whatsapp image 2020 10 25 at 1.06.00 pm

आपले स्वागत असो!

माझ्या ह्या ब्लॉगवर आपले स्वागत असो!

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले आभार!

मराठी वाचक आणि लेखक यांच्याकरीता विजयादशमी, शके १९४२, म्हणजेच रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२० रोजीच्या सुमुहुर्तावर आमचे संकेतस्थळ आणि अँड्रॉइड ऍप् आपल्यासाठी सादर करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपल्यापैकी बरेच जण मला व्यक्तीश: ओळखत असतील तर त्यांना सुद्धा माझ्या ह्या नवीन उपक्रमाविषयी आनंदच होत असेल यात शंका नाही.

गेली अनेक वर्षे लिखाण करण्याचे मनात होते, असंख्य विषय आणि प्रसंग लिहिण्याची प्रेरणा देत होते, परंतु आळस ह्या गोष्टींपासून मला दूर नेता होता. कोरोनाच्या निमित्ताने मिळालेल्या सक्तीच्या सुटीमुळे या विषयी विचार करावयास आणि पूर्वतयारी करण्यास मला वेळ मिळाला, आणि पुरेसा गृहपाठ करून, एकही क्षण वाया न घालवता मनातील उपक्रम पूर्ण करण्याचा जोरदार प्रयत्न केला, त्याचे हे फळ आहे. अर्थात हि केवळ सुरुवात असून, अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, हे ध्यानात असल्यामुळे ह्या प्रकल्पाच्या विस्ताराच्या योजना आणि अंमलबजावणी ह्याकडे लक्ष देणे गरजेचे राहील.

ह्या ब्लॉगवर आपणास माझ्या आवडीच्या विषयांवरची लेखमाला वाचावयास मिळेल. कुठलाही एक विशिष्ठ अनुक्रम किंवा विषय मनात न ठेवता मला जसे सुचेल तसे आणि आठवेल तसे विविध विषयांवर मी येथे लिहिलेलं आहे. माझे मनोगत येथे मांडलेले आहे. हि लेखमाला तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाईल, विचार करावयास लावेल, आपले हरवलेले क्षण आपणास येथे नक्कीच सापडतील. नवीन गोष्टींची माहिती मिळेल, असे मला नक्की वाटते.

आपण ह्या ब्लॉगचे प्रथम वाचक आहात, आणि आमचाही हा पहिलाच प्रयत्न आहे. तेव्हा माझी ही लेखमाला आपण गोड मानून घ्यावी. आणि आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला नक्की कळवाव्यात म्हणजे आम्हाला सुधारणा करण्यासाठी ते मार्गदर्शक ठरेल.

सुरुवातीला हा उपक्रम माझा वैयक्तिक स्वरूपाचा असणारा होता, परंतु माझ्या मित्रांनी यात योगदान देण्याचा मनोदय प्रकट करून लगेच काही जून लेख, छायाचित्रे असे साहित्य उपलब्ध करून दिले आहे, तेही आपणास लवकरच वाचावयास/पाहावयास मिळेल. तसेच नवोदित आणि अपरीचित लेखकांना येथे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.

माझ्या उपक्रमात माझ्या घरच्यांनी म्हणजेच मुले आणि सून आणि माझे मित्र यांनी सहकार्य केले आहेच शिवाय आमच्या कार्यालयातील अनुभवी संगणकतज्ञ् शिक्षकवर्गाचेही मार्गदर्शन आणि प्रेत्साहन मला लाभले आहे.

या ब्लॉगवर सतत लेखांची भर पडत असणार आहे त्यामुळे आपण ब्लॉगवर नोंदणी करून घ्यावी म्हणजे आपणास ई-मेल अथवा संदेशाद्वारे नवीन लेखांची सूचना प्राप्त होईल.

आपण आमचा हा उपक्रम सामाजिक माध्यमाद्वारे आपले मित्रमंडळी आणि कुटुंबीय यांच्यापर्यन्त पोहोचवावा. म्हणजे मोठा वाचकवर्ग निर्माण होण्यास मदत होईल. नवीन लेखकांची देखील भर पडेल आणि उत्तम साहित्य/विचार आपणास वाचावयास मिळतील, हि सदिच्छा!

धन्यवाद!

चारुदत्त सावंत

संस्थापक, संपादक

संपर्क: ८९९९७७५४३९

Similar Posts

6 Comments

  1. Really Good Sir.. putting thought in words is always difficult but u make them so easy.keep posting.

  2. 👌 Congratulations, finally after very long time your dreams are manifested. Very much happy on this auspicious period for launching your website. 👍

  3. ||अभिनंदन||
    मस्त लेख, ट्रेकिंगचे अनुभव आमच्या बरोबर share करत रहा…..👍

  4. चारुदत्त साहेब,

    तुमच्या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा. तुमचा वाचकवर्ग येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक वाढत राहो हीच शुभेच्छा

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply