Shadow

Author: Dr. Pravin Survase

Dr. Pravin Survashe Consultant Neurosurgeon Pune
शेतकऱ्याची पोर – सावित्री – Making of a Neurosurgeon: भाग ७

शेतकऱ्याची पोर – सावित्री – Making of a Neurosurgeon: भाग ७

अनुभव
Making of a Neurosurgeon- मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन - भाग ७ लेखक: डॉ. प्रविण सुरवशे, NEUROSURGEON कन्सल्टंट न्युरोसर्जन Cover Image Artist: Ratan Dutta - Source: https://www.teahub.io/viewwp/iTxxJRo_easy-village-girl-painting/ शेतकऱ्याची पोर - सावित्री सकाळचे १०- १०.३० वाजले असतील. 'जे. जे. हॉस्पिटलची' न्यूरोसर्जरी OPD पेशंटने खचाखच भरली होती. एवढ्यात एक २०-२२ वर्षाचा मुलगा OPD मध्ये डोकावत मला म्हणाला, "डॉक्टर सायेब, आत येऊ का?" मी हो म्हणाल्यावर, गळ्यात अडकवलेली मोठी बॅग व एका हातात रिपोर्ट्स घेऊन कसाबसा तो आत घुसला आणि त्याच्या पाठोपाठ एक गरोदर मुलगी देखील आत आली. मी काहीही न विचारताच त्याने ओळख करून दिली. साहेब "मी शिवराम, आणि ही माझी बायको!". बायको कसली 16-17 वर्षाची पोरंच होती. वाढलेलं पोट बघून ७-८ महिन्याची गरोदर असेल असं वाटतं होत. चापून-चोपून बांधलेले केस, कपा...
Making of a Neurosurgeon – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ६ – सायलेंट हिरोज्!

Making of a Neurosurgeon – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ६ – सायलेंट हिरोज्!

अनुभव
(Making of a Neurosurgeon) मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन भाग ६: सायलेंट हिरोज्! सायलेंट हिरोज्! साधारणपणे दोन वर्षे  झाली असतील या गोष्टीला. मी त्यावेळी जे. जे. हॉस्पिटलला येथे न्युरोसर्जरी डिपार्टमेंटमध्ये लेक्चरर म्हणून काम करत होतो. मेन हॉस्पिटल बिल्डिंगच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर न्युरोसर्जरी डिपार्टमेंट होते. रहाण्यासाठी जवळच हॉस्टेलमध्ये ८×१० ची रूम मिळाली होती. रूम लहान होती तरीदेखील माझ्या मिसेसनी तेवढ्यात पूर्ण संसार थाटला होता. मिसेस त्यावेळी मुंबईतील दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये ॲनेस्थेशिया शिकत होत्या. आमचा दोघांचाही २४ तास ड्युटी व नंतर १२ तास ऑफ असा दिनक्रम असायचा. त्यामुळे नुकतंच लग्न झालं असलं तरी एकमेकांना भेटायला फारसा वेळ नाही मिळायचा! तो दिवस अगदी नेहमीसारखाच होता. मिसेस त्यांची ड्युटी संपवून रात्री घरी आल्या होत्या. त्यामुळे मी देखील सर्व कामं संपवून...
Making of a Neurosurgeon – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ५ – सेकंड चान्स!

Making of a Neurosurgeon – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ५ – सेकंड चान्स!

अनुभव
Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन भाग ५ : सेकंड चान्स्! पुण्याच्या कोलंबिया-एशिया हॉस्पिटलला 'कन्सल्टिंग न्यूरोसर्जन' म्हणून जॉईन होऊन मला आता ६ महिने झाले होते. गेले काही दिवस बरेच दगदगीचे गेले होते, म्हणून घरच्या सर्वांनी सिनेमा बघायला जायचा बेत आखला होता. संध्याकाळी ८ वाजताच शो होता. ७:४५ ला आम्ही तिकिटे घेऊन थिएटरमध्ये जाऊन बसलो. तेवढ्यात माझा फोन वाजला. हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रूम मधून फोन होता. रेसिडेंट डॉक्टर बोलत होते, "सर, पटकन या. दोन पेशंट आलेत. दोघांनाही डोक्याला मार लागलाय आणि दोघेही बेशुद्ध आहेत". मी शेजारी बसलेल्या माझ्या पत्नीला फोन आल्याचे सांगितले आणि बाकी कुणालाही न सांगण्याविषयी सूचना केली. मी जायला निघालो तोच त्यांनी माझा हात पकडला व म्हणाल्या, "अहो, आम्ही पण निघतो. तुम्ही तिथं पेशंटसाठी धावपळ करणार आणि आम्ही इथं एन्जॉय करणार हे बरे वाटत नाही"....
Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ४

Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ४

अनुभव
Making of a Neurosurgeon - मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन भाग ४ : ती २७ मिनिटे ... पुण्‍याच्‍या कोलंबिया एशिया हॉस्‍पिटलला न्‍युरोसर्जरी कन्‍सल्‍टंट म्‍हणून जॉईन होऊन मला एखादाच महिना झाला असेल. मुंबईच्‍या जे. जे. हॉस्‍पिटल मधून न्‍युरोसर्जरीची पदवी संपादन करुन मी पुण्‍याला आलो होतो. शनिवारी रात्री पूर्ण परिवारासोबत जेवण चालू होते. तेवढ्यात माझा फोन खणखणला. कोलंबिया एशियाच्‍या इमर्जन्‍सी रुम मधून फोन होता. डॉक्‍टर बोलत होते. "सर, एका २० वर्षाच्‍या तरुणाला त्याचे नातेवाईक घेऊन आलेत. तीन तासापूर्वी त्याची गाडी स्‍लीप होऊन तो रस्‍त्‍यावर पडला होता. डोक्‍याला मार लागला आहे. सुरूवातीला त्‍याला जवळच्‍या हॉस्‍पिटलमध्‍ये नेले होते. पण त्‍यांना तिथे कळले की, तो खूप सिरिअस आहे. पुढे काही करुन फार उपयोग होणार नाही. त्‍यामुळे ते पेशंटला इकडे घेऊन आलेत." मी डॉक्‍टरना विचारले की, "आता काय स्‍टेटस ...
Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ३

Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ३

अनुभव
(Making of a Neurosurgeon) मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन भाग ३ : ससून मधील अननोन! अननोन पेशंट अननोन म्हणजे अनोळखी! ज्या पेशंटची काहीही ओळख पटत नाही त्याला अननोन म्हणतात. कधीकधी वॉर्डमध्ये असे बरेच अननोन पेशंट ऍडमिट असतात. अशावेळी त्याना अननोन १, २, ३ असे संबोधले जाते. मला ससूनला सर्जरी रेसिडेंट म्हणून जॉईन होवून एखादा महिना झाला असेल. माझा शनिवारचा कॉल सुरु होता आणि मी ओपीडी संपवून वॉर्डमध्ये ॲडमिट झालेले पेशंट तपासत होतो. इतक्यात कॅज्युअल्टीमधून फोन आला. "सर,लवकर कॅज्युअल्टीमध्ये या. पोलिस एका अननोन पेशंटला घेवून आले आहेत." मी कॅज्युअल्टीमध्ये जाऊन बघितलं तर पोलिस एका माणसाला घेऊन आले होते. मी पोलिसांना विचारलं की नेमकं याला काय झालंय? ते म्हणाले, "सर हा भिकारी असून आम्हाला रस्त्यावरती बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. म्हणून आम्ही त्याला उचलून इकडे घेऊन आलो." मी जवळ जावून बघितल...
Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन: डॉ. प्रविण सुरवशे: भाग २

Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन: डॉ. प्रविण सुरवशे: भाग २

अनुभव
(Making of a Neurosurgeon) मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन भाग २ : एक दिवसाची सुट्टी ! पुण्याच्या ससून हॉस्पिटलला सर्जरी रेसिडेंट म्हणून जॉईन होऊन मला आता ७-८ महिने झाले होते. डॉ. करमरकर सरांसारखे निष्णात सर्जन माझे गाईड होते. येणारा प्रत्येक दिवस नवीन अनुभव देऊन जात होता. सकाळी ६ वाजता वॉर्ड राऊंड चालू व्हायचा ते रात्री २-३ वाजेपर्यंत काम चालायचे. रात्री देखील मी वॉर्डमध्येच पेशंटच्या शेजारच्या १ नंबर बेडवर झोपायचो. त्यामुळे रात्री एखादा पेशंट सिरिअस झाला तर पटकन बघता यायचे. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा हॉस्टेलला जाऊन आंंघोळ करण्याइतकाच वेळ मिळायचा. पोटात भूक आणि डोळ्यांत झोप २४ तास सोबत रहायची. पण काम जरी शारिरिक आणि मानसिक क्षमतेच्या पलिकडचे असले तरी पेशंटचे प्रेम खूप मिळायचे. काही पेशंट बरे होऊन घरी जाताना सिस्टरना माझ्यासाठी शाल किंवा बेडशीट आणून द्यायचे व सांगायचे, "रात्री झोपल्याव...
Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन: डॉ. प्रविण सुरवशे: भाग १

Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन: डॉ. प्रविण सुरवशे: भाग १

अनुभव
(Making of a Neurosurgeon) मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन भाग १ : काळ आला होता पण वेळ आली नव्हती ! गोष्ट त्या वेळची आहे ज्या वेळी मी पुण्याच्या ससून रूग्णालयात नुकताच NEUROSURGEON सर्जरी रेसिडेंट (शिकाऊ डॉक्टर) म्हणून जॉईन झालो होतो. पुण्याचे ससून रुग्णालय म्हणजे रुग्णांची पंढरीच जणूं! मला जॉईन होऊन १५-२० दिवसच झाले असतील. माझे डिपार्टमेंटला जॉईन होणे हेही दिव्यच होते. अजूनही आठवतो तो जॉईनिंगचा दिवस. संध्याकाळची वेळ असेल. मी हातात दोन बॅग व पाठीवर एक सॅक असा वॉर्ड नंबर ८ मधे शिरलो. इथून पुढे तीन वर्षे मला वॉर्ड नंबर ८ आणि १२ सांभाळायचे होते. सिनिअर डॉक्टरनी स्वागत केले व आपुलकीने विचारपूस केली. चहा घेऊन झाल्यावर सर म्हणाले, 'बाहेर जाऊन समोरच्या दुकानातून आंंघोळीचे व इतर साहित्य घेऊन ये, कारण यानंतर बाहेर कधी पडायला मिळेल हे सांगता येत नाही.' मनात विचार आला की, 'खरंच एवढे काम असेल का?' आणि ...
error: Content is protected !!