बालभारती - balbharati 6th std poems cover

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ६वा : इयत्ता ६वी – Balbharati Poem Songs – 6

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ६वा : इयत्ता ६वी – Balbharati Poem Songs – 6

लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे

बालभारतीच्या कवितेची गाणी यातील इयत्ता १ली ते ५वी मधील कविता आपण भाग १ ते भाग ५ यात वाचल्या आणि ऐकल्या देखील. आजच्या भागात बालभारतीने वर्ष १९६८ ते १९७० दरम्यान प्रसिद्ध झालेल्या १ल्या मालिकेतील मराठीच्या पुस्तकातील इयत्ता ६वी (प्रथमावृत्ती १९७०) मधील कवितेची गाणी ऐकणार आहोत.

पहिल्या भागातील प्रस्तावना वाचण्यासाठी येथे क्लिक करा:

लहानपणीचा काळ किती सुखाचा असतो, हे आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. लहान असताना आई-बाबा, आजी-आजोबा, ताई-दादा यांच्याकडून लाड पुरवून घेण्याचे ते दिवस. आपल्याला खेळवताना त्यांनी आपल्यासाठी गायलेले बडबडगीत, झोपवताना गायलेले अंगाईगीत अशा गाण्यांनी आपल्यावर बालपणीच गाण्यांचे संस्कार झालेले आहेत. त्यावर कळस म्हणजे शाळेत गेल्यावर पहिलीपासून वाचलेल्या बालभारतीच्या पुस्तकातील कविता आणि गाणी!

मराठी माध्यमातून जे शिकले आहेत त्यांनी हा अनुभव नक्कीच घेतला आहे.

मराठी वाड्मय किती प्रगल्भ आहे, हे त्या कविता पुन्हा वाचताना आता जाणवते. विविध कवींनी आपले वैविध्य राखत वेगवेगळया विषयांवर लिहिलेली बालगीते किंवा कविता बालभारतीच्या पुस्तकांत वाचावयास मिळतात. या कवितेला बाईंनी छान चाल लावलेली असायची, त्यावर आपण त्या कवितेचे रूपांतर गाण्यात करून गात असू.

पण आपणास ठाऊक आहे का? आपल्या आवडीच्या बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत हे बहुसंख्य लोकांना ठाऊक नाही. ‘मामाच्या गावाला जाऊ या’, ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ अशी काही चित्रपटात वापरलेली गाणी सोडली तर ह्या कवितेची गाणी आपण ऐकलेली नसायाची, किंवा विसरून गेलो असू.

याबरोबरच आश्चर्याची अन न भूतो न भविष्यती अशी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे अर्थात ‘बालभारती’ यांनी १९६५ साली इयत्ता १ ली ७ वी पर्यंतच्या प्रत्येक पुस्तकातील प्रत्येकी २ कविता/गाणी घेवून त्यावर चक्क ध्वनीमुद्रिका काढलेल्या होत्या. (त्यातील ६वी च्या गाण्यांची ध्वनीमुद्रिका सापडत नाही).

ईयत्ता १ ली ७ वी पर्यंतच्या बालभारतीच्या विविध आवृत्यांमध्ये तशी एकूण ३० हून अधिक गाणी सापडली आहेत. त्यातही बरीच गाणी आज घडीला कुठेच उपलब्ध नाहीत. हि गाणी यापुढे अशीच दुर्लक्षित न राहता हा ठेवा भावी पिढीकरीता जतन करून ठेवावा ह्यासाठी हा प्रपंच!

आजच्या या भागात आपण ईयत्ता १ली ते २री च्या बालभारतीच्या पुस्तकांत असलेल्या काही कविता गाण्यांच्या रुपात ऐकूयात, सोबतच त्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. या गाण्यांबरोबरच ध्वनीमुद्रिकेच्या मुखपृष्ठाचे आणि ध्वनीमुद्रिकेचे छायाचित्रे, कवींची थोडक्यात माहिती, पुस्तकातील कवितेच्या पानाचे छायाचित्र इत्यादी देवून लेख अधिक आकर्षक तर केलाच आहे, शिवाय गाणे हि ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. यातील बरीच गाणी हि १९५३ ते १९७० या कालावधीत प्रसिद्ध झालेली आहेत. पण काही गाणी मात्र १९९० च्या दशकानंतर तयार झाली आहेत.

[या लेखमालिकेकरिता घेतलेल्या कविता /गाणी ह्या बालभारतीने इयत्ता १ली ते ७वी करीता वर्ष १९६८ ते १९७० दरम्यान प्रसिद्ध झालेल्या १ल्या मालिकेतील मराठीच्या पुस्तकातील आहेत. त्यानंतर साधारण वर्ष १९७६ पासून २ऱ्या मालिकेतील पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यामुळे १ल्या मालिकेतील कविता आणि गाणी २ऱ्या मालिकेतील वेगवेगळ्या इयत्तेमध्ये आढळून येतील.]

