Shadow

Month: November 2021

मोबदला – Marathi Story

मोबदला – Marathi Story

अनुभव, लेखमाला, Slider
मोबदला - लेखक: दीपक तांबोळी. ('रंग हळव्या मनाचे' या पुस्तकातील एक कथा) - Marathi Story शिरीष जसा घरात शिरला तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली, "अहो जरा अण्णांना बघता का? खूप अस्वस्थ वाटताहेत. जेवलेही नाहीत". "हो. फ्रेश झालो की लगेच बघतो". बाथरुममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रुममध्ये गेला. नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते. जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं. खरंच अस्वस्थ वाटत होते. त्यांचे खोल गेलेले डोळे, निस्तेज नजर, चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं. लक्षण काही ठिक दिसत नव्हतं. "काय झालं अण्णा? काय होतंय?" स्वतःलाच धीर देत त्यानं विचारलं. अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला. त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले पण ते शिरीषला समजले नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला, "काय म्हणालात कळलं नाही, परत एकदा सांगा". ...
रॉक कट गॅलरी – हरीहर उर्फ हर्षगड – Harihar Fort

रॉक कट गॅलरी – हरीहर उर्फ हर्षगड – Harihar Fort

गडकिल्ले
रॉक कट गॅलरी - हरीहर उर्फ हर्षगड - Harihar Fort मराठे ज्याच्या मदतीने लढाई खेळलेत त्या निसर्गाने निर्माण केलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर दिमाखाने उभ्या असलेल्या आणि आपल्या पूर्वजांच्या वैभवांचा वारसा सांगणाऱ्या काही गड किल्ल्यांनी आपल्यातील काही ना काही खासियत आजपावेतो जपून ठेवलेली आहे. आणि तेच त्या त्या गड किल्ल्यांचे वैशिष्ट बनून राहिले आहे. काही किल्ले असे आहेत की ज्यांचे नुसते फोटो पाहिलेत की तेथे भेट द्यावेसे असे वाटते. त्यापैकीच एक असलेला नाशिक जिल्ह्यातील ब्रम्हगिरीच्या पश्चिमेस साधारण २० कि.मी. अंतरावरील सोपानाचा गड म्हणून ओळखला जाणारा हरिहरगड किंवा हर्षगड (Harihar Fort). समुद्रसपाटी पासून ११२० मी. उंची लाभलेला, त्रिकोणी माथ्याचा हा गड दुर्गयात्रीच्या परिचयाचा आहे तो म्हणजे त्याच्या काताळ कोरीव पायऱ्यांनी व अंतिम टप्प्यापर्यंत खोदलेल्या बोगद्यातून तर कधी नाळेतून कर...
error: Content is protected !!