राखीव केली. २५ जानेवारी २०२१च्या रात्री पुण्याहून सुटलेल्या खाजगी बसने एकेकाला सोबत घेवून साधारण रात्री ११ वाजता नाशिक फाटा सोडला. तेथून पुढे पुणे-नाशिक महामार्गाने चाकण, खेड, मंचर, नारायणगाव मार्गे जुन्नरहून जीवधनच्या पायथ्याशी पूर्वेला वसलेल्या घाटघर गावात रात्री (पहाटे) साधारण अडीचच्या सुमारास पोहोचलो. अगोदर ठरविल्याप्रमाणे सचिन पानसरे यांच्या घरी सर्वजण थांबलो. साधारण तासभर थांबून जीवधनकडे निघण्याच्या बेताने सर्वांनी थोडी विश्रांती घेतली. पहाटे चार वाजता सर्वज...
Historian Mountaineer – इतिहासकार गिर्यारोहक

Historian Mountaineer – इतिहासकार गिर्यारोहक

गडकिल्ले
(Historian Mountaineer) - तुकाराम विजयानंद जाधव मला इतिहासाच्या अभ्यासाचे वेड लावणारे, मला गुरूस्थानी असणारे आदरणीय कै. तुकाराम जाधव यांची आठवण आल्याशिवाय आमची दुर्गदर्शन अथवा दुर्गभ्रमणाची कोणतीही मोहीम सुरू झालेली नाही. तुकाराम जाधव म्हणजे इतिहास आणि गिर्यारोहण दोन्ही क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती. एखाद्या किल्ल्याचा इतिहास आणि भूगोल पूर्णपणे माहीत असलेली एक व्यक्ती. असा संगम तसा दुर्मिळच. ह्या दोन्ही क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव एकाच ठायी असणे हे आमच्यासाठीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रीयवासियांना मोठी अभिमानाची गोष्ट होती. अशा थोर व्यक्तीच्या सान्निध्यात गडकिल्ले फिरण्याचा अनुभव मला मिळाला हे माझे सद्भाग्यच! आम्ही त्यांना पहिल्या पिढीतील गिर्यारोहक मानतो, पण हे गिर्यारोहण फक्त सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांतून केलेले! गिर्यारोहण करताना सुद्धा इतिहास लक्षात ठेवून ऐतिहासिक घटना खरोखर कशा...
error: Content is protected !!