गावी गेल्यावर माझे मित्रांच्या साहाय्याने असेच काहीना काही निष्फळ प्रयोग चालत असत.
आम्ही रोज काही शेतात जात नसू. अशा वेळी घरात किंवा गावातच आमचा काही ना काही उद्योग चाले किंवा खेळत असू.
वडिलांना सख्खी बहीण नव्हती, परंतु मायेच्या आणि प्रेमाच्या खूप बहिणी होत्या, त्या आमच्या आत्या. गावी गेल्यावर ह्या सर्व आत्यांना न भेटून कसे चालेल
चला तर आत्यांना भेटायला.