Shadow

Tag: लेख

माहेरची साडी – Maherchi Sadi

माहेरची साडी – Maherchi Sadi

लेखमाला, Slider
माहेरची साडी - Maherchi Sadi [फ्लॅशबॅक …. आमची आत्या देवाघरी गेल्याची वाईट बातमी आली. सख्खी नसली तरी तिचा आमच्यावर खूप जीव. वडिलांपेक्षा वयाने थोडी मोठी. वडिलांना बहीण नसल्याकारणाने तिच्यावर वडिलांचे प्रेम होते. आम्ही गावाला तिच्या घरी गेलो कि, आमच्यासाठी काय करू आणि काय नको असे तिला व्हायचे. घरची गरिबी असली तरी प्रेमाची श्रीमंती ओसंडून वाहत होती. अंत्यविधीला जाणे कर्तव्यच होते. वडील नसल्याकारणाने माझ्यावरच मोठेपणाचे ओझे आले होते. अंत्यविधीला निघताना पत्नीने एक हिरव्या रंगाची नवी साडी पिशवीत घालून दिली. मी म्हटले, "हे काय आता? ही साडी कोणाला द्यायची? नंतर देऊ कधी, आता प्रसंग काय आहे". ती म्हणाली "हि 'माहेरची साडी' आहे, आत्यासाठीच आहे, माहेराहून शेवटची साडी दिली जाते. ती तिच्या अंगावर घालायची असते'. मला हा प्रकार यापूर्वी कधीच माहित नव्हता. मी गावी अंत्यविधीला पोहोचलो....
माझे गाव: भाग १८ : सुट्टी संपली-भाग २

माझे गाव: भाग १८ : सुट्टी संपली-भाग २

माझे गाव
सुट्टी संपली - चला मुंबईला परत - भाग २ त्यांनतर यायचे तळेगाव दाभाडे. तेथील बस स्थानकावर बसगाडी थांबल्यावर आम्ही जेवत असू. तोवर दुपारचे दोन वाजले असत. आता गाडी चालू झाली कि व्हायचा मुंबईच्या प्रवासाचा तिसरा टप्पा. आता पुढे …. तळेगाव दाभाडेहून बस निघाली कि गावाच्या बाहेर मुंबई पुणे हमरस्ता लागायचा. तेथून पुढे मग गाडीचा वेग वाढायचा. गावाकडच्या रस्त्याच्या तुलनेत गुळगुळीत आणि खड्डे विरहीत डांबरी रस्त्यावरून गाडी धावू लागली कि मजा यायची. बाजूच्या गाड्या सुळकन यायच्या आणि जोरात आवाज करू येजा करायच्या, ते पाहताना मजा यायची. गावाकडच्या रस्त्यासारखे आचके गचके बसायचे नाही, पण अख्खी बसगाडी वेगामुळे थरथरायची. खिडक्या आणि दरवाजा आता तुटून पडतील कि काय अशी भीती वाटायची. गाडीच्या थरथरण्यामुळे कानाचे दडे बसायचे. यातच आता बसमध्ये उलटी, ओकारीचे सत्र सुरु व्हायचे. कोणी उलटी केली तर त्याला बस लागली असे...
माझे गाव: भाग १७ : सुट्टी संपली-भाग १

