Shadow

Month: February 2021

मुंबई-पुणे पदयात्रा: भाग ३

मुंबई-पुणे पदयात्रा: भाग ३

प्रवासमाला
मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा - भाग ३ प्रवासाचा तिसरा दिवस दिनांक: १८ मे १९८१ सकाळी लवकर उठून आम्ही चौक गाव सोडले. रात्री ज्या शिवसैनिकाच्या घरी आम्ही राहिलो होतो. त्यांच्या छोट्या घरात आमची चांगली सोय केली होती. नवीन गोधड्या, चादरी टाकून आमची झोपण्याची व्यवस्था अंगणात केली होती. सकाळी आम्हाला लवकर उठवले. अंघोळीला गरम पाणी दिले. चहा आणि फराळ करून आम्ही लगेच पुढच्या प्रवासाला निघालो. निघताना त्या शिवसैनिकाने माझ्या हातात एक चिठ्ठी आणि एक पत्ता दिला व म्हणाला, "तुम्ही साधारण संध्याकाळ पर्यंत लोणावळ्याला पोचाल. तेथून जवळच ह्याच रस्त्यावर वलवण गाव आहे, तिथे आमचा एक नातेवाईक आणि शिवसैनिक राहतो, त्याच्याकडे रात्री थांबा. हि चिठ्ठी त्याला दाखवा, म्हणजे तुम्हाला ते मदत करतील". रस्त्याने जाताना उगीचच कोठे थांबू नका अन सावधगिरी बाळगा अशी आम्हाला सूचना दिली. आम्ही हो हो म्हणालो खरे, पण त...
मुंबई-पुणे पदयात्रा: भाग २

मुंबई-पुणे पदयात्रा: भाग २

प्रवासमाला
मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा - भाग २ प्रवासास सुरुवात आणि १७ मे १९८१ रोजीचा दिवस उजाडला. भल्या पहाटे किंवा साधारण ६ वाजता प्रवास सुरु करावा, म्हणजे दिवसभरात खूप अंतर कापता येईल, म्हणून आदल्या दिवशी रात्री लवकर झोपलो होतो. पण उठून आवरायलाच उशीर झाला. सर्व उरकल्यावर प्रथम देवाच्या आणि नंतर आईवडिलांच्या आणि शेजारील काही वडीलधाऱ्यांच्या पाय पडलो आणि घराबाहेर पाऊल टाकले. तोच समोरचा रमेश कलव पुढे आला. मला म्हणाला, "चारू, जाशील ना बरोबर? जमेल ना तुला?" त्याच्या चेहऱ्यावरची काळजी जाणवत होती. मी म्हणालो, " हो जाऊ आम्ही बरोबर, नको घाबरू". खरेतर रमेशच्या ह्या वागण्याचे मला आश्र्चर्य वाटले होते. तो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता. आणि वयाने लहान असणाऱ्या माझ्यासारख्यांना तो त्रास द्यायचा. आमची नेहमी भांडणे आणि झटापटी व्हायच्या. आणि आता तो माझी काळजी करतो म्हटल्यावर, मलाच त्याची काळजी वाटू लागल...
Mumbai to Pune by Feet – 1 मुंबई ते पुणे पदयात्रा: भाग १

Mumbai to Pune by Feet – 1 मुंबई ते पुणे पदयात्रा: भाग १

प्रवासमाला, Slider
मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा (Mumbai to Pune by Feet - 1 मुंबई ते पुणे पदयात्रा: भाग १) वर्ष १९८१. नुकतीच बी. एस्सी. च्या पहिल्या वर्षाची परीक्षा संपली होती. दुपारपासून गच्चीवर क्रिकेट खेळून दमलो होतो. संध्याकाळी अंधार पडल्यावर नाईलाजाने क्रिकेट बंद करून आम्ही काही मित्र पाण्याच्या टाकीवर बसून थंड हवा खात गप्पा मारत बसलो होतो. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. सहा महिन्यांपूर्वीच १९८०चे मॉस्को ऑलिम्पिक संपन्न झाले होते. ऑलिम्पिकमध्ये काही खेळाडू कसे कसब दाखवायचे. त्या रोमानिया तसेच बल्गेरिया, झेकोस्लोव्हिया, युगोस्लोव्हिया इत्यादि कठीण उच्चारांची नावे असलेल्या देशांचे खेळाडू वैयक्तिक कामगिरी करून कसे पदक पटकावतात हा विषय निघाला. " ते खेळाडू खूप कष्ट आणि मेहनत करतात. त्यांचा सराव खूपच कडक असतो", एकजण म्हणाला."हो, पण त्यांचे सरकार त्यांची खूप काळजी घेते, त्यांना सर्व साधने आणि स...
Jivdhan Fort – जीवधन किल्ला आणि  वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग

Jivdhan Fort – जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग

गडकिल्ले
Jivdhan Fort जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग कार्यक्रम - JIVDHAN FORT भारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा ह्या उद्देशाने पुण्याच्या 'राही ट्रेकर्स' तर्फे जीवधनच्या वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग पद्धतीने चढाई करण्याचा साहसी कार्यक्रम जाहीर झाला, हे कळाल्यावर मी लगेचच नाव नोंदणी करून माझी जागा राखीव केली. २५ जानेवारी २०२१च्या रात्री पुण्याहून सुटलेल्या खाजगी बसने एकेकाला सोबत घेवून साधारण रात्री ११ वाजता नाशिक फाटा सोडला. तेथून पुढे पुणे-नाशिक महामार्गाने चाकण, खेड, मंचर, नारायणगाव मार्गे जुन्नरहून जीवधनच्या पायथ्याशी पूर्वेला वसलेल्या घाटघर गावात रात्री (पहाटे) साधारण अडीचच्या सुमारास पोहोचलो. अगोदर ठरविल्याप्रमाणे सचिन पानसरे यांच्या घरी सर्वजण थांबलो. साधारण तासभर थांबून जीवधनकडे निघण्याच्या बेताने सर्वांनी थोडी विश्रांती घेतली. पहाटे चार वाजता सर्वज...
error: Content is protected !!