
हसीन दिलरुबा Haseen Dillruba – A Thrilling Romantic Story
Haseen Dillruba हसीन दिलरुबा - दिल को मेरे भा गया!
हसीन दिलरुबा Haseen Dillruba - लेखिका: सायली साठे-वर्तक
(Cover Image source: https://www.aajtak.in/entertainment/film-review/story/haseen-dillruba-netflix-movie-review-story-cast-taapsee-pannu-vikrant-massey-harshvardhan-rane-tmov-1284403-2021-07-04)
बऱ्याच प्रतीक्षेनंतर फायनली तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा - Haseen Dillruba’ ओटीटी पडद्यावर परवा झळकला. सध्या सगळ्यांचा पॉपकॉर्न वीकेंड घरीच साजरा होत असल्याने 'ओटीटी'वाले त्याची योग्य तसदी घेऊन थोडा का होईना थिएटरचा फील देण्यासाठी सिनेमा शुक्रवारीच प्रदर्शित करतात. त्यात कलाकार प्रेक्षकांचे आवडते असले की मग त्याची जाहिरात फार आधीपासूनच केली जाते.
एका सुप्रसिद्ध जुन्या गाण्याचे बोल शीर्षक असलेल्या या चित्रपटात तापसीबरोबर 'उतरण' या कलर्स वरच्या मालिकेपासून ज्याची चढण सुरु झाली तो वि...