माझे गाव: भाग १७ : सुट्टी संपली-भाग १

माझे गाव
सुट्टी संपली - चला मुंबईला परत - भाग १ साधारण जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात शाळा सुरु होत असत. त्यामुळे आम्हाला मे महिन्याच्या अखेरीपर्यंत मुंबईला यावेच लागे. बहुतेक वेळा आमचे वडील आम्हाला घेवून जाण्यासाठी गावी येत. ते आल्यावर दोनचार दिवसात आम्ही मुंबईला परत निघत असू. त्या अगोदर पुन्हा एकदा आमच्या आत्यांच्या घरी धावती भेट द्यायचो. त्यांच्याकडून काही ना काही वाणावळा मिळायचा. पुन्हा एकदा लाड व्हायचे. खालच्या घरातून म्हणजे वडिलांच्या मावशीकडून ही खूप काही वाणावळा मिळायचा. आता मावशी नाही, पण तिची सून भिमाकाकू आजही आम्हाला कधी रिकाम्या हाताने पाठवत नाही. पिशवी भरून तांदूळ, मसुरा, काळे तीळ तिच्याकडून आजही मिळतात. तारा आत्याकडून बटाट्याचा किस पिशवी भरून मिळायचा. आमच्या घरातून सुद्धा तांदूळ मिळायचे. सोबत सुकवलेले पदार्थ म्हणजे पापड, कुरडया, बिबडी, वडे (सांडगे) हे देखील मिळायचे. आता हे स...
माझे गाव: भाग १६ : गावातील एक दिवस

माझे गाव: भाग १६ : गावातील एक दिवस

माझे गाव
गावातील एक दिवस शक्यतो उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी जात असे. पाऊस पडण्यास अजून दीड दोन महिन्याचा अवकाश असायचा. रात्री मृग नक्षत्र डोक्यावर थोडेसे पूर्वेला कललेले दिसे. दरवर्षी साधारण ७ जून रोजी सूर्य मिरगात (मृग नक्षत्रामध्ये) प्रवेश करतो तेव्हा पाऊस सुरु होतो, हे शेतकऱ्याला माहीत असतेच. तेव्हा मिरीग कधी लागतो याकडे सर्वांचे लक्ष असे. त्यामुळे उन्हाळ्याचे सुरुवातीचे दोन महिने संपले कि गावातील लोकं सुस्ती टाकून देऊन शेतीच्या पुढच्या मोसमाकरीता सिद्ध होत असत. मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत गावाची यात्रा संपन्न झालेली असे. गावातील लग्नकार्ये नुकतीच होऊन गेली आहेत, हे घराबाहेरील आंब्याची सुकलेली डहाळे घातलेली मंडपे सांगत. सोमवती अमावस्या, होळी, गुढी पाडवा, चैती पुनव इत्यादी सण उलटून गेले असत आणि आखिदीच्या सणाची (अक्षय तृतीया) प्रतीक्षा असे. काहीजण बैलगाड्या भरून सहकुटुंब निमगाव-दावडीच्या ख...
माझे गाव: भाग १५ : गावातील मजा आणि भितीदायक प्रसंग

माझे गाव: भाग १५ : गावातील मजा आणि भितीदायक प्रसंग

माझे गाव
गावातील मजा आणि भितीदायक प्रसंग साधारण १९७२ च्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी गेलो होतो. १९७२ च्या दुष्काळाची झळ अवघ्या महाराष्ट्राला लागली होती. १९७० ते १९७२ या कालखंडात अपुऱ्या पावसामुळे सलग तीन वर्षे शेतकऱ्याच्या हातात काहीच पीक लागले नव्हते, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. त्याकाळी शासनाने रोजगार हमी योजनेतून (रोहयो) सर्वसामान्य दुष्काळग्रस्तांच्या हाताला काम दिले. रोहयो तर्फे आमच्या गावात सुद्धा कामे सुरु होती. आमचे गाव कुडे खुर्द ते कुडे बुद्रुक दरम्यान रस्त्याच्या बांधकामाचे काम गावकऱ्यांना देण्यात आले. त्याकाळी दांडाच्या माळावरील अवघडपणामुळे या दोन्ही गावादरम्यान रस्ता नव्हता. गावातील झाडून सर्व गावकरी स्त्री, पुरुष कुठलाही भेदभाव न बाळगता या रोहयोच्या योजनेवर कामाला होते. माझे नाना, काकू तर होतेच पण माझी आजी सुद्धा या रोहयोच्या कामावर जात असे. दिवस उजाडल्यावर घरची क...
माझे गाव: भाग १४ : माझे गावातील खेळ

