
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs 1
Balbharati Poem Songs - बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग १ला : इयत्ता १ली
लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे
लहानपणीचा काळ किती सुखाचा असतो, हे आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. लहान असताना आई-बाबा, आजी-आजोबा, ताई-दादा यांच्याकडून लाड पुरवून घेण्याचे ते दिवस. आपल्याला खेळवताना त्यांनी आपल्यासाठी गायलेले बडबडगीत, झोपवताना गायलेले अंगाईगीत अशा गाण्यांनी आपल्यावर बालपणीच गाण्यांचे संस्कार झालेले आहेत. त्यावर कळस म्हणजे शाळेत गेल्यावर पहिली पासून वाचलेल्या बालभारतीच्या पुस्तकातील कविता आणि गाणी!
मराठी माध्यमातून जे शिकले आहेत त्यांनी हा अनुभव नक्कीच घेतला आहे.
अनुक्रमणिकाBalbharati Poem Songs - बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग १ला : इयत्ता १ली देवा तुझे किती सुंदर आकाशया बाई या, बघा बघा कशी माझी बसली बया ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसादिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी...