
संगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta)
संगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta)
हिंदी चित्रपटाच्या संगीत सुवर्ण काळातील संगीतकार चित्रगुप्त याची सांगीतिक कारकीर्द १९४६ ते १९८८ एवढी प्रदीर्घ राहिली आहे. त्यांच्य्या ह्या प्रदीर्घ कारकिर्दीमुळे त्यांना विविध गायक आणि गायिका ह्यांच्याकडून आपली गाणी गाऊन घेण्याची संधी मिळाली. कारकिर्दीच्या सुरुवातीला म्हणजेच ४०व्या दशकाच्या उत्तरार्धात राजकुमारी, शमशाद बेगम, लक्ष्मी रॉय, मो. रफी, शांती शर्मा, दिलीप ढोलकीया यांसारख्या गायक, गायिकांपासून सुरुवात करून पुढे, मुकेश, तलत, आशा भोसले आणि लता मंगेशकर असे विविध गायक-गायिका चित्रगुप्त यांनी वापरले. पुढे कारकिर्दीच्या शेवटच्या टप्यात नवोदित गायक गायिका, सुरेश वाडकर, येसूदास, हेमलता, अलका याज्ञीक, आलिशा चिनॉय यांच्या आवाजाचा चित्रगुप्त यांनी वापर केला.
त्यांच्या ह्या गायकांच्या यादीत किशोरकुमा...