माझे गाव: भाग १४ : माझे गावातील खेळ

माझे गाव
माझे गावातील खेळ मागच्या एका लेखात मी माझ्या मित्रांसोबत विहिरीवर पोहोण्याचा निष्फळ प्रयत्न कसा केला याची गंमत वाचली असेलच. गावी गेल्यावर माझे मित्रांच्या साहाय्याने असेच काहीना काही निष्फळ प्रयोग चालत असत. आम्ही रोज काही शेतात जात नसू. अशा वेळी घरात किंवा गावातच आमचा काही ना काही उद्योग चाले किंवा खेळत असू. एका दिवशी नानाजी बरोबर मोठ्या विहिरीवर बैल पाणी पाजायला गेल्यावर, मी बैलांपासून थोडे दूर रहावे म्हणून विहिरीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन कठड्याजवळ उभा राहिलो. मी तिकडे जाताना दिसलो कि मला म्हणायचा, 'तिकडं नको जाऊ, गाळात पाय जाईल, चिखल हाय तिथं'. मी खाली पहिले तर विहिरीभोवती शेतातील मातीत जागोजागी लहानमोठे खड्डे पडलेले होते. त्या खड्ड्यात माणसांच्या आणि जनावरांच्या पायाचे खोल ठसे उमटलेले दिसत. म्हशीच्या पायांचे ठसे जरा मोठे दिसत. काही खड्ड्यांमधे विहिरीवर पाणी भरताना उडालेले...
माझे गाव: भाग १३  : आमच्या प्रेमळ आत्या

माझे गाव: भाग १३ : आमच्या प्रेमळ आत्या

माझे गाव
आमच्या प्रेमळ आत्या आतापर्यंत गावी खूप मजा केलेली असायची ते आपण पाहिलेच आहे. त्याचबरोबर दुसरी मजा पण घेतलेली आहे. ती म्हणजे गावोगावी फिरणे. गावी गेल्यावर ४-५ दिवसातच वडील आम्हाला गावी सोडून मुंबईला परत जात. त्यापूर्वी वडील आम्हाला घेवून थोरल्या कुड्याला (कुडे बुद्रुकला) न्यायचे. वडिलांच्या तीन मावस बहिणी पैकी दोघी शेजारच्या गावात, 'कुडे बुद्रुक'ला होत्या. त्यांची नावे सखूआत्या आणि ठकूआत्या. वडिलांच्याच वयाच्या. वडिलांना सख्खी बहीण नव्हती. त्यामुळे या दोन्ही आत्यांचा त्यांना खूपच लळा. त्या दोघींचाही माझे वडील आणि त्यांचे भाऊ मोतीराम नाना यांच्यावर खूपच जीव. माझ्या आजीच्या हाताखाली लहानपणी ते सगळे एकत्र वाढलेले असल्याकारणाने सर्वांचा एकमेकांवर खूपच लोभ होता. ठकूआत्या आज ८० वय झाले तरी मस्त ठणठणीत आहे. सखू आत्या तशी गरीब. घरची शेती बरी असावी, त्यामुळे खाऊनपीऊन सुखी घर होते. गोठ्यात ...
माझे गाव: भाग १२ : आमचे घर, आमची माणसे – ३

माझे गाव: भाग १२ : आमचे घर, आमची माणसे – ३

माझे गाव
आमचे नाना मागच्या भागात आजीची ओळख झाली, ह्या भागात नानाला भेटूयात. आमचा नाना म्हणजे माझ्या वडिलांचा मोठा भाऊ. तरुणपणी दिसायला खूपच तरतरीत होता. किती शिकला माहीत नाही. पण साधारण इंग्रजी शब्द बनवून लिहिता यायचे त्याला. शाळेत असताना कानाला काही अपघात झाला. आणि त्याला ऐकणे येणे बंद झाले. त्यामुळे पुढे बोलणे पण बंद झाले. म्हणून नाव मोतिराम असले तरी मुक्या म्हणूनच पंचक्रोशीतच प्रसिद्ध. बोलणे बंद झाले म्हणजे त्याला फक्त सर्वसामान्य लोकांसारखे शब्द उच्चारणे जमत नव्हते, अन्यथा तोंडाने हा, बाबो, हो, ह्या, वपया, यपया असे बरेच शब्द तो उच्चारू शके. त्याला वर्तमानपत्र वाचायला आवडायचे. मासिके, अंक इत्यादी तो तासनतास वाचत बसे. एखादी खास बातमी आवडली कि शेजारी बसलेल्या माणसाला ती बातमी त्याच्या भाषेत अशी काही समजावून सांगे कि तो माणूस परत नानाच्या नादाला लागायचा नाही किंवा त्याला बातमी पूर्ण कळायची. ...
माझे गाव: भाग ११ : आमचे घर, आमची माणसे – २

माझे गाव: भाग ११ : आमचे घर, आमची माणसे – २

माझे गाव
आजी, आजोबा आणि नाना आमचे घर आपण पाहून झाले आहे. घरातील माणसांची तोंडओळख सुद्धा झालेली आहे. आता घरातील माणसांची सविस्तर ओळख करून घेवूयात …. आजीच्या कडक शिस्तीच्या परंतु माणुसकीचा स्वभाव आपण गेल्याच भागात पाहिला आहे. जातीधर्माच्या पलीकडे तिचे वागणे असे. सर्व लोकांचे आमच्या घरी सारखेच स्वागत आणि उठबस केली जाई. आमच्या घरात बलुतेदारांचा नेहमी राबता असायचा, त्यांना काय हवे नको ते सर्व आजी बघायची. बलुत वेळच्या वेळी व्यवस्थित दिले जाई, त्यात काही हयगय नसे. चहापाणी किंवा जेवण सर्वांना मिळायचे. फक्त स्वच्छता पाळायला लागायची. आजोबा किंवा आजी यांपैकी कोणामुळे झाले माहित नाही, पण आमच्या घरी अख्खा गाव यायचा काही ना काही वस्तू मागायला यायचा (म्हणजे अन्नधान्य असे नाही, गैरसमज नको), पण वापरातल्या वस्तूंकरीता. आमचे नवीन घर बांधल्या नंतर आमच्या घरात अनेक गृहपयोगी वस्तू, शेतीची अवजारे, हत्यारे अशा व...
माझे गाव: भाग १० : आमचे घर, आमची माणसे – १ (my-village-my-home-my-family)

माझे गाव: भाग १० : आमचे घर, आमची माणसे – १ (my-village-my-home-my-family)

माझे गाव
चला आमच्या घरी - या बसा रामराम आतापर्यंत आपण गावातील बऱ्याच जणांना भेटलो आहोत, बऱ्याच ओळखी झाल्यात. पण अजून तुम्ही आमचे घर आणि आमच्या घरातील माणसांना अजून भेटला नाहीत, चला तर मग आमच्या घराकडे. पूर्वी आमच्या घराण्याचे एक सामाईक घर होते. नंतर साधारण ५५ साली माझ्या आजोबांनी गावात दुसरी जागा घेवून स्वतःचे नवीन घर बांधले. घर तसे छोटेसेच, एकदम वाडा वगैरे असे काही नाही. पण खूप छान बांधले होते. फक्त तीन खण रुंद आणि चार दालनांचे होते. प्रथम पडवी लागायची. पुढे स्वयंपाकघर, नंतर माजघर आणि शेवटी न्हाणीघर अशी रचना होती. सुमारे दीड मीटर रुंदीची तीन मोठी दारे एका रांगेत होती. घराच्या बाहेर उंच ओटा रस्त्याच्या कडेने तिरपा गेला होता. आणि तेच आमचे अंगणसुद्धा होते. ओट्याच्या उजवीकडे, खालच्या बाजूला मोठे पण वरती छोटे असे शंकूच्या आकारचे, दगड बाहेर आले असल्यामुळे थोडेसे ओबडधोबड दिसणारे तुळशी वृंदावन. त्...
माझे गाव: भाग ९ : पोहण्याची शिकवणी

