प्रणाम उन दुल्हनों को मेरा – एक दुर्लक्षित देशभक्तीपर गीत Pranaam Un Dulhano Ko Mera
प्रणाम उन दुल्हनों को मेरा – एक दुर्लक्षित देशभक्तीपर गीत Pranaam Un Dulhano Ko Mera
चीन बरोबरच्या १९६२च्या मानहानीकारक पराभवानंतर १९६३च्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये ५०,००० श्रोत्यांपुढे आणि तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेले ‘ये मेरे वतन के लोगो’ हे अमर देशभक्तीपर गाणे सर्वांच्याच आवडीचे आहे, ह्या गाण्याने जो इतिहास घडविला तो देखील सर्वांना ठावूक आहे.
पण असेच आणखी एक देशभक्तीपर गाणे वर्ष १९६६ मध्ये बनवले गेले होते, ते मात्र आपल्या स्मरणातही नाही, किंबहुना बहुसंख्य नागरीकांना हे गाणे ठावूकच नाही. गाणे आहे, ‘प्रणाम उन दुल्हनों को मेरा’!
आज आपण याच गाण्याविषयी जाणून घेणार आहोत.
‘ये मेरे वतन के लोगो’ हे गाणे आपल्या मातृभूमीकरीता स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांना मानवंदना देण्याकरीता बनवले होते.
परंतु ह्याच सैनिकांच्या विधवा पत्नीच्या त्यागाचे महत्व किंवा त्यांचे दुःख मात्र आपण लक्षात घेत नाही, त्यांच्या ह्या त्यागाचे, साहसाचे स्मरण करून त्यांना वंदन करावे म्हणून वर्ष १९६६ अजून एका नवीन देशभक्तीपर गाण्याची रचना करण्यात आली, ते गाणे म्हणजेच ‘प्रणाम उन दुल्हनों को मेरा’.
१९६५च्या भारत पाक युद्धानंतर सैनिक विधवा कल्याण (Army Wives Welfare Association) फंडाकरीता नवी दिल्लीत आयोजित संगीत कार्यक्रमामध्ये प्रथम हे गाणे गायले गेले. ‘ये मेरे वतन के लोगो’चे कवी प्रदीप आणि संगीतकार सी. रामचंद्र यांनीच ह्या गाण्याची रचना केली, फक्त ह्या वेळेस गायिका होत्या आशा भोसले.
सैनिक विधवा कल्याण फंडाकरीता आयोजित संगीत कार्यक्रमामध्ये हे गाणे गायले गेले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री उपस्थित नव्हते, म्हणून दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्यासमोर हे गाणे पुन्हा सादर करण्यात आले.
संगीतकार सी. रामचंद्र यांनी ह्या गाण्याची प्रस्तावना सादर केली आणि गाण्याची सुरुवातही केली आहे.
हे गाणे सुरुवातील संथ असले तरी शेवटी एका उच्च टप्प्याला, ते ऐकताना आपल्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल.
चला तर आता ऐकूया गाणे: ‘प्रणाम उन दुल्हनों को मेरा’, गायिका: आशा भोसले, गीतकार: कवी प्रदीप, संगीतकार: सी. रामचंद्र अर्थात अण्णा चितळकर
ह्या गाण्याचे बोल इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध करून देत आहे.
करलो प्रणाम ये लोगो,
वो वंदनीय है बहने,
इस देश के लिए जिन्होंने,
विधवा के कपडे पहने।।
प्रणाम उन दुल्हनों को मेरा,
जिन्होने अपना सब कुछ गंवाया,
वतन ये ज़िंदा रहे इसलिये,
अपना सुहाग सिन्दूर लुटाया
प्रणाम उन दुल्हनों को मेरा ….. ।।
ये है शाहिदोंकी अमानतें,
हर विधवा है पावन गंगा,
इन बहनोंके बलिदानोंको,
कभी ना भुलेगा ये तिरंगा,
अपनी मांग उजाडली इन्होंने,
हम सबका कश्मीर बचाया,
वतन ये ज़िंदा रहे इसलिये,
अपना सुहाग सिन्दूर लुटाया ।।
प्रणाम उनको जिन्होंने,
सरहदपें अपने प्यारे किये निछावर,
प्रणाम उनको जिन्होंने,
रणमें अपने सहारे किये निछावर,
प्रणाम उनको …..
प्रणाम उनको जिन्होंने अपना,
काजल त्यागा, बिंदिया छोडी,
प्रणाम उनको …..
वतन की खातीर जिन्होंने अपनी,
चुडियां तोडी,
जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद ।।
आशा आहे कि, ‘ये मेरे वतन के लोगो’ ह्या गाण्यासारखेच हे ही गाणे आपणास भावेल, आणि सैनिकांच्या विधवा पत्नी आणि त्यांचा परिवार ह्याविषयी आपल्या मनात आपुलकी आणि प्रेम निर्माण होवून आपण त्यांना कर्तव्यबुद्धीने शक्य त्या प्रकारे मदत करून आपले देशप्रेम सिद्ध कराल, हीच ७६व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमिताने सर्व देशवासियांना विनंती, जय हिंद!

प्रणाम उन दुल्हनों को मेरा – एक दुर्लक्षित देशभक्तीपर गीत Pranaam Un Dulhano Ko Mera – लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२१, संपर्क: ८९९९७७५४३९
Photos Courtesy: Google.com
हे देखील वाचा: ध्वजारोहण’ आणि ‘ध्वज फडकावणे’ म्हणजे काय? – What is Flag Hoisting and Flag Unfurling
