Unknown Singers – अपरिचित गायक
Unknown Singers of Bollywood – चित्रपटसृष्टीतील अपरिचित गायक
गेल्या भागात आपण हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील नामवंत व प्रतिभाशाली संगीतकार ओ. पी. नय्यर, मदन मोहन, जयकिशन, रवी, उषा खन्ना यांच्या आवाजातील काही गाणी ऐकण्याचा आनंद घेतला.
अशाच तऱ्हेने अनेक नट, नट्या, गीतकार यांनाही गायनाची हौस आणि कला होती. पण ते नियमित गायक म्हणून पुढे येवू शकले नाही. अशाच काही अपरिचित आवाजातील गाणी आपण आता ऐकूयात. (यातील काही गाणी जशी उपलब्ध झालीत तशी असल्यामुळे आवाजाचा दर्जा थोडा कमी असू शकतो).
वर उल्लेखलेल्या संगीतकारांबरोबरच ६०च्या दशकातील आघाडीचे अभिनेता विश्वजित आणि अभिनेत्री माला सिन्हा यांनाही गायनाची कला अवगत होती. पण दुर्देवाने त्यांच्या आवाजाचा वापर गायक म्हणून केला नाही. विश्वजीत यांनी हेमंतकुमार, शंकर-जयकिशन, ओपी, आरडी यांच्या सारख्या संगीतकारांबरोबर काम केले. त्यापैकी हेमंतकुमार, आरडी यांच्याबरोबर त्याचे घनिष्ट संबंध होते, तरी कोणी एकदाही विश्वजितचा आवाज वापरल्याचे दिसत नाही. माला सिन्हा तर ऑल इंडिया रेडिओवर नियमित गायक होती. तिच्या आवाजाचा वापर हिंदी चित्रपटात एकदाच केलेला दिसतोय. ह्या दोघांनीही चित्रपटात काम करणे बंद केल्यावर देश-विदेशात लाईव्ह कार्यक्रमात (ऑर्केस्ट्रामध्ये) नियमित गायन केलेले आहे. चला आता अभिनेता विश्वजित आणि अभिनेत्री माला सिन्हा यांनी गायलेली गाणी ऐकूयात.
प्रथम अभिनेत्री माला सिन्हा नायिका असलेल्या चित्रपटात त्यांनीच गायलेले गाणे
Source: https://www.mr-jatt.im/latest-music/song/131838/Mere-Mehboob-Meri-Manhar-Udhas-mp3-song.html
हे गाणे युट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
स्वर्गीय गायक मोहम्मद रफी यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त मुंबईत सादर झालेल्या कार्यक्रमात अभिनेता विश्वजीत यांनी गायलेली दोन गाणी ऐकूयात. त्यावेळी विश्वजीत यांचे वय ७६ होते. त्या वयातही त्यांचा आवाज आणि गायकी टिकून होती ते पाहून आश्चर्य वाटते, आणि विश्वजीत यांना त्यांच्या उमेदीच्या काळात चित्रपटात गायनाची संधी मिळायला हवी होती असे राहून राहून वाटते.
हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी गीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले आनंद बक्षी हे गायक आणि करण्यासाठी चित्रपटसृष्टीत आले होते. पुढे ते गीतकार म्हणून यशस्वी झाले. परंतु त्यांच्यातील गायक काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. १९५८ मध्ये चित्रपटसृष्टीतीत प्रवेश केलेल्या आनंद बक्षी यांना १४ वर्षांनी १९७२ सालातील ‘मोम की गुडिया’ चित्रपटात २ गाणी गाण्याची संधी मिळाली. पुढे ‘शोले’ चित्रपटातील पडद्यावर न आलेली कव्वाली मध्ये त्यांनी आवाज दिलेला आहे. १९७६ च्या ‘चरस’ चित्रपटातील ‘के आजा तेरी याद आई’ ह्या गाण्याचा मुखडा अशा गाण्यात आनंद बक्षी यांनी आपली गायनाची कला रसिकांना दाखविली आहे. चला आता ऐकूयात आनंद बक्षी यांनी गायलेली काही गाणी.
Source: https://www.mr-jatt.im/latest-music/song/137185/Bagon-Mein-Bahar-Aai-Lata-Mangeshkar-mp3-song.html
हे गाणे युट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे गाणे युट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
‘के आज तेरी याद आई’ ह्या गाण्याचा फक्त मुखडा ऐका.
आता शेवटी ऐकूयात काही आश्चर्यजनक आवाज! ज्या आवाजात आपण गाणे अपेक्षीत केले नसेल.
अभिनेत्री शबाना आजमी यांचा! शबाना आजमी ह्या उत्तम अभिनेत्री तर आहेतच, पण त्या गाणे गाऊ शकतात, ह्याचा आपण कधी विचारसुद्धा केला नसेल. मागच्याच भागात १९८६च्या ‘अंजुमन’ ह्या चित्रपटात संगीतकार खय्याम आणि त्यांच्या पत्नी जगजीत कौर यांनी गायलेले ‘कब याद मे तेरा साथ नही’ हे गाणे ऐकले होते. त्याचाच चित्रपटात प्रमुख भूमिका करणाऱ्या शबाना आजमी यांना खय्याम यांनी ३ एकल आणि १ युगल गाणी दिलेली आहेत. आणि शबाना आजमी यांनी त्या गाण्यांना पूर्ण न्याय दिलेला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही, परंतु ह्या चित्रपटातील पाचही युट्युबवर उपलब्ध आहेत. शबाना आजमी यांनी गायलेली आणि आणि त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी आता आपण पाहूयात.
अभिनेत्री रेखा यांनी सुद्धा गाणी गायली आहेत. १९८० सालातील ‘खूबसूरत’ ह्या चित्रपटात रेखा यांनी दोन गाणी गायली आहेत. त्यातील एक आता पाहूया. दुसऱ्या गाण्यात गद्य जास्त असल्याने ते गाणे वगळले आहे.
हे गाणे युट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जुही चावला यांनी ही एक छान गाणे गायले आहे. ते आता पाहूयात.
सौजन्य: https://www.youtube.com/c/nhstudioztv
हेमा मालिनी, श्रीदेवी आणि अन्य गायिकांनीही आपला आवाज गाण्याला दिला आहे. पण ते नुसतेच गुणगुणणे किंवा गद्यात काही शब्द किंवा वाक्य म्हणणे ह्या प्रकारातली असल्याकारणाने त्या गाण्यांचा उल्लेख केलेला नाही. तसेच ‘आती क्या खंडाळा’ असे गद्यरुपी गाणे म्हणणारा आमिर खान आणि अन्य पुरुष नट यांना सुद्धा यातून वगळले आहे.
हिंदी चित्रपट संगीतात इतकी गाणी आहेत कि, याच प्रकारातील अजूनही काही गाणी राहून गेली असणे शक्य आहे. जसजशी त्यांची माहिती मिळेल तसतशी ती गाणी आपणापुढे पुन्हा सादर केली जातील.
पुढच्या भागात अजून नवीन विषय आपल्यापुढे सादर करण्यात येईल.
लेखाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलक – चारुदत्त सावंत, २०२१. मोबाईल क्र. ८९९९७७५४३९
कृपया आपला अभिप्राय आणि सूचना कळवाव्यात.
DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. Please do note that these links are being shared only for reference purposes and as found when added to the website. We do not have copyright on these links, and hence from time to time you may find some of the links not working, in which case since we have provided the song details, a keen listener could find an alternative link / source instead.
अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत.
