बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता २री – Balbharati Poem Songs – 2

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता २री – Balbharati Poem Songs – 2

लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे

बालभारतीच्या कवितेची गाणी यातील इयत्ता १ली मधील कविता आपण १ल्या भागात वाचल्या आणि ऐकल्या देखील. आजच्या भागात बालभारतीने वर्ष १९६८ ते १९७० दरम्यान प्रसिद्ध झालेल्या १ल्या मालिकेतील मराठीच्या पुस्तकातील इयत्ता २ री मधील कविता ऐकणार आहोत.

पहिल्या भागातील प्रस्तावना वाचण्यासाठी येथे क्लिक करा:

लहानपणीचा काळ किती सुखाचा असतो, हे आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. लहान असताना आई-बाबा, आजी-आजोबा, ताई-दादा यांच्याकडून लाड पुरवून घेण्याचे ते दिवस. आपल्याला खेळवताना त्यांनी आपल्यासाठी गायलेले बडबडगीत, झोपवताना गायलेले अंगाईगीत अशा गाण्यांनी आपल्यावर बालपणीच गाण्यांचे संस्कार झालेले आहेत. त्यावर कळस म्हणजे शाळेत गेल्यावर पहिलीपासून वाचलेल्या बालभारतीच्या पुस्तकातील कविता आणि गाणी!

मराठी माध्यमातून जे शिकले आहेत त्यांनी हा अनुभव नक्कीच घेतला आहे.

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ ला: इयत्ता १ली – Balbharati Poem Songs – १

पहिल्या भागात ऐकलेली गाणी पुढीलप्रमाणे:

मराठी वाड्मय किती प्रगल्भ आहे, हे त्या कविता पुन्हा वाचताना आता जाणवते. विविध कवींनी आपले वैविध्य राखत वेगवेगळया विषयांवर लिहिलेली बालगीते किंवा कविता बालभारतीच्या पुस्तकांत वाचावयास मिळतात. या कवितेला बाईंनी छान चाल लावलेली असायची, त्यावर आपण त्या कवितेचे रूपांतर गाण्यात करून गात असू.

पण आपणास ठाऊक आहे का? आपल्या आवडीच्या बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत हे बहुसंख्य लोकांना ठाऊक नाही. ‘मामाच्या गावाला जाऊ या’, ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ अशी काही चित्रपटात वापरलेली गाणी सोडली तर ह्या कवितेची गाणी आपण ऐकलेली नसायाची, किंवा विसरून गेलो असू.

याबरोबरच आश्चर्याची अन न भूतो न भविष्यती अशी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे अर्थात ‘बालभारती’ यांनी १९६५ साली इयत्ता १ ली ७ वी पर्यंतच्या प्रत्येक पुस्तकातील प्रत्येकी २ कविता/गाणी घेवून त्यावर चक्क ध्वनीमुद्रिका काढलेल्या होत्या. (त्यातील ६वी च्या गाण्यांची ध्वनीमुद्रिका सापडत नाही).

ईयत्ता १ ली ७ वी पर्यंतच्या बालभारतीच्या विविध आवृत्यांमध्ये तशी एकूण ३० हून अधिक गाणी सापडली आहेत. त्यातही बरीच गाणी आज घडीला कुठेच उपलब्ध नाहीत. हि गाणी यापुढे अशीच दुर्लक्षित न राहता हा ठेवा भावी पिढीकरीता जतन करून ठेवावा ह्यासाठी हा प्रपंच!

आजच्या या भागात आपण ईयत्ता १ली ते २री च्या बालभारतीच्या पुस्तकांत असलेल्या काही कविता गाण्यांच्या रुपात ऐकूयात, सोबतच त्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. या गाण्यांबरोबरच ध्वनीमुद्रिकेच्या मुखपृष्ठाचे आणि ध्वनीमुद्रिकेचे छायाचित्रे, कवींची थोडक्यात माहिती, पुस्तकातील कवितेच्या पानाचे छायाचित्र इत्यादी देवून लेख अधिक आकर्षक तर केलाच आहे, शिवाय गाणे हि ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. यातील बरीच गाणी हि १९५३ ते १९७० या कालावधीत प्रसिद्ध झालेली आहेत. पण काही गाणी मात्र १९९० च्या दशकानंतर तयार झाली आहेत.