माझे गाव: भाग ९ : पोहण्याची शिकवणी

माझे गाव
मी पोहायला शिकतो तेव्हा मी साधारण सहावी सातवीत असेन तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलो होतो. त्यावर्षी माझा सवंगडी होता गणपत रामभाऊ सावंत. ती सुट्टी अख्खी त्याच्या बरोबरच काढली. त्याचे घर माझ्या घराच्या समोरच्या बाजूला, फक्त त्याच्या घराचे तोंड पश्चिमेला आणि आमच्या घराचे तोंड उत्तरेला एवढाच फरक. आता त्याच्याबरोबर सुट्टी काढायची म्हणजे त्याच्या कामानुसार मला जुळवून घ्यावे लागले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी त्याच्याबरोबर असे. तो जिथे जाणार तिथे. बहुतेक एखाद वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा आहे गणपत. सकाळी उठून माझी अंघोळ आणि चहापाणी झाले कि मी निघे. गणपतच्या घरी त्याचा मोठा भाऊ सखाअप्पा आणि वहिनी सुलाबाई. सुलाबाई आमच्याच शेजारच्या मोऱ्यांच्या घरातली होती. वहिनी कामाला वाघच जणू. कधीही पहावे काहीना काही काम करतच असे. मी त्यांच्या घरी जायचो तेव्हा वहिनी चुलीवर भाकरी करीत असे. कालवण वगैरे औल...
माझे गाव: भाग ८ : यात्रेची गंमत

माझे गाव: भाग ८ : यात्रेची गंमत

माझे गाव
गावची यात्रा - भाग २ आम्ही लहान मुले सकाळपासून देवळाकडे येऊन जाऊन फिरत असू. काल्याचे किर्तन चालले असे, काही धार्मिक मुले फक्त तिथे बसून रहायची, मला त्यात फारसा रस नसायचा, फक्त कसे काय चालले आहे हे कुतूहलाने पाहायचो. मग देवळात जाऊन देवाची आरास कशी केली ती पाहायचो. देवळाला नमस्कार करायचो. गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला हाराच्या टोपल्या ठेवलेल्या असायच्या. दुसऱ्या बाजूला रात्रीच्या पालखीची तयारी चालू असे. देवळाच्या मागच्या बाजूला जेवणाची (भंडारा) तयारी चालू असे तिकडे एक फेरी व्ह्यायची. जमिनीत सुमारे दीड ते दोन मीटर लांब आणि दोनेक फूट रुंद असे खड्डे केलेले असत, त्यात खाली लाकडाचे मोठमोठे ओंडके घालून त्यांचा जाळ करीत असत. त्यावर मोठमोठ्या आकाराची पण लहान तोंडाची पितळेची पातेली ठेवून त्यात भात शिजवला जायचा. त्या भांड्यात सुरुवातीला केवळ पाणी टाकले जायचे. पाणी खूप तापले कि त्यात अगोदरच निवडलेले ...
माझे गाव: भाग ७ : गावची यात्रा