भाग वा सुरु

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ६वा : इयत्ता ६वी – Balbharati Poem Songs – 6


आनंदी आनंदी गडे

आजच्या भागातील, म्हणजे इयत्ता ६वी तील पहिली कविता आहे, ‘आनंदी आनंदी गडे…… ‘. मराठीतील श्रेष्ठ कवी बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी लिहिलेली हि कविता.

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. वर्ष १९०७ मध्ये जळगावात झालेल्या पहिल्या महाराष्ट्र कविसंमेलनात त्र्यंबक बापूजी ठोंबरेंना बालकवी ही उपाधी मिळाली.

केवळ २८ वर्षांचे अल्पआयुष्य लाभलेल्या बालकवींनी साधारण वयाच्या १३व्या वर्षी काव्यलेखनास सुरुवात केली. पुढील तीन ते चार वर्षात बालकवींची काव्यकारकीर्द विकसित झाली आणि अल्पआयुष्याने पुढील फक्त १० वर्षेच त्यांची कारकीर्द टिकली. वैयक्तिक आयुष्यातील कटू अनुभव आणि बिकट परिस्थितीमुळे बालगीते आणि निसर्गगीते यांच्याबरोबरच त्यांच्या काव्यात पुढे उदासीनता आणि निराशा ह्या भावना जाणवतात.

दुर्दैवाने वयाच्या केवळ २८व्या वर्षी, भुसावळ-जळगाव रेल्वे मार्गावर ‘भादली’ रेल्वे स्टेशनवर रूळ ओलांडताना इंजिनखाली सापडून बालकवींचा दुर्दैवी अंत झाला.

बालकवींच्या इतर काही प्रसिद्ध कविता:
पाखरास ……
औदुंबर ……
फुलराणी ……
उदासीनता ……
श्रावणमासी हर्ष मानसी ……

ह्या कवितेचे गाण्यात रूपांतर दोन वेळा झालेले आहे, प्रथम गाणे हे गायिका आशा खाडीलकर यांनी गायले आणि संगीतकार आहेत सुधीर फडके, दुसरे गाणे लता मंगेशकर यांनी गायलेले आहे आणि संगीतकार आहेत हृदनाथ मंगेशकर. त्यातील लतादीदींचे गाणे सर्वात प्रसिद्ध गाणे आहे.

बालकवींनी लिहिलेली संपूर्ण कविता ही ५ कडव्यांची आहे. परंतु लतादीदींच्या गाण्यात मात्र कडवी क्रमांक १, २ आणि ४ वापरलेली दिसतात. (आशा खाडीलकर यांनी गायलेल्या गाण्याचे ध्वनिमुद्रण आम्हास अद्याप उपलब्ध झालेले नाही, मिळाल्यास लगेचच अपडेट केले जाईल, कृपया नवनवीन अपडेट्स करीता निशुल्क सदस्यत्व घ्यावे, हि विनंती).

आता वाचूया आणि ऐकूया ‘आनंदी आनंद गडे …..’ हे सर्वच लहानथोरांच्या आवडीचे बालगीत. गायिका आहेत लता मंगेशकर आणि संगीतकार आहेत हृदनाथ मंगेशकर.

बालभारतीच्या पुस्तकातील कविता

५ कडव्यांची संपूर्ण कविता

गाणे: ‘आनंदी आनंद गडे …..’ कवी: बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: हृदनाथ मंगेशकर

या झोपडीत माझ्या

आजची दुसरी कविता आहे, ‘या झोपडीत माझ्या…’, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक कविता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. वर्ष १९४२च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. “आते है नाथ हमारे” हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन ‘हर देश में तू …, हर भेष में तू …..’ हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते. जे दिल्ली येथील राजघाटावर नियमित ऐकविले जाते. (संदर्भ: https://mr.wikipedia.org/s/2rd).

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मराठी आणि हिंदी भाषेत भाषांमधून लिहिलेली ग्रंथसंपदा फार मोठी आहे, त्याविषयीची अधिक माहिती गाण्याच्या शेवटी दिलेल्या लिंकवर वाचावयास मिळतील.

‘या झोपडीत माझ्या…’ ह्या कवितेत तुकडोजी महाराजांनी छोट्या झोपडीत देखील महालापेक्षा कितीतरी मोकळेपणाने सुख अनुभवता येते याचे वर्णन केले आहे.

चला तर आता वाचूया आणि ऐकूयात गाणे, ‘या झोपडीत माझ्या…’, रचना: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गायक – अजित कडकडे, संगीत: विलास पाटील.

