Shankar Jaikishan – Kishor And Asha शंकर जयकिशन – किशोर आणि आशा
किशोर आणि आशा यांची द्वंद्वगीते म्हटले कि सचिनदेव बर्मन आणि राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली कित्येक गाणी लगेच आठवतात. परंतु शंकर-जयकिशन सोबत किशोरकुमार आणि आशा हे समीकरण मात्र अनेकांना ठाऊक नाही. या चौघांनी केलेली गाणी फार कमी लोकांच्या ऐकण्यात आहेत …