[या लेखमालिकेकरिता घेतलेल्या कविता /गाणी ह्या बालभारतीने इयत्ता १ली ते ७वी करीता वर्ष १९६८ ते १९७० दरम्यान प्रसिद्ध झालेल्या १ल्या मालिकेतील मराठीच्या पुस्तकातील आहेत. त्यानंतर साधारण वर्ष १९७६ पासून २ऱ्या मालिकेतील पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यामुळे १ल्या मालिकेतील कविता आणि गाणी २ऱ्या मालिकेतील वेगवेगळ्या इयत्तेमध्ये आढळून येतील.]

बालभारतीच्या कवितेची गाणी – इयत्ता २री – Balbharati Poem Songs


हळूच या हो हळूच या

आजची पहिली कविता आहे, कुसुमाग्रज (विष्णु वामन शिरवाडकर ) यांनी लिहिलेली कविता – ‘हळूच या हो, हळूच या”!

कवितेचे गाण्यात रूपांतर केले आहे संगीतकार वसंत देसाई यांनी, गायले आहे वाणी जयराम यांनी.

बालभारतीची वर्ष १९६५ मध्ये काढलेल्या दुसऱ्या ध्वनीमुद्रिकेमध्ये ईयत्ता २रीच्या दोन कवितेची गाणी होती. ती आता आपण ऐकूयात.

चला तर ऐकूया आजच्या भागातील कवितेच्या गाण्याचे प्रथम गाणे, आणि परत घेऊयात २री च्या वर्गातील आनंद! आपल्या बरोबर नवीन पिढीला हा ठेवा दाखवावा आणि ऐकवावा!

Balbharati Poem Songs
मुखपृष्ठ – बालभारतीची दुसरी ध्वनीमुद्रिका – वर्ष १९६५ – Balbharati Poem Songs
मूळ संग्राहक : श्री. गावस्कर (अधिक माहिती मिळत नाही)

Source: https://www.discogs.com/Vasant-Desai-मझय-ममच-रगत-गड-ह-हळच-य-ह-हळच-य/release/13725554/image/SW1hZ2U6NDA1NDY5ODU=
Balbharati Poem Songs
ध्वनीमुद्रिकेचे छायाचित्र –
गाणे: देवा तुझे किती सुंदर आकाश
Balbharati Poem Songs. Source: https://www.discogs.com/Vasant-Desai-मझय-ममच-रगत-गड-ह-हळच-य-ह-हळच-य/release/13725554/image/SW1hZ2U6NDA1NDY5ODg=

Haluch Ya Ho Haluch Ya Ho- हळूच या हो हळूच या
Balbharati Poem Songs – Haluch Ya Ho Haluch Ya Ho- हळूच या हो हळूच या Balbharati Marathi Std. 2, 1968 Edition

गाणे ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा:

गाणे: हळूच या हो हळूच या, कवी: कुसुमाग्रज, गायिका: वाणी जयराम, संगीत: वसंत देसाई

कुसुमाग्रज यांच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा


माझ्या मामाची रंगीत गाडी हो

ह्या गाण्याचे कवी आहेत ‘कविवर्य ग. ह. पाटील’. कविवर्य ग. ह. पाटील उर्फ गणेश हरी पाटील हे एक मराठी कवी, बालसाहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांच्या अनेक कविता मराठी शालेय पाठ्यपुस्तकांत होत्या. यांनी लहान मुलांसाठी खूप साहित्य प्रसिद्ध केले आहे.

