मुंबई-पुणे पदयात्रा: भाग ५
मुंबई ते पुणे पायी प्रवासाचा शेवटचा दिवस.
लहानपणी एक सुभाषित वाचले होते. ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार’. ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर, ‘चला घराबाहेर पडा’. नवीन जग पाहावयास मिळेल, अनुभवयास मिळेल.