माझे गाव: भाग ७ : गावची यात्रा

माझे गाव
गावची यात्रा - भाग १ - बैलगाडयांची शर्यत आपण शहरात वाढलेली माणसे. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनुसार आणि वयोगटानुसार आपल्या शहरात आपणास मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध असतात. आणि आपापल्या क्षमतेनुसार त्यात रमून जगत असतो. ग्रामीण भागात हे पर्याय खूपच मर्यादित असतात. पण दरवर्षी साजरे होणारे विविध सण, उत्सव, घरातली किंवा भावकीतील कार्ये हे सर्व सार्वजनिकरित्या साजरे करण्याचा आनंद गावकरी घेत असत. त्याचप्रमाणे धार्मिक सण, चालीरीती आणि परंपरा गावात मोठ्या उत्साहात आणि हिरिरीने भाग घेवून साजरे केले जात. कोणत्याही गावच्या धार्मिक समारंभामध्ये ग्रामदैवताचा उत्सव अतिशय महत्वाचा मानला जातो. गावाचे संकटापासून संरक्षण व्हावे म्हणून एखाद्या रक्षणकर्त्या देवाची किंवा देवीची स्थापना करून त्याचे मंदिर उभारायचे आणि गावातील सण, उत्सव या मंदिराच्या साक्षीने पार पाडायचे हि प्रथा गावात पूर्वापार चालू असते. म्हण...
माझे गाव: भाग ६: गावातील व्यक्तिमत्वे

माझे गाव: भाग ६: गावातील व्यक्तिमत्वे

माझे गाव
गावची अविस्मरणीय माणसे आम्ही गावी गेलो की आमची विचारपूस करणे किंवा मुंबईहून काही निरोप आला आहे का?, नवीन खबरबात काय हे जाणून घेण्यासाठी गावातली मंडळी हळूहळू आमच्या घराकडे येत असत. आमची अंघोळ, चहा वगैरे होईपर्यंत एकएक जण येण्यास सुरुवात व्हायची. शक्यतो बबन (मोरे) कोतवाल पहिला आमच्या घरात यायचा. कारण त्याची गावात फेरी चालू असायची. विचारपूस करायचा, चहा वगैरे घेवून गप्प मारायचा. बबन कोतवाल मला आठवतो तो गावात दवंडी देताना, तो नेहमी खालच्या बाजूने वरच्या आळीत आणि मग पुन्हा खाली असा जात असे आणि जाताना मोठ्याने ओरडून सांगत असे, "उद्या मोडा आहे, हो". शनिवारी वाड्याला आठवड्याचा बाजार भरायचा. तेव्हा त्या दिवशी आणि आणखी काही मोजक्या दिवशी गावात 'मोडा' जाहीर केला जायचा. म्हणजे त्या दिवशी गावात कोणीही काहीही कामधंदा करू नये असा त्याचा अर्थ असायचा. रंगाने गोरापान, उंची कमी, डोळे किंचित घारे, नेहमी अं...
माझे गाव: भाग ५ : चला कैऱ्या खायाला

माझे गाव: भाग ५ : चला कैऱ्या खायाला

माझे गाव
शेतातील रानमेवा मग दुपारचे जेवण व्हायचे तोपर्यंत माझे मित्र घराबाहेर दिसायचे. एखादा पुढे यायचा अन म्हणायचा, “शेतावर जायचं का, कैऱ्या खायला?”. एवढे निमंत्रण मिळाल्यावर घरात कोण थांबणार? मग व्हायची आमची शेतावर एक सफर आणि आम्ही धमाल मजा करायचो. आमच्या गावाच्या चारीही बाजूला आणि टेकडीवर, टेकडी पलीकडे अशी चहूवार शेतं पसरलेली आहेत. कुठल्या शेतात जायचे हे सोबत कोणता मित्र आहेत यावर अवलंबून असायचे. मला त्याच्या शेतावर न्यायची त्याची ईच्छा असायची अन मला माझ्या शेतावर जाण्याची. पण सुरुवात मात्र व्हायची ती आमच्या मावशीच्या शेतावरून. कारण तिचे शेत हे सर्वात जवळ, गावाच्या लगोलग बाहेर. तिथे जाण्याच्या दोन वाटा. माळावर जाणाऱ्या वाटेवरून गोठ्यांच्या पलीकडे गेलो अन उजवीकडची खाचरे ओलांडली की पोचलो त्यांच्या शेतावर. खाचराच्या पलीकडील बांध खूपच उंच. आणि त्या बांधावर आंब्याची तीन मोठी झाडे होती. तिथून...
आमच्या चाळीतील दिवाळी – Diwali Celebration in Mumbai Chawls