त्यांनी लिहिलेल्या काही प्रसिद्ध कविता खालीलप्रमाणे:

  • अबलख वारूवरी बैसुनी येती हे पाटिल
  • डरांव डरांव, डरांव डरांव… का ओरडता उगाच राव?’
  • देवा तुझे किती सुंदर आकाश
  • पाखरांची शाळा भरे पिंपळावरती
  • फुलपाखरू छान किती दिसते

लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी जाणे होई, तेव्हा मामाच्या बैलगाडीत बसल्यावर ती रंगीत गाडी, गाडीला जुंपलेले खिलारी बैल, त्यांच्या गळ्यातील घुंगारांचा आवाजाच्या तालावर बैलगाडीतून शेतात अथवा दुसऱ्या गावाला फेरी होई तेव्हाचा बालमनावर पडलेला अवीट ठसा ग. ह. सरांनी खूपच छान मांडून मुलांचे भावविश्व उभे केले आहे.

चला तर आता वाचूया आणि ऐकूयात लहानथोरांच्या आवडीचे गाणे, ‘माझ्या मामाची रंगीत गाडी हो’.

कवितेला संगीतबद्ध केले आहे वसंत देसाई यांनी आणि गायले आहे जयवंत कुलकर्णी आणि कमलाकर, कैलासनाथ जैस्वाल यांनी.

Balbharati Poem Songs
Balbharati Poem Songs – Mazhya Mamachi Rangit Gadi – माझ्या मामाची रंगीत गाडी हो Balbharati Marathi Std. 2, 1968 Edition. Source: https://www.discogs.com/Vasant-Desai-मझय-ममच-रगत-गड-ह-हळच-य-ह-हळच-य/release/13725554/image/SW1hZ2U6NDA1NDY5ODY=
Balbharati Poem Songs
ध्वनीमुद्रिकेचे छायाचित्र –
माझ्या मामाची रंगीत गाडी हो
Balbharati Poem Songs. Source: https://www.discogs.com/Vasant-Desai-मझय-ममच-रगत-गड-ह-हळच-य-ह-हळच-य/release/13725554/image/SW1hZ2U6NDA1NDY5ODM=
Balbharati Poem Songs - Mazhya Mamachi Rangit Gadi -माझ्या मामाची रंगीत गाडी हो
Balbharati Poem Songs – Mazhya Mamachi Rangit Gadi -माझ्या मामाची रंगीत गाडी हो Balbharati Marathi Std. 2, 1968 Edition
गाणे: माझ्या मामाची रंगीत गाडी हो, कवी: ग. ह. पाटील, गायक: जयवंत कुळकर्णी, कमलाकर, कैलासनाथ जैस्वाल, संगीत: वसंत देसाई

पक्षी जाय दिगंतरा

शाळेत असताना म्हणजे इयत्ता १ली आणि २री मध्येच बालभारतीने आपल्यावर भक्तीरसाची गोडी लावली आहे. विविध संतांची गोड भक्तीपर रचना वाचून आणि ऐकून आपल्या कोवळ्या मनावर विश्वबंधुत्वाचे आणि प्राणीमात्रांवरच्या प्रेमाचे संस्कार झालेले आहेत, तो ठसा आजही कायम आहे.

१३व्या शतकातील संत जनाबाई यांनी लिहिलेला ‘पक्षी जाय दिगंतरा’ ह्या अभंगात ‘आई बाळाची कशी काळजी घेते’ हे सांगून विठ्ठल देखील आम्हावर तशीच माया माझ्यावर लावून आहे, याचे छान प्रेममय वर्णन ह्या कवितेत आहे. इतक्या वर्षांपूर्वीची मराठी भाषेतील प्रगल्भता पाहून थक्क व्हायला होते.

चला तर आता वाचूया आणि ऐकूया संत जनाबाई यांनी लिहिलेला ‘पक्षी जाय दिगंतरा’ हा अभंग, गायिका आहेत अनुराधा पौडवाल आणि संगीतबद्ध केले आहे राम फाटक यांनी.