गाणे: ‘या झोपडीत माझ्या’, रचना: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गायक – अजित कडकडे, संगीत: विलास पाटील, Source: https://gaana.com/album/ya-zopdit-mazya

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेला ‘ग्रामगीता’ (Gramgeeta) हा ग्रंथ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावरील संतसाहित्य ब्लॉगवरील लेख

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावरील मराठी विकीपीडीयावरील लेख


अनामिकास

आजची शेवटची कविता आहे, ‘अनामिकास…’. ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारप्राप्त कवी विष्णु वामन शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली ही कविता डोळ्यात पाणीच आणते. आपल्या देशासाठी प्राणापर्ण केलेल्या असंख्य वीरांची हि आत्मकथा वाटते. कुठलीही अपेक्षा न ठेवता केवळ देशप्रेमाने भारावलेल्या सैनिकाने देशाच्या सार्वभौमत्वासाठी, रक्षणासाठी कर्तव्यास प्राधान्य देऊन स्वतःच्या प्राणाची होळी केली, हे वर्णन वाचताना लहानपणी डोळ्यातून अश्रूंची श्रद्धांजली वाहिली जायची. आणि भारतीय सैन्याचा अभिमान वाटायचा.

चला तर वाचूया आणि ऐकूयात आजची शेवटची कविता, ‘अनामवीरा…, कवी: कुसुमाग्रज, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: वसंत प्रभू

गाणे: ‘अनामवीरा…, कवी: कुसुमाग्रज, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: वसंत प्रभू

कुसुमाग्रज यांच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

संगीतकार वसंत प्रभू यांच्याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा


पुढच्या भागात वाचा आणि ऐका इयत्ता ७वी च्या कवितेची गाणी: – Balbharati Poem Songs

गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या ……
गवतफुला रे गवतफुला ……

आणि अन्य कवितेची गाणी…


बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता २री – Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ३रा : इयत्ता ३री – Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ४था: इयत्ता ४थी- Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ५वा: इयत्ता ५वी– Balbharati Poem Songs

मागील भाग वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा:


ह्या लेखात काही सुधारणा अपेक्षित असतील तर त्या आम्हास नक्की कळवाव्यात.

लेखनाचे सर्वाधिकार: लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे – ८९९९७७५४३९, ९२२५६०५९६८


बालभारती कवितेचा आजचा हा ६ वा भाग आपणास आवडला असणार यात शंका नाही, पुढील भाग वाचण्यास चूकवू नका. आजच सदस्य नोंदणी करा. फक्त खालील जागेत आपला ई-मेल आयडी टाका. निशुल्क नोंदणी करा.


Balbharati Poem Songs हा लेख आपल्या मित्रमंडळींना सामायिक (Share) करा:


हा लेख लिहिण्याकरीता बऱ्याच लोकांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साहाय्य झाले आहे, तसेच खाली उल्लेख केलेल्या वेबसाईट/ब्लॉग वरून देखील माहिती गोळा करण्यास मदत झाली आहे, त्यांचे धन्यवाद!


Acknowledgments:

  1. Vinyl Record Cover Images of Marathi Songs – Balbharati are taken from https://www.discogs.com/; Specially Manufactured by – The Gramophone Company Of India Ltd. For – Maharashtra State Bureau of Text Book Production, Pune.
  2. Vinyl Record Cover Images Contributor: Mr. Gawaskar (More details not found).
  3. गाण्यांची यादी आणि अधिक माहितीList and more information of Songs: https://www.aathavanitli-gani.com/
  4. Images and List of Songs: https://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx
  5. बालभारतीची जुनी पुस्तके डाउनलोड करण्याकरिताची लिंक (Download link of Balbharati Books): https://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx
  6. List of Songs: https://balbharatikavita.blogspot.com/
  7. संतांचे चरित्र: https://www.santsahitya.in/
  8. List of Songs: http://marathikavitagani.blogspot.com/

DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have used audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links. No downloading has been provided. Any lawful copyright owner does not wish to keep their content on our website, may inform us about it, so that we will remove it from our website.

अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत. आमच्या वेबसाइटवर आम्ही कुठल्याही सामुग्रीचे डाउनलोड उपलब्ध करून दिलेले नाही. कोणीही कायदेशीर कॉपीराइट मालक जर आपली सामग्री आमच्या वेबसाइटवर ठेवू इच्छित नसतील, तर त्याबद्दल आम्हाला कळविल्यास आम्ही ती सामुग्री आमच्या वेबसाइटवरून काढून टाकली जाईल.


आमचे इतर लेख वाचा


Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021 Charudatta Sawant
Acknowledgements: Article Written by: Mr. Charudatta Sa more...