आमच्या चाळीतील दिवाळी – Diwali Celebration in Mumbai Chawls

लेखमाला
आमची चाळ आणि दिवाळी -Diwali Celebration in Mumbai Chawls मध्य मुबईतील डोंगरी भागातील चिंचबंदर येथील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या बी.आय.टी. चाळीत मी लहानाचा मोठा झालो. ह्या बीआयटी चाळी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी 'बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट' ह्या योजनेखाली बांधलेल्या चाळी. मध्य मुंबईत अनेक ठिकाणी अशा बीआयटी चाळी आणि बीडीडी चाळी सरकारने बांधल्या होत्या. शिवाय गिरगाव पासून गिरणगावापर्यंत इतर खाजगी चाळी असंख्य होत्या. प्रत्येक चाळीचे एक स्वतंत्र अस्तित्व आणि संस्कृती वेगळी असायची. त्यातील काही चाळींची ओळख हि सुप्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध ह्या दोंघांपैकी एका गटात असायची. उरलेल्या चाळी ह्या फक्त चाळी असायचा. बाहेरून दखल न घेण्यासारख्या दिसणाऱ्या. पण त्यांच्या आत नांदायचे ते एक अख्खे कुटुंब. हो, अनेक खोल्या आणि मजले असलेल्या ह्या चाळीत अनेक कुटुंबे वास्तव्य...
माझे गाव: भाग ४ : गोठ्यातली कामे (My Village Stories)

माझे गाव: भाग ४ : गोठ्यातली कामे (My Village Stories)

माझे गाव
आमची बैलं आता मी ताजातवाना झालेलो असायचो. मग घरात थोडी कामे करायचो. तसे पाहाता मुंबईत लहानाचा मोठा झालेलो मी गावाकडची गावाकडची कामे करणे शक्यच नसायचे. मग मी काय करायचो? फार काही नाही, करायचो ती फक्त लुडबुड आणि लुटुपुटुची कामे. आतापर्यंत सकाळ चांगलीच झालेली असायची. घरात पाणी भरून झालेले असायचे. जेवणाची तयारी सुरु असायची. मग नाना घरातून एक रंगीत कासरा आणि विहीरीवर पाणी भरायची लोखंडी बादली घेवून निघायचा वाडग्याकडे (गोठ्याकडे). मी लगेच मागोमाग निघायचो. आमचे वाडगे आमच्या घराच्या मागच्या बाजूला होते. शेजारचे विठ्ठल मोरे यांच्या घराला वळसा घालून माळावर जाणाऱ्या रस्त्यावर आमचे वाडगे होते. तेथे फक्त लक्ष्मण मोरे यांच्या घरामागे एक घर होते. आणि मागच्या बाजूला वरच्या बाबू सावंतांच्या घराच्या मागच्या बाजूपासून खाली नवीन डांबरी रस्त्यापर्यंतचा भाग एकदम रिकामा होता. आता तिथे नवीन घरे झालेली आहेत...
माझे गाव: भाग ३ : आमची मावशी (My Village Story)

माझे गाव: भाग ३ : आमची मावशी (My Village Story)