Balbharati Poem Songs - Pakshi Jai Digantara -पक्षी जाय दिगंतरा
Balbharati Poem Songs – Pakshi Jai Digantara -पक्षी जाय दिगंतरा Balbharati Marathi Std. 2, 1968 Edition
गाणे: पक्षी जाय दिगंतरा, रचना: संत जनाबाई, गायिका: अनुराधा पौडवाल, संगीत: राम फाटक

असा कसा देवाचा देव बाई ठकडा

संत एकनाथ, संत नामदेव यांच्या पासून श्रीज्ञानदेवांपासून तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी श्री कृष्णाचे वर्णन करण्यासाठी अनेक गवळणी (गौळण) रचल्या आहेत. भजनाच्या शेवटी गवळण म्हटली जाते. भारुडात सुद्धा गवळण असते. तमाशात सुद्धा मुख्य वग सुरु होण्याअगोदर गवळण असते (आजकाल त्यात आलेला भ्रष्टपणा बाजूला ठेवूयात). ह्या गवळणीत बाल श्रीकृष्णाच्या लीलांचे विविध रूपाने आणि प्रसंगाने गोपिकांनी कौतुक केलेले असते.

संत एकनाथ यांनी रचलेली अशीच एक गवळण आता वाचूया आणि ऐकूया. गायिका आहेत सुलोचना चव्हाण आणि संगीतबद्ध केले आहे एस. (शामराव) चव्हाण यांनी.

Balbharati Poem Songs - AAsa Kasa Devacha Dev Bai Thakda - असा कसा देवाचा देव बाई ठकडा
Balbharati Poem Songs – Nach Re Mora असा कसा देवाचा देव बाई ठकडा Balbharati Marathi Std. 2, 1968 Edition, Source: https://www.youtube.com/watch?v=Jk8uHPUMdls, Album: Baai Mi Bholi ℗ Ishtar Music Pvt. Ltd
गाणे: असा कसा देवाचा देव बाई ठकडा, रचना: संत एकनाथ, गायिका: सुलोचना चव्हाण, संगीत: एस. (शामराव) चव्हाण

वरील अभंगाचा भावार्थ वाचण्यासाठी येथे क्लीक करा


नाच रे मोरा आंब्याच्या वनात

पुढील कवितेच्या आहे, बालभारतीच्या ‘२ऱ्या मालेतील’ २रीच्या पुस्तकातील आहे. वरील इतर सर्व कविता या ‘१ल्या’ मालेतील आहेत.

लहान मुलांच्या भावविश्वातील पावसाचे गाणे म्हणजे ‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात’… १९५३ मधील ‘देवबाप्पा’ चित्रपटातील हे गाणे, नंतर आपल्याला बालभारतीमध्ये कवितेच्या रूपात वाचायला मिळाले. निर्मिती, पटकथा, संवाद, गीतकार आणि संगीतकार अशा विविध आघाड्या पु. ल. देशपांडे यांनी या चित्रपटात लीलया सांभाळल्या. ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या ‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात’ या सुंदर गाण्याला तितकीच सुंदर चाल लावून आशा भोसले यांच्या आवाजात हे गाणे आपल्याला ऐकावयास मिळते.

चला तर आता वाचूया आणि ऐकूया ह्या भागातील शेवटचे गाणे ”नाच रे मोरा, आंब्याच्या वनात’. आणि पुन्हा भेटूयात पुढील भागात ईयत्ता ३रीच्या कविता ऐकायला.

Balbharati Poem Songs - Nach Re Mora
Balbharati Poem Songs – Nach Re Mora नाच रे मोरा Balbharati Marathi Std. 2, 1979 Edition
गाणे: नाच रे मोरा आंब्याच्या वनात, कवी: ग. दि. माडगूळकर, गायिका: आशा भोसले, संगीत: पु. ल. देशपांडे

गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी लिहिलेली ‘नाच रे मोरा’ ह्या गाण्याची जन्मकथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी भाषेतील सिद्धहस्त कवी ‘गदिमा’ अर्थात ग. दि. माडगूळकर यांच्या विषयीची समग्र माहिती वाचण्यासाठी येथे क्लीक करा

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा


पुढच्या भागात वाचा आणि ऐका ईयत्ता ३री च्या कवितेची गाणी: – Balbharati Poem Songs

पिवळे तांबूस ऊन कोवळे
दीपका मांडीले तुला सोनीयाचे ताट
आली बघा गाई गाई शेजारच्या अंगणात

आणि अन्य कवितेची गाणी…

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs

पहिला भाग वाचण्यासाठी वरती क्लिक करा

ह्या लेखात काही सुधारणा अपेक्षित असतील तर त्या आम्हास नक्की कळवाव्यात.

लेखनाचे सर्वाधिकार: लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे – ८९९९७७५४३९, ९२२५६०५९६८


आजचा हा भाग २रा आपणास आवडला असणार यात शंका नाही, पुढील भाग वाचण्यास चूकवू नका. आजच सदस्य नोंदणी करा. फक्त खालील जागेत आपला ई-मेल आयडी टाका. निशुल्क नोंदणी करा.


Balbharati Poem Songs हा लेख आपल्या मित्रमंडळींना सामायिक (Share) करा:


हा लेख लिहिण्याकरीता बऱ्याच लोकांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साहाय्य झाले आहे, तसेच खाली उल्लेख केलेल्या वेबसाईट/ब्लॉग वरून देखील माहिती गोळा करण्यास मदत झाली आहे, त्यांचे धन्यवाद!


Acknowledgments:

  1. Vinyl Record Cover Images of Marathi Songs – Balbharati are taken from https://www.discogs.com/; Specially Manufactured by – The Gramophone Company Of India Ltd. For – Maharashtra State Bureau of Text Book Production, Pune.
  2. Vinyl Record Cover Images Contributor: Mr. Gawaskar (More details not found).
  3. गाण्यांची यादी आणि अधिक माहितीList and more information of Songs: https://www.aathavanitli-gani.com/
  4. Images and List of Songs: https://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx
  5. बालभारतीची जुनी पुस्तके डाउनलोड करण्याकरिताची लिंक (Download link of Balbharati Books): https://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx
  6. List of Songs: https://balbharatikavita.blogspot.com/
  7. List of Songs http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/balbharati_edition2_march_2012_lr.pdf

DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have used audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links. No downloading has been provided. Any lawful copyright owner does not wish to keep their content on our website, may inform us about it, so that we will remove it from our website.

अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत. आमच्या वेबसाइटवर आम्ही कुठल्याही सामुग्रीचे डाउनलोड उपलब्ध करून दिलेले नाही. कोणीही कायदेशीर कॉपीराइट मालक जर आपली सामग्री आमच्या वेबसाइटवर ठेवू इच्छित नसतील, तर त्याबद्दल आम्हाला कळविल्यास आम्ही ती सामुग्री आमच्या वेबसाइटवरून काढून टाकली जाईल.


आमचे इतर लेख वाचा


Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021 Charudatta Sawant
Acknowledgements: Article Written by: Mr. Charudatta Sa more...

Leave a Reply

पुढील भाग वाचण्यास चूकवू नका, सदस्यत्व घ्या!निशुल्क सदस्यत्व नोंदणी करा

पुढील भाग वाचण्यास चूकवू नका. आजच सदस्य नोंदणी करा. फक्त खालील जागेत आपला ई-मेल आयडी टाका. निशुल्क नोंदणी करा.

error: Content is protected !! कृपया आमच्या परवानगी शिवाय छायाचित्रे/मजकूर वापरू नये. आम्हाला संपर्क करावा.