माझे गाव
माझे गाव: भाग ३ : आमची मावशी (My Village Story) मला दरवर्षी एक सवंगडी भेटत असे. मग अख्खी सुट्टी त्याच्याच बरोबर. कधी गणपत रामभाऊ सावंत, कधी समोरचा नानाजी मोरे उर्फ नान्या. कधी भिकाजी सावंत, कधी नाथा बाबुराव असे माझे सवंगडी बदलत असायचे. मग मी अख्खी सुट्टी मजा करायचो. पण त्या अगोदर मावशीच्या घरी जायचे आहे … आमचे दात घासून झाले, अंघोळ झाली, मग चहा वगैरे झाले. कि आमची तयारी व्हायची ती गावभर भटकण्याची. पण अजून तशी कोणा सवंगड्याची साथ मिळालेली नसते. सोबत कोणी समवयस्क मुलगा नसल्यामुळे गावात एकटे फिरायला थोडे बुजल्यासारखे व्हायचे. कारण शेजारच्या घरातील किंवा रस्त्यात भेटणाऱ्या गावकऱ्यांना कसे सामोरे जायचे हेच कळायचे नाही. कारण सर्वच जण नाना चौकश्या आणि प्रश्न विचारून भंडावून सोडत असत. अर्थातच ते सर्व प्रेमानेच होत असे. शिवाय आजूबाजूची काही लहान मुले अजूनही दरवाज्याबाहेर अंगणात रेंगाळत अ...
IN VILLAGE – माझे गाव: भाग २ : गावात प्रवेश

IN VILLAGE – माझे गाव: भाग २ : गावात प्रवेश

माझे गाव
(In Village) गावात स्वागत बैलगाडी मंदिराला वळसा घालून उजवीकडे वळली कि मग गावात (Village) प्रवेश, समोरच आमच्या पूर्वजांच्या सामायिक घराची मागची बाजू आणि ग्रामपंचायतीचे कार्यालय आणि डेअरी. पुन्हा मुरुमाचा एक छोटा चढ आणि एक वळण आणि जरा पुढे आलो कि गाडी आमच्या दारात उभी राहायची. तोपर्यंत घरच्यांना आमच्या येण्याची चाहूल लागलेली असायची तेव्हा आजी, राधा काकू, तारा आत्या किंवा अन्य जे कोणी असतील ते सर्वजण लगबगीने हातातील कामे बाजूला ठेवून दारात आमच्या स्वागताला येत. आमच्या घराच्या बाहेर एक मोठा ओटा आणि आंगण होते. बैलगाडी ओट्याला लागूनच उभी राहायची. नाना आम्हा तीन चार भावंडांना एकेक करून गाडीतून उचलून सरळ ओट्यावर ठेवत असे, मग आम्ही थोडे बुजरे होत सर्वांकडे आणि आजूबाजूला पहात पुढे पुढे जायचो. मग आजी आम्हाला एकेकाला जवळ घेवून चेहऱ्यावरून आणि अंगावरून हात फिरवायची आणि "आलं रे बाळ माझं (माझ्या ...
My Habit of Reading – माझी वाचनाची सवय

My Habit of Reading – माझी वाचनाची सवय

लेखमाला
My Habit of Reading - माझी वाचनाची सवय (अर्थात मी वाचक कसा झालो?) Cover Photo Courtesy: World-Book-Day-Introduce-Book-Reading-Habit-To-Your-Child-1524475235. https://www.parentune.com/parent-blog/world-book-day/3941 खरेतर सुरुवातीला माझे आवडते लेखक आणि त्यांची पात्रे याविषयी लिहिण्याचे मी ठरविले होते. पण त्या अगोदर मला वाचनाची आवड कशी लागली ते सांगावेसे वाटते. विविध लेखकांची पुस्तके मी वाचली आहेत. तसे माझे वाचन मर्यादीतच आहे आणि गेली कित्येक वर्षे त्यात खंड पडलेला आहे. हि वाचनाची आवड मला खूपच लहानपणी लागलेली आहे, त्याची हि कथा. माझा जन्म मुंबईचा. जन्म १९६२ सालाचा, म्हणजे कथा खूप जुनी आहे. हे लक्षात आले असेलच. मध्य मुबईतील डोंगरी भागातील चिंचबंदर येथील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या बी.आय.टी. चाळीत मी लहानाचा मोठा झालो. आई आणि वडील...
error: Content is protected !!